ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून आपण आपल्या सरकारचं प्रगतिपुस्तक सादर करून भविष्यकालीन योजना देशवासीयांसमोर मांडल्यात. ‘‘मेरे सवा सौ करोड प्यारे देशवासीयों…’’ कुणाला साद घालत आहात मोदीजी? ऐकू येत असूनही बहिरं असल्याचं सोंग घेतलेल्यांना? विकास हवाच आहे हो मोदीजी, पण त्या विकासप्रक्रियेला हातभार लावण्याची तत्परता, उपभोग घ्यायची शालीनता किती भारतीयांकडे आहे? मुळात प्रत्येक भारतीय नागरिकाला दिल्या गेलेल्या घटनात्मक मताधिकाराचे मूल्य किती नागरिकांना समजते आणि किती नागरिक मताधिकाराचा उपयोग निखळ राष्ट्रहितासाठी करतात? कुणासाठी झिजताय् आपण?

आदरणीय मोदीजी, सविनय प्रणाम!
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून आपण आपल्या सरकारचं प्रगतिपुस्तक सादर करून भविष्यकालीन योजना देशवासीयांसमोर मांडल्यात. ‘‘मेरे सवा सौ करोड प्यारे देशवासीयों…’’ कुणाला साद घालत आहात मोदीजी? ऐकू येत असूनही बहिरं असल्याचं सोंग घेतलेल्यांना? विकास हवाच आहे हो मोदीजी, पण त्या विकासप्रक्रियेला हातभार लावण्याची तत्परता, उपभोग घ्यायची शालीनता किती भारतीयांकडे आहे? मुळात प्रत्येक भारतीय नागरिकाला दिल्या गेलेल्या घटनात्मक मताधिकाराचे मूल्य किती नागरिकांना समजते आणि किती नागरिक मताधिकाराचा उपयोग निखळ राष्ट्रहितासाठी करतात? कुणासाठी झिजताय् आपण? मताधिकार विकणार्‍यांसाठी? विकत घेणार्‍यांसाठी? कुणाच्या तरी हातातले कळसूत्री बाहुले होऊन नाचणार्‍या- विकल्या गेलेल्या मीडियासाठी? अरब अमिरातीने जाहीर न केलेल्या मदतीबद्दल आभार आणि अभिनंदनाचे लाल-हिरवे फलक लावणार्‍यांनी, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत असलेल्या हजारो संघस्वयंसेवकांचे साधे आभार मानायलाही नकार दिला आहे, अशा भामट्यांसाठी? भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध केलेली धाडसी लक्ष्यभेदी कारवाई यशस्वी होऊनही तिच्याविषयी शंका उपस्थित करणारे राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांसाठी? उद्या भारताचे शत्रुराष्ट्रांबरोबर युद्ध पेटले आणि त्याच्या झळा पोचू लागल्या, तर त्या झेलण्याची सहनशक्ती किती खुशालचेंडू, भोगासक्त भारतीयांकडे आहे? इंधनाच्या किमती पाचपन्नास पैशांनी वाढल्या, कांदे-बटाटे महागले, तरी बोंबाबोंब होते इथे! कुण्या भामट्याने मीठ उत्पादन बंद झाल्याची खोडसाळ पुडी सोडली, तर मीठ खरेदीसाठी केवढी झुंबड उडाली होती? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच राष्ट्रीय चारित्र्यबांधणीचे जे काम हाती घ्यायला हवे होते, ते घेतले गेले नाही! उलट सत्ताप्राप्तीचा एक मार्ग म्हणून नागरिकांचे सरकारवरील अवलंबित्व कसे वाढेल, याचाच प्रयत्न केला गेला! म्हणून तर मोदीजी, तुम्हाला अहोरात्र जी काही कामं करायची असतील, ती करा, पण आम्ही काय करावे, ते मात्र सांगू नका म्हणणारी प्रवृत्ती वाढत गेली! पारदर्शक व्यवहारासाठी आपण अंगुठा लावायची जी यंत्रं पाठवली आहेत, ती ज्यांना नाइलाजाने वापरावी लागत आहेत, ती मंडळी अस्वस्थ आहेत! फडणवीस-मोदी सरकारांनी आमची वाट लावली म्हणून पुटपुटत असतात, पण अशी यंत्रं आपण कुठे कुठे लावणार हो मोदीजी? नैतिकतेचं यंत्रंच बिघडलंय् ते कुरकुरणारच ना? बसायला अबलख घोडा जरी दिला तुम्ही, तरी नाल दिलेच नाहीत म्हणून नाराज होतील आणि घोडाच विकून टाकतील कसायाला? अहो, गेले ते दिवस! सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि त्याला घडवणारे आचार्य चाणक्य, नालंदा, तक्षशिला, सिंधू विस्मृतीत गेले! ना खंत, ना खेद! तुमचे, आमचे पंतोजी मास्तर? शिकवायचे कमी, पण प्रश्‍नांचा भडिमार करून, छडीचा वापर करून, विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून, त्यांना स्वतःच शिकायला प्रेरित करायचे! आता छडी वापरायला अधिकृत बंदी आहे आणि प्रश्‍न विचारायला अलिखित बंदी आहे! प्रश्‍न विचारलेले हल्ली कुणालाच आवडत नाही! उत्तरदायित्वाचा तर प्रश्‍नच येत नाही! मोदीजी, तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिलंय् ना आम्ही? पाच वर्षांनंतर काय करायचं ते आम्ही बघू, पण उगीच हंटर घेऊन आमच्या मागं लागू नका. हा माणूस स्वतःही झोपत नाही आणि इतरांनाही झोपू देत नाही? न खाऊंगा, ना खाने दुंगा! नवीनच काहीतरी?
