ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » समग्र स्वच्छता अभियान

समग्र स्वच्छता अभियान

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

चोवीस तास केवळ राष्ट्रहिताचाच ध्यास घेतलेले नरेंद्र मोदी कुठलाही निर्णय घिसडघाईने घेत नाहीत. सखोल चिंतनानंतर गृहपाठ करुन, दूरगामी परिणामांचा विचार करुन निर्णय घेतात. निर्णय घेण्यापूर्वी संबंधीतांना पुरेसा वेळ देतात, तसे संदेश देतात. ज्यांनी संदेश समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही, त्यांची मोदींनी निर्णय घेतल्यानंतर त्रेधातिरपीट उडते, त्यांचा तोल जातो आणि ते अधिकाधिक गाळात रुतत जातात. आपण निर्णय घेतल्यानंतर येणार्‍या संभाव्य प्रतिक्रियांविषयी नरेंद्र मोदी यांचे पूर्वानुमान आजपर्यंत कधी चुकले नाही. प्रतिकूल प्रतिक्रियांमधून विरोधक कसे उघडे पडतील, याची चतूर आखणी त्यांनी आधीच करुन ठेवलेली असते. विरोधकांनी मोदींसाठी खड्डा खोदावा आणि त्यात पडून विरोधक जायबंदी व्हावेत, असे आजपर्यंत घडत आले आहे.

Prime Minister Narendra Modi

Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडु घेत परिसर स्वच्छता अभियानातून सर्वच क्षेत्रांच्या आंतर्बाह्य साफसफाईचा संदेश दिला होता. तो संदेश ज्यांना वाचता आला नाही, ती मंडळी दिवसेदिवस बेनकाब होत असून त्यांच्या बुडाखालची घाण उजेडात येत आहे. चोवीस तास केवळ राष्ट्रहिताचाच ध्यास घेतलेले नरेंद्र मोदी कुठलाही निर्णय घिसडघाईने घेत नाहीत. सखोल चिंतनानंतर गृहपाठ करुन, दूरगामी परिणामांचा विचार करुन निर्णय घेतात. निर्णय घेण्यापूर्वी संबंधीतांना पुरेसा वेळ देतात, तसे संदेश देतात. ज्यांनी संदेश समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही, त्यांची मोदींनी निर्णय घेतल्यानंतर त्रेधातिरपीट उडते, त्यांचा तोल जातो आणि ते अधिकाधिक गाळात रुतत जातात. आपण निर्णय घेतल्यानंतर येणार्‍या संभाव्य प्रतिक्रियांविषयी नरेंद्र मोदी यांचे पूर्वानुमान आजपर्यंत कधी चुकले नाही. प्रतिकूल प्रतिक्रियांमधून विरोधक कसे उघडे पडतील, याची चतूर आखणी त्यांनी आधीच करुन ठेवलेली असते. विरोधकांनी मोदींसाठी खड्डा खोदावा आणि त्यात पडून विरोधक जायबंदी व्हावेत, असे आजपर्यंत घडत आले आहे. पूर्वी योजना फक्त जाहीर व्हायच्या! गरीबी हटाओ! मोदीजी योजना जाहीर करतात आणि मुदतीत पूर्ण करतात! आंतरराष्ट्रीय समिक्षकांनी या अविचल मोदीव्यक्तीमत्वाला जेवढे समजून घेतले आहे, देशांतर्गत कावीळग्रस्त मोदीविरोधक त्याच्या शेकडो योजने मागे आहेत! मानव कल्याण आणि विश्‍वशांती कार्यात दिलेल्या अतूलनीय योगदानामुळे दक्षिण कोरियाच्या सेऊल शांती पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातल्या तब्बल १३००स्पर्धकांमधून निवड झाली आहे!
