ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी ‘नोटबंदी!’

सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी ‘नोटबंदी!’

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Modi Notebandi

Modi Notebandi

नोटबंदीचे भारताला जे अनेक फायदे दीर्घकाळ होणार आहेत, त्यात सर्वात विलक्षण फायदा असेल तो सर्वसामान्य माणूस हा अर्थव्यवस्थेविषयी भडाभडा बोलू लागला. सरकार कररूपी उत्पन्नावर चालते आणि चांगली करवसुली अतिशय महत्त्वाची आहे, याचीही तो चर्चा करू लागला. ‘पब्लिक फायनान्स’ चांगला असलेल्या देशात सार्वजनिक सेवासुविधा चांगल्या असण्याची शक्यता असते, हे त्याला कळू लागले. आपले आयुष्य चालविणार्‍या चलनाविषयी त्याला कुतूहल वाटू लागले. आपल्या देशाचे आणि आपल्या गावाचेही बजेट काय असते आणि त्याचा आणि आपला काय संबध आहे, हे तो अडखळत का होईना समजून घेऊ लागला. काळा पैसा फार झाला, याची तो केवळ चर्चा करत होता, पण ‘कर चुकविलेला पैसा म्हणजेच काळा पैसा!’ हे त्याला आता चांगले कळू लागले आहे. आपण बँकिंग करण्याचा आणि देशाच्या अर्थकारणाचा काही संबंध आहे, हे त्याला कधीच पटत नव्हते, पण आता देशाच्या तिजोरीत हक्काने आणि प्रामाणिकपणे हात घालण्याचा, बँकिंग करणे, हाच कसा खात्रीचा मार्ग आहे, हेही त्याने जाणले आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांची रक्कम वितरित करताना सर्व मध्यस्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने काढून टाकले तर व्यवहार पारदर्शी होतो म्हणजे काय, हे त्याला आपल्या खात्यात जमा होणार्‍या अनुदानाच्या रकमेमुळे लक्षात येऊ लागले. यातून सरकारचे इतके हजार कोटी वाचले म्हणजे आपलेच पैसे कसे वाचले आहेत, याचाही उलगडा त्याला होऊ लागला आहे. आता एक महत्त्वाची पायरी तेवढी राहिली आहे, ती म्हणजे जीडीपी नावाच्या सतराव्या शतकातल्या पाश्‍चात्त्य जुनाट संकल्पनेतून बाहेर पडण्याची. त्यातूनही भारतीय माणूस लवकर बाहेर पडेल, अशी खात्री वाटते. कारण त्याला केवळ सुखासाठी जगणे माहीत नाही, त्याला आनंदी जगायचे आहे.
ज्यांना पुस्तकातील अर्थशास्त्राचे धडे गिरवून अर्थतज्ज्ञ व्हायचे आहे, त्यांनी जीडीपी म्हणजे काय, ही संकल्पना कुणी आणि कधी आणली आणि जगाने ही संकल्पना कशी स्वीकारली, याची पारायणे जरूर करावीत. त्यांना परीक्षा पास करून आपले करीयर करायचे आहे. पण, जीडीपीच्या नावाने जगात जे चालले आहे, ते थांबवण्याची आता वेळ आली आहे. ‘एका वर्षभरात देशात एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती वाढले, याला जीडीपी म्हणतात’ आणि ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो!’ या न्यायाने जगात जीडीपी वाढीची स्पर्धा चालली आहे. या स्पर्धेत देशातील नैसर्गिक साधनांपासून मानवी संबंधापर्यंत सर्व गोष्टीचे पैशीकरण झाले पाहिजे, अशी अट आहे. थोडक्यात, माणुसकीचा आणि जीडीपीचा काहीएक संबंध नाही. कुत्रे मागे लागल्यासारखे पळत राहा, एवढेच जीडीपी सांगत राहते आणि जीडीपी वाढला, एवढाच निकष पुस्तकातच अर्थशास्त्र शिकलेले मानू लागतात. कारण पाश्‍चिमात्य देशांना तेवढेच माहीत आहे. त्या बहुतांश देशांना निसर्गाने साथ दिलेली नाही. त्यामुळे निसर्गाशी दोन हात केल्याशिवाय त्यांना जगताच येत नाही. हाडे फोडणार्‍या थंडीपासून वाचविण्यासाठी त्यांना प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. मानवी आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या वादळांचा वेळोवेळी मुकाबला करावा लागतो आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडला तर आनंदोत्सव साजरा केला जातो, इतका तो दुर्मिळ आहे. त्यामुळे रोगराई भरपूर आहे. शिवाय अशा काही राजवटींचा आणि युद्धांचा अनुभव त्यांनी घेतला आहे की, मानवी आयुष्याची विटंबना त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागली आहे. अर्थात, त्यातूनच तावूनसुलाखून त्या