ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » सुरक्षा जवानांच्या मानवाधिकाराचे काय?

सुरक्षा जवानांच्या मानवाधिकाराचे काय?

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

तीन वर्षांपूर्वी भाजपाला जो जनादेश मिळाला अन् त्यानंतर भारताला जे वैश्‍विक समर्थन मिळाले, मिळत आहे, ते लक्षात घेता भारत सरकारला असा धूर्तपणाचा निर्णय घेणे अवघड नाही. उपद्रवमूल्य सिद्ध केले, तर शत्रूलाही धडकी भरते. त्यामुळे आता निर्णायक पाऊल उचलताना भारत सरकारने जराही मागेपुढे पाहू नये. ही जनभावना आहे. काश्मीरच्या बाबतीत देशभरातील लोक चिंतित आहेत. त्यांची दखल सरकार घेईल अन् योग्य ती कारवाई करेल, असा जनतेलाही विश्‍वास आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार असेपर्यंत तरी जनता आश्‍वस्त आहे, हे निश्‍चित!

Separatists Stone Throwing

Separatists Stone Throwing

काश्मीरच्या संदर्भात आता अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. काश्मीरमधील लोकांना ३७० कलमान्वये विशेष भेट देऊन जी मोठी चूक करण्यात आली, ती सुधारण्याची वेळ आली आहे. आज काश्मीरसाठी भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. पैसा आणि अन्य प्रकारची मदत पाठवून आपण काश्मिरी लोकांना जिंकून घेऊ, असा जर कुणाचा होरा असेल तर त्याला वेळीच सावध करणे गरजेचे आहे. आज काश्मिरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेता, भारत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. घेतलीही जात आहे. परंतु, पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मिरातील माथेफिरू तरुण, भारतीय जवानांवर दगड फेकत आहेत, त्यांच्या जिवाशी खेळत आहेत. सुरक्षा दलाच्या वाहनांना घेरून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही मानवाधिकाराच्या नावाखाली आमच्या जवानांचे हात बांधून ठेवण्यात आले आहेत.
आज पाकिस्तानातून येणार्‍या अतिरेक्यांची संख्या घटली आहे. तिकडून येणार्‍या शस्त्रास्त्रांचे प्रमाणही कमी झाले आहे. असे असले तरी काश्मिरात मोठ्या संख्येत अतिरेकी कसे, हा प्रश्‍न उरतोच. कारण, स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात अतिरेकी होत आहेत. आपल्याच देशाविरुद्ध शस्त्रास्त्रे हाती घेत आहेत. तिकडे सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक काश्मिरी तरुण त्याच्या आईकडे असे म्हणतो की, मी पोलिसांपुढे शरण जातो. यावर त्याची आईच त्याला मनाई करते. ती त्याला देशाविरुद्ध लढण्यास प्रोत्साहन देते. तो व्हिडीओ मी पाहिलेला नाही. पण, त्याबद्दल बरेच ऐकले आहे. तो व्हिडीओ जर खरा असेल तर परिस्थितीचे गांभीर्य किती आहे, हे आपल्या लक्षात येईल. काश्मिरातील जे तरुण अतिरेकी बनत आहेत, त्यांना पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे मिळत नाहीत, तर मग कुणाकडून मिळतात, हा प्रश्‍न आपल्याला सतावू शकतो. त्याचेही उत्तर सापडले आहे. हे तरुण अतिरेकी काश्मीर पोलिसांच्या हातातील बंदुका हिसकावत आहेत, दारूगोळा चोरत आहेत. अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करणार्‍या सुरक्षा जवानांना अडविण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येत एकत्र येऊन ढाल बनत आहेत. अनेक ठिकाणी तर महिलांना पुढे केले जाते. या परिस्थितीवर मात करून तेथील जनतेला भारताच्या जवळ कसे आणता येईल, यादृष्टीने वेगाने प्रयत्न करावे लागणार आहेत.