एका विधर्मी विदेशी टोळीने भूमीपुत्रांचे राज्य बळकावले आणि वेळोवेळी वेगवेगळे मुखवटे धारण करत राजघराणे म्हणून स्थिरावले. भूमीपुत्र जागे होतील आणि आपल्या घराण्याकडून राजसत्ता हिसकावून घेतील याची धास्ती असल्यामुळे त्यांना सतत रंग बदलावे लागत असत. भूमीपुत्र विस्कळीत असल्यामुळे त्यातल्याच काहींना हाताशी धरायचे आणि इतरांवर सोडायचे. जनतेला फसविणे सोपे असते, पण नियतीला कुणीही फसवू शकत नाही. एके दिवशी राजाला यमराजाचा निरोप आला. परवा सकाळी येतोय मी, आपल्याला सन्मानाने न्यायला! राजा गडबडला! राजसत्ता सोडवता सोडवत नाही! मी नाही तरी माझा कुणीतरी गादीवर बसला पाहिजे! यमराजाला गंडवायची षडयंत्र आकार घेऊ लागली. राजाचे हुबेहूब चार पुतळे तयार करुन घेण्यात आले. यमराजाची चाहूल लागताच राजा पुतळ्यांच्या रांगेत जावून उभा राहिला. यमराजही क्षणभर गोंधळले. धन्य तो राजा! धन्य त्याची रंगशाळा! मूर्तीकाराचं कसब काय वर्णावं! पाच मूर्तीतली कुठली मूर्ती दुसरीपेक्षा कुठे भिन्न आहे, हे मीही सांगु शकणार नाही! मी राजाला एक आनंदाची वार्ता सांगायला आलो होतो, पण ती या निर्जीव पुतळ्यांना सांगुन काय उपयोग! राजाची भेट झाली असती, तर बरे झाले असते. यमराजाने केलेली स्तुती ऐकून राजा पाघळला आणि यमराजासाठी त्याने फेकलेल्या जाळ्यात तो स्वतःच अडकला. मोदी विरोधकांची अवस्था याहून वेगळी नाही!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजधानीत नरेंद्र मोदी म्हणाले होते, एन सी पी म्हणजे नॅच्यूरली करप्ट पार्टी! नरेंद्र मोदी दुसर्‍या एका प्रसंगी असेही म्हणाले होते की, साहेबांचे बोट पकडून मी राजकारणात आलो! भाजपची एनसीपी आणि मोदींचा पवार होऊ देणार नाही, असा सांकेतिक अर्थ होता त्यांत!
भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी सोबत युती करुन सरकार स्थापन केले आणि त्या सरकारमधून भाजपा स्वतःच बाहेर पडली! मोदीविरोधकांना या दोन्ही घटनांचे नीट आकलन कधी करताच आले नाही. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया एकमेकींना छेद देणार्‍या निघाल्या आणि विरोधकांचे हसे झाले. गुजरातमध्ये सतत बारा वर्षे तोंडघशी पडणार्‍या काँग्रेसला मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ही वल्ली कधी कळलीच नाही आणि गेली साढे चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीचेही त्यांना नीट मूल्यांकन करता आले नाही. झापडबंद मोदी विरोधातून विरोधकांचीच अधिकाधिक अधोगती होत गेली. काँग्रेसमुक्त भारत दृष्टीपथात येत गेला! नोटाबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, राफेल व्यवहार, … अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन दिलेली मानवंदना आणि त्यातून जागृत झालेली राष्ट्रचेतना, सीबीआयची स्वच्छता मोहिम! प्रत्येक वेळी मोदींनी विरोधकांची बत्तीशी त्यांच्याच घशात घातली!
