ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » सामान्य माणसाचे देशाप्रती कर्तव्य

सामान्य माणसाचे देशाप्रती कर्तव्य

॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

इतर विकसित देशांची तुलना करता- त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात, ते नियम मोडणार्‍याला, मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी त्याला शिक्षा होते, ते न चुकता कर भरतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे, ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो.

India Flag

India Flag

स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरू होत असत. शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम् असायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या. यातील बर्‍याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत.
मी या देशासाठी काय करतो?
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. याची कारणे अनेक आहेत. आपण साधे देशातले नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांची तुलना करता, त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात, ते नियम मोडणार्‍याला, मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी त्याला शिक्षा होते, ते न चुकता कर भरतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. येथे शांतता राखा, असे लिहिले असेल तिथे हमखास कलकलाट असतो, ‘येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या पाटीवरच लाल पिचकार्‍यांची रांगोळी असते. ‘नो पार्किंगची पाटी असते, तिथेच गाड्या आडव्या तिडव्या लावलेल्या असतात. ‘कृपया रांगेची शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. ‘येथे स्वच्छता राखा’ असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्‍याचा डोंगर असतो. एक ना अनेक, म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा असते.
आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे देशातले सगळ्यात मोठे स्वातंत्र्य असल्याचा समज समाज माध्यमांनी पसरविला आहे आणि हे स्वातंत्र्य दाबले जाते आहे, म्हणून ओरडाही केला जात आहे. गेल्या ४-५ वर्षांत वर्तमानपत्रांमध्ये एखादा विषय जितका चर्चिला जात नाही, तितका टीव्ही चॅनेल्स आणि या समाज माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप अशा माध्यमातून एक मोठा वर्ग व्यक्त होत आहे.
यात विषयाचे बंधन नाही. दहशतवादी बुर्‍हाण वाणीपासून ते एखादा चित्रपट सेन्सॉरने संमत करावा की नाही, इथपर्यंत. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, याला जर कुणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर आहेच पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची ओरड.
या सगळ्यात आजची तरुणाई काही वेगळा विचार करते आहे का? देशावर त्यांचे प्रेम आहे पण ते फक्त स्वातंत्र्य दिन किंवा २६ जानेवारीलाच उफाळून येते. एरव्ही मी, माझे करिअर, माझी नोकरी, माझी प्रेयसी यातच ही तरुणाई बुडालेली असते. म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, की मी या देशासाठी काय करतो?
जबाबदार नागरिक
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बर्‍याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना सपशेल विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. पण कचरा सर्रास रस्त्यावर, स्टेशनवर आपण टाकतो. पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा जणू छंदच. आपण इतके बेजबाबदार आहोत की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना प्रश्‍न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही. पण तरीही नाल्यांना ‘डम्पिंग ग्राऊंड’चे रूप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम लोकांनी अक्षरश: पायदळी तुडवला. वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे या गोष्टी अगदी छातीठोकपणे आपल्याकडे केल्या जातात. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर. शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे नियम पाळण्यासाठी गरज आहे. कडक कायद्याची नाही. गरज आहे विवेकबुद्धीची. गरज आहे, पालकांनी नियम पाळण्याची आणि मुलांवर उत्तम नागरी संस्कार करण्याची.
पोलिसांचे कान व डोळे बनले पाहिजे
सामान्य माणसांनीही पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे. कायदा-सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली, तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना उद्दिष्टपूर्ती करता येणे शक्य नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी आणि नागरिकांना येणार्‍या अडचणींवर मात केली जावी.
अनेकदा पोलिस कारवाई करून प्रश्‍न सुटत नाहीत. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा-सुव्यवस्था स्थिती राखली जाऊ शकते. स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल-व्फजएी फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करून पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून, हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
राज्यात वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. शहरांमधील रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली जावी. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर करावे यासाठी वाहतूक पोलिसांची मजबूत फळी तयार करावी. वाहतूक नियम तोडणार्‍या नागरिकांना शिक्षा द्यावी. आपापलं काम व्यवस्थित करणं, रस्त्यावरील सिग्नल पाळणं, रस्त्यावर न थुंकणं, स्त्रियांचा आदर करणं, दिलेला शब्द पाळणं, दिलेली वेळ पाळणं, भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं, लाच न देणं, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं, आपल्याआधी लोकांचा विचार, रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं, चूक मान्य करणं जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं, मतदान करणं, ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, वाद न घालता काम करणं, जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं, इतिहासापासून शिकणं गतकाळातील गोष्टींवर वाद न घालणं, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं, चांगल्या कामात कोलदांडा न घालणं, स्वत:पलीकडे पाहणं, सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करणं, ही देशभक्तीच आहे. ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते.
या गोष्टी राष्ट्रभक्तीचा केवळ एक छोटासा उपसंच आहेत. पण राष्ट्रभक्तीचा परीघ यापेक्षा कितीतरी मोठा आहे. अशा वातावरणात आज गरज आहे ती तरुण आणि यशस्वी लोकांच्या कहाण्या लोकांसमोर आणायची. आजही अनेक तरुण आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. यात महिला फार मोठ्या प्रमाणात आहेत. तरुणांची ही ऊर्जा जेव्हा मार्गी लागेल, तेव्हाच या देशाचा उत्कर्ष होईल. तेव्हाच देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकेल. सर्वप्रथम मी या देशाचा आहे, हा विचार, ही भावना रुजवायलाच हवी, ते काम आपण आज, आत्ता स्वत:पासून सुरू करुया! कल करे सो आज, आज करें सो अब’ ही उक्ती सार्थ व्हावी. माझ्या देश बांधव, तरुणाईला मी आवाहन करतो की, आपल्यातील भेदाभेद सोडून एक व्हा. देश संकटात असताना अभेध्य व्हा. वज्रमूठ करा. एकीची साखळी मजबूत करा. असे झाले तर भारत बुलंद होईल.•••

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (206 of 1211 articles)


तोरसेकर | तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकात भाजपाचे अल्पमती सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने कुमारास्वामी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हाची गोष्ट आहे. ...

×