समाजाला मानवी आयुष्याचे मोल कळले आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्था मजबूत केल्या आणि त्यातील मानवी हस्तक्षेप जेवढा म्हणून काढून टाकता येईल, तेवढा काढून टाकला आहे आणि अजूनही आर्टिफिशियल इंटलिजियन्सच्या माध्यमातून सर्व कामे यंत्रेच कशी करतील, असा प्रयत्न ते करत आहेत. कारण त्यांची लोकसंख्याच कमी आहे. कामे करायला माणसेच नाहीत. अशा या सर्व पार्श्‍वभूमीवर जीडीपी वाढीच्या राक्षसाला त्यांनी जन्म दिला असून, ज्या अनेक गोष्टी आपण बिनडोकपणे घेतल्या तसाच जीडीपी आपण घेतला आहे. त्याचा आणि काही मोजक्या लोकांच्या सुखाचा निश्‍चित संबंध आहे, पण त्याचा आणि बहुजनांच्या आनंदाचा काही संबंध नाही, हे समजून घेतले पाहिजे.
आपण आठवून पाहा. जागतिकीकरणानंतर आपल्याकडे जीडीपीचे कौतुक जास्त सुरू झाले आहे. तोपर्यंत भारतीय विकासाला ‘हिंदू ग्रोथ रेट’ म्हटले जायचे. याचा अर्थ असा की, ती अशी वाढ होती, जी सर्वांना सोबत घेऊन जात होती. विषमता होती, पण ती इतक्या टोकाची नव्हती. जीडीपी वाढीचे हे कौतुक मनमोहन सिंग यांच्यासारख्या हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊन येणार्‍या तज्ज्ञांना जास्त आहे. कारण तेथे तेच शिकविले जाते आणि त्यांच्यासमोर दोन-चार कोटी लोकसंख्येच्या टिंबक देशांची उदाहरणे ठेवली जातात. पण, भारतासारख्या अब्जात लोकसंख्या असलेल्या देशाला वेगळ्या अर्थकारणाची गरज आहे, असा विवेकी विचार केला गेला नाही. त्यामुळेच जीडीपी अधिक वाढला त्या काळात भारतात बहुसंख्य असलेला शेतकरीवर्ग आत्महत्या करू लागला होता. शेती हा ज्या देशाचा मुख्य व्यवसाय होता, त्याचा विकास खालीखाली चालला होता आणि या देशाला माहीत नसलेले सेवाक्षेत्र सुसाट सुटले होते. जीडीपीच्या भाषेत बोलायचे, तर आज जीडीपीत सेवाक्षेत्राचा वाटा ५५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शेती १५ टक्क्यांच्या खाली घसरली आहे.
नोटबंदीनंतरचे मनमोहन सिंग यांचे भाकीत आठवून पाहा- ‘‘नोटबंदीमुळे जीडीपीला दोन टक्क्यांचा फटका बसेल,’’ असे ते म्हणाले होते. पण, जीडीपीची वाढ आणि संपत्ती वितरणाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण काही केले पाहिजे, असे शब्द मात्र त्यांच्या तोंडातून निघाले नाहीत आणि आजही निघत नाहीत. कारण अशा अर्थतज्ज्ञांना अर्थव्यवस्थेतील सूज स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला सोपी वाटते. या सुजेमुळे काही मोजक्या लोकांची पोटे फुगत जातात आणि सरकार नावाची व्यवस्था त्यांच्या ओझ्याखाली दबू लागते. जमिनीच्या अवा की सवा वाढलेल्या किमती, कोटी कोटी रुपयांची घरे आणि श्रीमंतीचे वाढत चाललेले हिडिस प्रदर्शन याला अर्थव्यवस्थेत सुधारणा असे नाव दिले गेले. वाढलेली संपत्ती मोजक्या लोकांच्या खिशात जिरते आहे आणि त्यांचे परदेशातील बँक बॅलेंस वाढत चालले आहे, बँकेतील पैशांची कर्जे घेऊन लूट चालली आहे, याला विकास म्हटले गेले. जीडीपी वाढतो आहे तर शेतीची अशी दुर्दशा का होते आहे, असा साधा प्रश्‍न या तज्ज्ञांना पडला नाही. जीडीपी वाढ म्हणजेच कसे सर्वस्व आहे, याचे समर्थन करणारी लाचार फौज मग आपोआप उभी राहते. तेही स्वत:ला तज्ज्ञ म्हणवून घेत असतात. पण, तुम्ही एवढे तज्ज्ञ आहात, तर आपल्या देशातील एवढ्या प्रचंड संपत्तीचे न्याय्य वितरण का झाले नाही, जीडीपीच्या वाढीसोबत विषमताच का वाढत चालली आहे, याचे त्यांच्याकडे काहीच उत्तर नसते. तुम्ही स्वत:ला अर्थतज्ज्ञ म्हणवता, तर बँकिंग करता येणे, हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार ७० वर्षांत त्यांना का दिला नाही, या प्रश्‍नावर ते काहीच बोलत नाहीत. आपण स्वत:च्या आयुष्यात बँकिंगचे फायदे घेऊनच भौतिक सुखे अनुभवत आहोत, हे मान्य करण्याची त्यांना लाज वाटते. अशी आहे जीडीपीच्या वाढीची लबाडी, जो निव्वळ संख्येचा खेळ आहे. पण, एवढ्या मोठ्या देशाला त्या मापात बसविण्याचा आटापिटा केला गेला.