देशाची सर्वोच्च तपास संस्था सीबीआयने दिल्लीतल्या स्वतःच्याच मुख्यालयावर धाड टाकून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दोन मजले सीलबंद केले! केंद्रिय अन्वेषण विभाग प्रमुख अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश आस्थाना हे गेले काही दिवस एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यांच्या तक्रारी केंद्रीय सतर्कता आयोगापर्यंत गेल्या होत्या! केंद्रिय सतर्कता आयोगाने त्याची दखल घेऊन संबंधीतांकडे स्पष्टीकरणही मागितले होते. अलोक वर्मा यांनी त्याला दाद दिली नाही. आपल्याला हवे ते खटले सरन्यायाधीश देत नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांनी वार्ताहर परिषद घेऊन जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली होती, अगदी तशीच परिस्थिती सीबीआयमध्ये निर्माण करण्यात आली होती. इथेही अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात! सर्वोच्च न्यायालयासमोर उद्भवलेल्या पेचप्रसंगात मोदी सरकारने हस्तक्षेप केला नव्हता आणि या पेचप्रसंगातही केला नाही! भ्रष्टाचार निपटून काढायचा दृढनिर्धार केलेले पंतप्रधान एकीकडे आणि भ्रष्टाचार्‍यांविरुध्दची आरोपपत्र न्यायालयात दाखल होऊ नयेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करणारे सीबीआयचे झारीतले शुक्राचार्य, न्यायालयात दाखल झालेले खटले लांबणीवर टाकायचे हातखंडे वापरण्यात तरबेज असलेली मंडळी दुसरीकडे! प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचारी लॉबी कार्यरत आहे. केंद्रिय सतर्कता आयोगाच्या शिफारशीवरुन सीबीआयवर कारवाई होताच सीबीआयसह प्रवर्तन निदेशालय खडबडून जागे झाले! पी. चिदंबरम यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल झाले, अम्नेस्टी इंटरनॅशनल कार्यालयांवर धाडी पडल्या! याचा अर्थ भ्रष्टाचाराविरुध्दच्या लढाईला याआधी कुणीतरी कुणासाठीतरी खो घालत होते!
देशाच्या बाह्य शत्रूंशी शस्त्रास्त्रानिशी लढता येते, पण देशांतर्गत शत्रूंचा बिमोड करताना सरकारला घटनात्मक तरतूदींचे पालन करावे लागते. संबंधीतांचे हितचिंतक सर्वत्र दबा धरुन बसलेले असतात! शहरी नक्षल्यांना पोलिसांनी अटक करण्यापूर्वीच त्यांच्या वतीने त्यांचे सहानुभूतीदार सर्वोच्च न्यायालयात जातात! ज्याच्या फाशीच्या शिक्षेवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतरही प्रशांत भूषण प्रभूती त्या याकुब मेमनसाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाला धडका देतात, रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरांसाठी आपले कसब पणाला लावतात! मोदी सरकारने सीबीआयवर मध्यरात्री कारवाई केली म्हणून हीच मंडळी आता बोंबा मारत आहेत! राकेश आस्थाना यांची विशेष संचालक म्हणून नेमणूक झाली होती, तेव्हा पंतप्रधान मोदी आपली माणसं सीबीआयमध्ये घुसवत असल्याचा आरोप करणारी मंडळी आज त्याच आस्थानाला त्याच मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, तर आकाशपाताळ एक करत आहेत! प्रशांत भूषण वगैरेंसोबत खाजगी हॉटेलात वारंवार बैठका घेणारा अलोक वर्मा हा कुणाचा माणूस आहे, ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगून टाकले. सीबीआय प्रमुख अलोक वर्मा हे राफेलसंबंधी कागदपत्र जमा करत होते, म्हणून मोदींनी त्यांच्यावर कारवाई केली, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली! ही गोपणीय माहिती राहुल गांधी यांना कुणी दिली? अलोक वर्मा यांनी? राफेलसंबंधी कागदपत्र जमा करण्याचा आदेश अलोक वर्मा यांना कुणी दिला होता? राहुल गांधी यांनी? मोदी सरकारने तसा कुठलाही आदेश दिलेला नसताना अलोक वर्मा कुणाच्या सांगण्यावरुन आगाऊपणा करत होते?
अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाविरुध्द प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि अलोक वर्मा यांच्याविरुध्द चौकशीलाही स्थगिती दिली नाही! तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने अलोक वर्मा यांची सीबीआय प्रमुखपदी पुर्नस्थापना करा, त्यांच्याविरुध्दची चौकशी थांबवा म्हणून देशभर निदर्शने केली! अलोक वर्मा यांची पाठराखण राहुल गांधी कशासाठी करत आहेत? अलोक वर्मा कुणाची पाठराखण करीत होते?