माथेफिरू तरुणांनी आमच्या जवानांवर दगड फेकायचे, जवानांना घेरून त्यांना मारहाण करायची अन् तरीही जवानांनी जवळ असलेले शस्त्र बाहेर न काढता चुपचाप मार सहन करायचा, हा प्रकार योग्य नाही. आमच्या जवानांना मानवाधिकार नाही? आमच्या जवानांना आत्मसन्मान नाही? आमचे जवान माथेफिरूंचा मुकाबला करू शकत नाही? आमचे जवान आमची शान नाही? आमच्या जवानांच्या जिवाची काहीच किंमत नाही? आमच्या जवानांच्या मनात राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली नाही?… या प्रश्‍नांची उत्तरं मानवाधिकाराच्या नावानं बेंबीच्या देठापासून बोंबलणार्‍यांनी दिली पाहिजेत. जवानांनी कुणावरही उगाचच हात उगारू नये, गोळी झाडू नये, इथपर्यंत ठीक आहे. पण, जवळ शस्त्रास्त्रे आहेत आणि जिवाला धोकाही आहे, अशा स्थितीतही जवानांनी गप्प बसावे, हा कसला आला मानवाधिकार?
आमचा हिंसाचारावर अजीबात विश्‍वास नसला, तरी गोळीचे उत्तर गोळीनेच दिले पाहिजे, जशास तसे तरी वागले पाहिजे, हीच भूमिका भारत सरकारने घेतली पाहिजे अन् सैन्याचे मनोबल उंचावले पाहिजे. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तसे आदेश लष्कराला दिले होते, हे आपल्या स्मरणात आहेच. पण, तरीही जवानांचे हात नैतिकतेने बांधले आहेत. ज्यांच्यावर गोळ्या झाडायच्या ते आमचेच काश्मिरी बांधव आहेत, याची जवानांना जाणीव आहे. पाकिस्तानकडून पैसे घेऊन काश्मिरातील काही तरुण आमच्या सुरक्षा जवानांच्या गाडीला घेराव घालतात, त्यांच्या गाडीवर दगड फेकतात, एवढेच काय तर अगदी जवळून काठ्यांचा प्रहार करतात, काही तरुण तर चक्क जवान प्रवास करीत असलेल्या वाहनांच्या बोनेटवर चढून नाचतात, जवानांच्या पौरुषाला आव्हान देतात अन् तरीही आमचे जवान संयमाचा परिचय देत शांत बसतात. कारण? कारण एकच आणि ते म्हणजे या पत्थरबाज देशद्रोही काश्मिरी तरुणांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होऊ नये.
एकदा जवानांना मोकळीक द्या अन् मग बघा, काश्मिरी तरुण कुणावर दगड फेकतात ते? आजच्या घडीला काश्मीर खोर्‍यात तीनशेपेक्षा जास्त व्हॉटस अ‍ॅप ग्रुप असे आहेत की, ज्यावरून केवळ आणि केवळ काश्मिरी तरुणांची माथी भडकवली जात आहेत. काहीही कारण नसताना भारत सरकारविरुद्ध तरुणांना चिथावणी देण्याचे पाप पाकिस्तानकडून केले जात आहे. ही बाब लक्षात घेता, काश्मिरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी खंडित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला, तरी सरकारने देशहित समोर ठेवून तो घेतला पाहिजे आणि सुदैवाने सरकार असे कडक निर्णय घेत आहे. काश्मिरात जी दगडफेक आणि हिंसाचार होत आहे, तो आज पहिल्यांदा झालेला नाही. याआधीही अनेकदा हिंसाचार झालेला आहे. यापासून धडा घेत आम्ही आता अधिक कठोर होण्याची गरज आहे. पुन:पुन्हा दगड फेकण्याची हिंमतच होणार नाही काश्मिरी माथेफिरू तरुणांची, असे कठोर धोरण अंमलात आणले, तर परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही.
मध्यंतरी आमच्या सुरक्षा जवानांनी एक शक्कल लढवली. साध्या वेशातील जवात आधीच दगडफेक्यांमध्ये सामील व्हायचे. सगळे दगडफेके एकत्र आले की त्यांना आदेश कोण देतो, हे हेरायचे आणि नंतर त्यांना अलगद पकडून आणायचे, अशी पद्धत अवलंबण्यात आल्याने आता दगडफेक्यांचेही धाबे दणाणले आहे. काही ना काहीतरी नवीन प्रकार अवलंबत दगडफेक थांबवण्यात जर लष्कर यशस्वी ठरले, तर त्याची फलनिष्पत्ती चांगलीच होईल, यात शंका नाही! आज पाकिस्तानात इमरान खान यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आले आहे. ते सरकारही पाकिस्तानी लष्कराच्या हातातले बाहुले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्या सरकारकडून आपल्याला फार सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा बाळगणे चूक ठरेल.