राष्ट्राच्या भल्यासाठी घरादारांवर तुळशीपत्र ठेवणारी बहुतेक वेडी पिढी इतिहासजमा झाली मोदीजी! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बॅरिस्टर होते! लंडनमध्ये वकिली केली असती, तर लॉर्ड सावरकर झाले असते! ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणत मातृभूमीसाठी सागरात उडी घेतली! काळ्या पाण्याची अंधारकोठडी, पायात मणामणाच्या बेड्या आणि मुखातून ‘स्वतंत्रते भगवती!’ ब्रिटिश, काँग्रेस यांनी स्वातंत्र्यवीरांना छळलेच हो, पण आम्हीही त्यांची अवहेलना करण्यात मागे नव्हतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपेक्षा केली आणि त्यांच्या अनुयायांना मतं देणारे यंत्र म्हणून वापरले! आजपर्यंत ते आरक्षणाच्या कुबड्या फेकून देण्याइतपत मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे होते. प्रकांड पंडितांची उपेक्षा करून नामधारी पंडिताच्या मागे धावण्याची फळं भोगतो आहे सारा देश! अजूनही डोळे उघडले नाहीत आमचे! स्वदेशीची अवहेलना करून, विदेशी बोकांडी घेऊन बसलो आहोत आपण! नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू गेले! आदरणीय डॉ. अब्दुल कलामजी, चार सुटकेसेस घेऊन राष्ट्रपतीभवनात प्रवेशते झाले आणि पाच वर्षांनंतर, त्याच चार सुटकेसेस घेऊन बाहेर पडले! उच्च कोटीचा संन्यासी फकीर! आम्ही त्यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती केले नाही! अटलजींना पूर्ण बहुमत दिले नाही! एक मत कमी पडले म्हणून त्यांना त्यागपत्र द्यावे लागले! सारा भारत देश हळहळला, पण त्यांनाही आम्ही दुसरी संधी दिली नाही! गेले, दोन्ही भगीरथपुत्र गेले!
गोरगरिबांचा खटला फुकट चालवून त्यांना जेवायला घालणारे वकील गेले. चिखलापाण्यातून, काट्याकुट्यातून वाट तुडवत विद्यार्थ्याला खांद्यावर घेऊन शाळेत जाणारे गुरुजी गेले. घरात गोडाधोडाचा बेत असेल, तर पहिलं ताट गुरुजींकडे पाठवणारी कुटुंबं गेली. एक काळ होता मोदीजी, प्रत्येक क्षेत्राचं नेतृत्व नि:स्वार्थी आचार्यांकडे होते. आपल्या वसतिगृहातील लेकरांसाठी प्रसंगी धर्मपत्नीच्या अंगावरील किडुमिडुक मोडणारे कर्मवीर गेले! धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी अविवाहित राहणारा थोरला दादा गेला, नणंदेच्या विवाहासाठी हातातल्या पाटल्या काढून देणारी वहिनी गेली! देव, देश आणि धर्मासाठी एकतरी अपत्य अर्पण करणारे कर्तव्यकठोर मातापिता गेले. गोवंशावरही आप्तस्वकीयांप्रमाणे अंत्यसंस्कार करणारा कृषक समाज संपला! कुणासाठी आणि कोणासमोर अरण्यरुदन करत आहात मोदीजी? आम्हाला त्यांच्यासारखं वागायला सांगू नका, प्रत्येक गोष्ट सरकारनेच केली पाहिजे, असं म्हणणार्‍यांसाठी? स्वतःच्या वृद्ध मातापित्यांकडे ढुंकूनही न बघता मोदींनी पक्षातल्या ज्येष्ठांवर अन्याय केला राव म्हणून नक्राश्रू ढाळणार्‍यांसाठी? मोदीजी, दिल्ली-मेरठ भव्य महामार्गाचे ज्या दिवशी आपण लोकार्पण केले, त्या दिवशी आम्ही सिंगापुरात असल्याचा भास झाला आणि आठवडाभरात महामार्गावरील सोयीसुविधांची वाट लावली आम्ही!
सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा, हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे! बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची कल्पना ज्या कुठल्या कल्पक अधिकार्‍याला सुचली असेल, त्याने भारतीय नागरिकांचे योग्य आकलन केले! तेजस या आधुनिक, वेगवान रेल्वेत सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी पडले. हातगाडीवर टाकून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला. प्राणिसंग्रहालयात, पिंजर्‍यातील माकड जाळीजवळ आल्यावर, त्याच्या अंगाला खाजखुजली लावली आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाले, त्याचा व्हिडीओ कुणीतरी फेसबुकवर टाकला होता! रात्रीबेरात्री ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत वाजवत गाड्या उडवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे थुंकणारे, ऐतिहासिक इमारतींवर स्वतःचे आणि स्वतःच्या टिनपाट मित्र-मैत्रिणीचे नाव कोरणारे, कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे, रेशन-रॉकेल वितरणात काटा मारणारे, सार्वजनिक उत्सवात लोकवर्गणीवर डल्ला मारणारे, सणोत्सवात फुकटची दारू पिऊन नाचणारे, रस्त्यावरची बाकडी, रस्तादुभाजक, फरशा चोरून विकणारे, एसटी, रेल्वेचे सीटकव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे… परदेशी जाऊन आलेली मंडळी तिकडच्या व्यवस्थांचे गोडवे गाताना इथल्या व्यवस्थांना नावे ठेवतात, पण तिकडच्या व्यवस्था ज्यांनी निर्माण केल्या आहेत, त्या नागरिकांसारखं आपणही इथं वागलो, तर आपणही तशा व्यवस्था निर्माण करू शकू, याचा विचारच करत नाहीत. सरकार काय कधीही बदलता येईल, पण जे दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे? अपघातग्रस्त वाहनातील पेट्रोल पळविण्यासाठी, सवलतीत, जातींच्या नावावर काही मिळत असेल, तर त्यासाठी कितीही लाचार व्हायला तयार होतात. या महिन्यात वरचे पैसे एवढे मिळाले की पगाराला हातच लागला नाही! असं निर्लज्जपणे सांगणारे महाभाग या देशात आहेत! याला गरिबी नाही, फुकटीवृत्ती कारणीभूत आहे! सरकारकडे काहीही न मागता, उलट देशालाच काही देणारांची संख्या किती असेल भारतात? सतत भीक मागणारे, त्याग करू शकतील?
मोदीजी, मागच्या पत्रात मी, जांभळीच्या झाडाखाली झोपलेल्या माणसाची गोष्ट सांगितली होती. वासलेलं तोंड दुखायला लागलं, पण जांभूळ काही तोंडात पडले नाही, म्हणून तो झाडच तोडायला निघाला होता! दुसरा कुणी म्हणाला असता, अरे झाड कशाला तोडतोस? तू झोपून राहा. मी मूठभर जांभळं तुझ्या तोंडात टाकतो आणि पोतंभर माझ्या घरी घेऊन जातो! तुम भी खुष, हम भी खुष! पण आपण म्हणालात, त्याच माणसाला पुढच्या पिढ्यांसाठी जांभळीची बाग लावायला मी प्रेरित करीन! जवळ पडलेली जांभळं उचलून स्वतःच्या तोंडात टाकायचा आळस करणारा माणूस, इतरांसाठी झाडं लावून जोपाशील? मोदीजी, त्या माणसाचे वारसदार आज सर्वच क्षेत्रात पसरले आहेत. तुला काय पाहिजे? हे घे आणि गप्प बैस! आम्ही काय, कुठं, किती खातोय्? याची चौकशी करू नकोस. आजपर्यंत हे असंच चालत आलंय्! आपण म्हणताय्, न खाऊंगा, ना खाने दुंगा!