मोदी सरकार सत्तेवर असतानाही महाराष्ट्रासह देशभरातले प्रतिष्ठित भ्रष्टाचारी अजून गजाआड कसे गेले नाहीत? असा सात्विक संताप आपण व्यक्त करीत असतो. मोदीजींनी त्यांच्याशी तडजोड केली की काय? अशी अभद्र शंकाही आपल्या मनात येऊन जाते. भाजपा सरकार सत्तेवर आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जादुची कांडी फिरल्यागत फटाफट व्हाव्यात अशी आपली अपेक्षा असते, पण त्यासाठी आपणही योगदान दिले पाहिजे, याचा मात्र विसर पडतो! काळ्या पैशाचा हिशोब मांडताना मोदींनी १५ लाखाचा उल्लेख केला होता. भारतावर असलेल्या कर्जाचा दरडोई हिशोब जर मोदींनी मांडला, तर ते फेडण्यासाठी १५ लाख मागणारांपैकी किती लोक पुढे येतील? इज्जत की रोटी शान से खानेवाले कभी किसी से भीक नही माँगते। भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होताच त्याला जनतेची सहानुभूती मिळते. तसे नसते, तर कलंकित व्यक्ती समाजात वर तोंड करुन फिरल्या नसत्या, परत परत निवडून आल्या नसत्या! कलंकीतांना, भ्रष्टाचार्‍यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणार आम्ही! ते जामीनावर सुटून आले की त्यांचे जंगी सत्कार करणार आम्ही! ज्याला दारातही उभं करु नये, त्याला डोक्यावर घेणार आम्ही! अशांना दंडीत करायचा मताधिकार आमच्या हातात असताना आम्ही त्यांना कायदेमंडळांत पाठविणार आणि त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, म्हणून वांझोटा संताप व्यक्त करणारेही आम्हीच! समाजाचा, मतदारांचा धाक वाटला असता, तर भ्रष्टाचाराच्या खटल्यात जामीन मागण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टाकडे निघालेल्या सोनिया-राहुल यांची जंगी मिरवणूक निघाली नसती! यांना जेव्हा अटक होईल, तेव्हा काँग्रेसवाले देशभर हैदोस घालतील! म्हणूनच मतदार भ्रष्टाचाराविरुध्द दंड थोपटून कार्यरत असलेल्या मोदी सरकारचा पराभव करतील आणि आपण परत सत्तेवर येऊ, अशी स्वप्नं विरोधक बघत आहेत. भूतकाळात असे अनेकदा घडले आहे. कांदे-बटाटेच्या बदल्यात महाभ्रष्टाचारी बोकांडी घेतले आहेत आम्ही! पेट्रोल-डीझल, सबसिडी-आरक्षण-कर्जमाफी यांच्या बदल्यात मोदी सरकारलाही हाकलून द्या, म्हणजे भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होणाचा प्रश्‍न कायमचा निकालात निघेल!
भारतीय मतदारांना भ्रष्टाचाराविषयी खरोखरच चीड असती, तर जयललिता, मायावती, लालु प्रसाद यादव पुन्हा पुन्हा निवडून आलेच नसते! विदूषकी चाळे करणार्‍या अरविंद केजरीवाल यांचे कुठले कर्तृत्व दिल्लीकरांनी बघितले होते म्हणून ७० पैकी ६७ आपी आमदार निवडून दिले? मर्यादा, नैतिकता, साधनसुचिता याचे काटेकोर पालन करणारे अटलजींचे सरकार आम्ही घालविले. स्वतःच पंतप्रधान व्हायला निघालेल्या सोनिया गांधी यांना घटनात्मक अडचणी आल्या, म्हणून त्यांनी कळसूत्री सरकार स्थापन करुन देशाची वाट लावली. तरीही सोनिया गांधी त्यागाची मूर्ती? दररोज भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम करणार्‍या सोनिया सरकारला आम्ही सलग दहा वर्षे तसे करायला संधी दिली! आज त्याच सोनिया मॅडम आपल्या खूशालचेंडू लेकाला पंतप्रधान म्हणून भारतावर लादण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत! आम्ही सोनिया गांधींना नीट ओळखलेले नाही, पण त्यांनी आम्हाला पुरते जोखले आहे! अटलजींचे सरकार घालविणारे फुकटे भारतीय मतदार मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाहीत, याची त्यांना खात्री वाटते. जामीनावर असलेल्या सोनिया गांधी यांना आमच्याविषयी वाटणारी खात्री हा आमचा नैतिक पराभव आहे!