काश्मिरातील जनतेला पैसा पाठवा, त्यांना मोठ्या प्रमाणावर सोईसुविधा पुरवा अन् बदल्यात त्यांचे प्रेम मिळवा, हे आधीच्या सरकारांनी चालविलेले धोरण आता थांबविणे गरजेचे आहे. चुलीत गेला मानवाधिकार, असे म्हणत जगाला हे दाखवून देण्याची गरज आहे की, आमच्या जवानांवर जे दगड फेकतील, आमच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याचा जे प्रयत्न करतील त्यांना आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही! आमच्या जवानांच्या मानवाधिकाराचे पत्थरबाजांच्या माध्यमातून पाकिस्तानकडून जेव्हा उल्लंघन केले जाते, तेव्हा कुठे गेले असतात हे मानवाधिकारवाले? गतकाळात भारत सरकारने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करीत अतिरेक्यांचे अड्डे जसे उद्ध्वस्त केले होते, तशी आक्रमक कारवाई पुन्हा करण्याची अन् पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
संपूर्ण जगाला मानवाधिकाराचे धडे देणारी अमेरिका स्वत:वर संकट आल्यानंतर, मानवाधिकाराचा कसलाही विचार न करता ज्याप्रमाणे दुसर्‍या देशातल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बॉम्बहल्ले करते, तसेच हल्ले आता भारताने पाकिस्तानात घुसून करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे काश्मिरातील जे फुटीरवादी नेते भारत सरकारच्या सवलतींचा वापर करूनही पाकिस्तानशी निष्ठा बाळगतात, अशा नेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांना काळकोठड्यांमध्ये नेऊन डांबले पाहिजे. ब्रिटिश राजवटीत गोर्‍या साहेबांनी असंख्य भारतीयांना कठोर शिक्षा ठोठावली होती अन् अंदमानातील काळकोठडीत डांबले होते, तसे काश्मिरातील फुटीरवादी अन् देशद्रोही नेत्यांना काळकोठडीत डांबण्याची हीच योग्य वेळ आहे. असे केले नाही तर कट्टरवादी मानसिकता असलेली ही मंडळी भारत सरकारला कधीच स्वस्थ बसू देणार नाही. आमच्या शूर जवानांचे बळी घेत राहील, काश्मीर खोर्‍यात अशांतता माजवत राहील अन् भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करीत राहील, हे लक्षात घेतले पाहिजे.
समोरचा शांतता निर्माण करू पाहतो आहे, हे माहिती असल्याने कट्टरपंथी आपल्याला अधिक त्रास देतील, कारण त्यांना शांतता नकोच आहे. ज्यांनी ज्यांनी काश्मीरमध्ये सत्ता उपभोगली आहे, त्यांनी सदासर्वदा भारत सरकारकडूनच अपेक्षा केल्या अन् त्या पूर्णही करून घेतल्या. अब्दुल्ला असोत वा मग मुफ्ती मोहम्मद सईद वा त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती, या सगळ्यांनी भारत सरकारला वेळोवेळी ब्लॅकमेल केले आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता, भारत सरकारने आधी एक पाऊल उचचले पाहिजे अन् ते हे की, काश्मीरपासून वेगळे करीत जम्मू-लद्दाखला राज्य बनविले पाहिजे. तीन वर्षांपूर्वी भाजपाला जो जनादेश मिळाला अन् त्यानंतर भारताला जे वैश्‍विक समर्थन मिळाले, मिळत आहे, ते लक्षात घेता भारत सरकारला असा धूर्तपणाचा निर्णय घेणे अवघड नाही. उपद्रवमूल्य सिद्ध केले, तर शत्रूलाही धडकी भरते. त्यामुळे आता निर्णायक पाऊल उचलताना भारत सरकारने जराही मागेपुढे पाहू नये. ही जनभावना आहे. काश्मीरच्या बाबतीत देशभरातील लोक चिंतित आहेत. त्यांची दखल सरकार घेईल अन् योग्य ती कारवाई करेल, असा जनतेलाही विश्‍वास आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार असेपर्यंत तरी जनता आश्‍वस्त आहे, हे निश्‍चित!

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (370 of 1224 articles)

Jeff Bezos Amazon
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | अमेझॉन या अमेरिकन कंपनीचा मालक जेफ बेझॉस हा सध्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस असून त्याची ...

×