दिल्लीत नरेंद्रजी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी! शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना एवढी खळखळ करतं का कुणी? सरसकट कर्जमाफी देऊन टाकायची आणि व्हायचं मोकळं. पण नाही! बारीकसारीक, नाजूक प्रश्‍न विचारत बसले देवेंद्रजी? तुम्ही डॉक्टर, प्रोफेसर, वकील, गुत्तेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधी आहात ना? तालेवार जमीनदार आहात ना? मग तुम्ही ऐपत असूनही शेतकर्ज थकवले, तुम्हाला कर्जमाफी नाही! आजपर्यंत आमची ऐपत कुणी काढली नव्हती हो? शेतकर्ज माफ करायचे सोडून, आमच्या इतर उचापतींचे लेखापरीक्षण करत बसले फडणवीसजी? असं कुठं असतंय् का? कर्ज माफ होत असतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तुम्हीच पहिल्यांदा कर्जमाफी करताय् की काय? यांच्यासाठी रात्रीचा दिवस करताय् मोदीजी? काही विकृती प्रत्येक क्षेत्रात आहेत. चोराला चोर म्हटलं की राग येतो आणि आपण प्रत्येक क्षेत्रातल्या अशा मंडळींना दुखावले आहे! काही अपवाद वगळता, आधीची सरकारं प्रसारमाध्यमांसह या सार्‍यांशी जुळवून घेत होती म्हणून त्यांच्या राजवटी सुरळीत चालल्या! आपण डोंगराएवढे काम करत असला, तरी न खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणत त्यांच्याच जिवावर उठलात? नोकरशाहीसह या मंडळींना कसं सांभाळायचं आणि त्यांच्याकडून आपली अर्थपूर्ण कामं कशी करून घ्यायची, यात तरबेज असलेली जाणती मंडळी अवतीभवती उपलब्ध असताना, त्यांच्याकडून सल्ला घेण्याऐवजी, त्यांनाच अडचणीत आणायचे?
मोदीजी, तुमच्याकडे आणि फडणवीसांकडे बघून, आपण जो उमेदवार दिला, मग तो आयात केलेला का असेना, त्याला आम्ही निवडून दिला! अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही भाजपाच्या ताब्यात दिल्या, पण तिथे कुठे भाजपा जाणवतच नाही? नरेंद्र-देवेंद्र कार्यशैली तिथपर्यंत झिरपलीच नाही. सत्ता टिकवायची असेल, तर जनतेची कामं करावी लागतात, मतदारसंघ सांभाळावे लागतात! एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे, बॅनर लावणे, हारतुरे स्वीकारणे, त्याचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापून आणणे, याच्या पलीकडे जाऊन पक्षाची विचारधारा शेवटच्या पायरीवर बसलेल्यांपर्यंत पोहचवणे, सरकारी योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाणे, ही कामं सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी निरंतरपणे करायला हवीत! महिन्यातून किमान एकदा जरी आपण त्यांच्यापर्यंत पोहचलात, तरी मतदानाच्या दिवशी ते आपल्याच बुथवर येतील! नरेंद्र-देवेंद्रच्या नावावर आपण पुन्हा सहज निवडून येऊ, असं जर कुणाला वाटत असेल, तर ती फार मोठी आत्मवंचना ठरेल! काँग्रेसची आज एवढी घसरण झालेली असली, तरी ती भारतभर टिकून आहे, स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलेल्या मतदारसंघाच्या मजबूत बांधणीमुळे! म्हणून तर काँग्रेसने कुठल्याही मतदारसंघात कुणालाही उमेदवारी दिली, तरी त्याला निवडून आणायची जबाबदारी ज्यांनी तो मतदारसंघ बांधलाय् त्याची असायची! भाजपाच्या किती स्थानिक नेत्यांनी आपापले मतदारसंघ या पद्धतीने बांधले आहेत? निमूटपणे काम करणार्‍या संघस्वयंसेवकांची कुमक नाही मिळाली, तरी आपल्या कार्यकर्त्यांच्या हिमतीवर निवडून यायची धमक किती भाजपा नेत्यांकडे आहे? म्हणून तर शाह-मोदींना इतर पक्षातील अशा उमेदवारांची आयात करावी लागते, ज्यांनी आपल्या मतदारसंघाची मजबूत बांधणी केली आहे! आपण कुणासाठी राबत आहात मोदीजी?
मोदीजी, आमच्या मराठवाड्यात भाद्रपदात पितृपंधरवडा असतो. दररोज भोजनाची आमंत्रणं असायची! आम्ही त्यांच्याच घरी भोजनाला जायचो, ज्यांच्या घरी भोजनोत्तर पानसुपारीसाठी एक रुपया मिळत असे! एकदा एक पुत्रवत्सल आजी आमच्या गावात कुठून आली होती माहीत नाही, पण तिने आमचे डोळे खाड्कन उघडले! त्या आजीच्या डोक्यावर तिच्या बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वरदहस्त ठेवला होता म्हणे! म्हणाली, बाळांनो, भोजनाला अशाच घरी जावे, ज्या घरी सात्त्विक आहार मिळतो! सात्त्विक आहार बुद्धीला भ्रष्ट होऊ देत नाही! त्या दिवसापासून आम्ही भोजनोत्तर पानसुपारीचा मोह टाकला. सामान्य माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारा समाजपुरुष कधी, कुठल्या रूपात भेटेल, साद घालील, सांगता येत नाही! त्यासाठी आपण अखंड सावधान असले पाहिजे…!

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (488 of 1287 articles)

Kerala Nuns Protest
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव जिल्ह्यात बलात्कार झाला तेव्हा जे लोक चवताळून उठले होते, त्यापैकी कोणालाही आज ...

×