केवळ देशाची सूज दाखविणारा जीडीपी, हा नोटबंदीच्या निर्णयाने कमी होत असेल तर तो कमीच झाला पाहिजे. संपत्तीचे न्याय्य वाटप होणार असेल, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार असतील, घरांच्या किमती कमी होणार असतील, सर्वांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार असेल, रोजगार वाढणार असेल, तर जीडीपीच्या वाढीचे कुणीही स्वागत करील. पण, केवळ काही लोकांच्या ताटात पक्वान्न पडत असतील आणि बाकीच्यांना त्याकडे आशाळभूतपणे पाहण्याची वेळ येणार असेल, तर ती जीडीपीची रोगट वाढ आपल्याला नको आहे. आनंद आणि समाधानासाठी जगणार्‍या भारतीय समाजाने विकासाचे आपले निकष आपणच ठरविण्याची वेळ आली आहे. भारताला केवळ विकास नको आहे, भारताला हवा आहे शाश्‍वत विकास. शाश्‍वत विकास म्हणजे जीडीपीच्या वाढीची स्पर्धा नव्हे! शाश्‍वत विकास म्हणजे मानवी आयुष्याच्या पैशीकरणाला नाही म्हणण्याचे धाडस करणे. ते धाडस नोटबंदीसारख्या एका वळणापासून सुरू होते. अर्थशास्त्राच्याच भाषेत, देश पुढे जाण्यासाठी काय काय झाले पाहिजे, याची उजळणी केली तर असे लक्षात येते की, कर देणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. (कर जीडीपी रेशो), आर्थिक व्यवहार पारदर्शी झाले पाहिजेत. जास्तीत जास्त नागरिकांनी बँकिंग केले पाहिजे आणि त्या माध्यमातून भांडवल स्वस्त झाले पाहिजे, पब्लिक फायनान्स सुधारला पाहिजे. सरकारी महसुलाची नासाडी थांबली पाहिजे. व्यवहारातील अधिक मूल्याच्या नोटा कमी झाल्या पाहिजेत. बनावट नोटांचे प्रमाण कमी झाले पाहिजे. रोखीतून अमली पदार्थ, दहशतवाद, गुंडगिरी आणि भ्रष्ट राजकारण आणि प्रशासन पोसले जाते, त्याला पायबंद बसला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे जगणार्‍यांना स्वाभिमानाने आणि आनंदाने जगता आले पाहिजे. हे सर्व होण्यासाठी कुठेतरी सुरुवात होण्याची गरज होती. ती नोटबंदी नावाच्या ऑपरेशनने झाली आहे. त्यामुळे त्यावरून बाजूने आणि विरोधात काय राजकारण होते आहे, हे आज महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे, ते देशाचा स्वभाव बदलण्याची दिशा या आमूलाग्र बदलातून मिळाली आहे. जागरूक भारतीय नागरिकांनी अशा तात्कालिक वादांना महत्त्व न देता नोटबंदीसारख्या आमूलाग्र बदलांत देशाचे उज्ज्वल भवितव्य पाहिले पाहिजे.
हा तो काळा पैसा
रिझर्व बँकेच्या अहवालानुसार, नोटबदलीत १३००० कोटी रुपये परत आलेले नाहीत. या काळात २३,९४२ कोटी रुपये छाप्यांत जप्त करण्यात आले आहेत. म्हणजे ३६,००० कोटी रुपये जमा झाले. ज्यांनी नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर रोख जमा केली अशा १८ लाख संशयित खात्यांची चौकशी सुरू आहे, त्यातून
१.५ कोटी रुपये
अर्थव्यवस्थेत येतील, असा नीती आयोगाचा अंदाज आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ज्या हजारो बनावट कंपन्या वापरल्या जात होत्या, त्यांची चौकशी सुरू आहे. २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ३५० कोटी पिसेसवरून १५ कोटी पिसेसवर खाली आले आहे. त्यामुळे रोखीचे आणि हवाला व्यवहाराचे प्रमाण आणखी कमी होईल. डिजिटल व्यवहार वाढले आहेत आणि देशातील तरुणांनी ते स्वीकारले आहेत, त्यामुळे यापुढे ते वेगाने वाढत जातील. एका आमूलाग्र बदलातून छोट्यामोठ्या चांगल्या बदलांची एक साखळीच तयार झाली आहे. नोटबंदी आणि त्यासोबत केले गेलेले बदल याकडे केवळ राजकीय विषय किंवा इव्हेंट म्हणून न पाहता एक प्रक्रिया म्हणून पाहिले की, हे बदल दिसायला आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित होण्यास इतर दाखल्याची गरज लागत नाही.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (500 of 1287 articles)


तोरसेकर | वाहिन्या असोत किंवा वर्तमानपत्र असो, त्यात बातम्या कमीअधिक प्रमाणात सारख्याच असतात. पण, आपापल्या अजेंडानुसार काही बातम्या ठळक केल्या ...

×