इंदिरा गांधी यांचे दणक्यात पुनरागमन का झाले? चौधरी चरणसिंग यांनी इंदिरा गांधी यांना अटक केली. त्याचे भांडवल करीत इंदिरा गांधी यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्याची छायाचित्र तमाम वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठांवर झळकली. स्वतःच्या स्वार्थासाठी देशावर आणीबाणी लादून सार्‍या देशाचा तुरुंग बनविणार्‍या इंदिरा गांधी रातोरात इंदिरा अम्मा झाल्या आणि भावनाप्रधान भारतीयांनी त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी नेवून बसविले! सोनिया-राहुल यांना तशी संधी मिळू नये याची खबरदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत.
इंदिरा हत्येनंतर काँग्रेसवाल्यांकडून देशभर हजारो बेकसूर शिखांचे शीरकान करण्यात आले, राजीव गांधींनी त्याचे जाहीर समर्थन केले, तरीही सहानुभूती शिखांऐवजी राजीव गांधींना मिळाली आणि आम्ही काँग्रेसचे चारशेहून अधिक खासदार निवडून दिले! राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले! भारतीय मतदार फार लांबचा विचार करत नाहीत. क्षणिक भावनेच्या भरात वहावत जातात. देशहिताचा दूरगामी विचार करणार्‍या नरेंद्र मोदी यांना भारतीय मानसिकतेची पुरेपूर जाणीव आहे. भ्रष्टाचारी, देशद्रोही यांच्या मुसक्या तर आवळायच्या आहेत, पण त्यांना इमोशनल ड्रामा करुन जनतेची सहानुभूती मिळवायची संधी उपलब्ध करुन द्यायची नाही, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली आहे! शस्त्र न वापरता शिकार करायची आणि युध्द न करता शत्रूला लोळवायचे! आत्महत्या करायला निघालेल्या विरोधकांवर गोळीबार करायचा नसतो, हे नेपोलियन सूत्र मोदींनी आत्मसात केले आहे. काँग्रेस, चीन, पाकिस्तान यांनी मोदींच्या याच कार्यशैलीचा धसका घेतला आहे!
आपल्या शपथविधी सोहळ्यास पाकिस्तानला सन्मानाने बोलावून, काबुलहून मायदेशी परतताना अचानक लाहोरला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक संदेश दिले होते, पण पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ झाले नाही. जगातल्या वेगवेगळ्या देशांनाही तसे संदेश दिले होते. चीन, पाकिस्तान आणि काँग्रेसला ते नीट वाचता आले नाहीत. आज या तिघांना एकमेकांशिवाय जगात कुणीही मित्र उरला नाही! भारतातील मुसलमान, पाकिस्तान, अरब यांना काय वाटेल याचा सतत विचार करणार्या काँग्रेसने सहिष्णू हिंदुंची, दिलदार इस्त्रायलची सतत अवहेलना केली. आज इस्त्रायल आणि अरब जगत यांची भारताशी प्रगाढ मैत्री आहे! शस्त्रास्त्र विक्री करार करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारतात आले आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे स्वागत केले! मोदींनी द्विध्रुवीय जगाला भारताची दखल घेणे भाग पाडले! भारत जगाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे! केवळ साढे चार वर्षात मोदींनी ही किमया केली आहे. वंदे मातरम्!

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (350 of 1287 articles)

Narendra Modi 4
सारांश : ल.त्र्यं. जोशी | चार वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून एकही महिना असा गेला नसेल की, जेव्हा त्यांच्यासमोर कोणतेही ...

×