भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आसमंत, दीपक कलढोणे, स्तंभलेखक » सोयीचे आणि सायीचे…!

सोयीचे आणि सायीचे…!

तरंग : दीपक कलढोणे |

easy-cकामानिमित्त आपापल्या किंवा दुसर्‍या एखाद्या कार्यालयामध्ये जाणे हा प्रत्येकाच्या जीवनात नित्याचा भाग असतो. आपले काम होईपर्यंत वाट पहात थांबावे लागणे ही प्रमुख गोष्ट माणसाला आधी जमली पाहिजे..! अशा वेळी राखावा लागणारा संयम ही कोणत्याही कार्यालयाच्या कामकाजातील महत्वाची गरज असते. कांही ठिकाणी रांग असते तर कांही ठिकाणी रांग दिसतही नाही, अदृश्य असते. माणूस समोर नसला तरी त्याची फाईल नावाची प्रतिनिधी टेबलावरच्या गठ्ठयात कोठेतरी गैरहजर व अदृश्य माणसाचे प्रतिनिधीत्व करत असतेच. स्वाभाविकच आपण कोणत्याही कार्यालयात या अर्थाने रांगेतच उभे असतो. रांग दिसो अथवा ना दिसो.. टेबलासमोर उभे मज रहाणे.. फाईल पुढे सरकवणे.. असे कांहीसे प्रत्येकाचे ध्येय होऊन बसते. अशा मोठ्या कठीण आणि बाकावर बसावे लागायच्या बाका प्रसंगामध्ये ‘आपल्याला खूप वेळ लागतो आहे‘ असा समज अथवा गैरसमज होण्याची शक्यता जास्तच असते. अशा वेळी  आपल्याला आनंद मिळवण्याकरिता माणसाने आपले नेत्रपल्लव पुरेशा क्षमतेने वापरावेत. कानात वारे भरण्याऐवजी कानात प्राण भरुन घ्यावा, अवतीभोवतीचे बोलणे मोठ्या अभिरुचीने ऐकत रहावे. म्हणजे आपली करमणूकही होईल आणि मनावर कोणता ताणही येणार नाही..! टेबलावर असलेल्या फायलींच्या ढिगामधून कांही तरी शोधत खाली मान घालून काम करणारी माणसे मग हटयोग्यांपेक्षाही जास्त तपस्वी वाटू लागतील.. तसेच वर मान करुन समोर उभ्या अथवा बसलेल्या माणसांशी काम करणार्‍या मंडळींचे बोलणे ऐकून आपली भाषा खरोखर समृद्ध होईल. त्यातून कांही वेगळेपण जर शोधता आले तर ‘आपला वेळ वाया जातो आहे‘ असे कोणाला कधीच वाटणार नाही.
प्रगत होत असताना आपल्या सामाजिक जीवनाला शिस्तप्रीय वळण द्यायची एक व्यवस्था नावाची गोष्ट माणसाने निर्माण केली आहे. पुष्कळदा ती आपल्या लक्षातच येत नाही. ती शिकायची असेल तर कार्यालयामध्ये वाट पहावी लागणारा वेळ ही सहजपणे उपलब्ध झालेली संधी समजायला हवी.. अर्थात या संधीचे दार कितीदा ठोठवावे लागेल म्हणजे ती दार उघडेल हे नक्की सांगता येत नसले तरी आपापल्या सोयीने आणि समोरच्या व्यक्तीच्या कलाने कधीतरी यशाचे दार उघडेल. यावरचा विश्वास अढळ असावा.. उगाच सोयीस्कर अर्थ काढून गैरसमज करुन घेऊ नये.. पहा बरे.. एवढा विचार करताना.. कोपर्‍यातल्या टेबलावरुन मला एक सुंदर विधान ऐकू आले नां..  बघून सांगतो..! त्यावर ज्याचे काम होते ते म्हणाले, पहा तरी साहेबांना सांगून.. उत्तर आले.. ओके, साहेबांना सांगून बघतो.    बघून सांगतो.. आणि सांगून बघतो..  हे दोन वाक्ये सोयीस्कररित्या वापरायला जमली की कोणत्याही कार्यालयामध्ये काम करायला माणूस पात्र ठरला आहे. असे समजायला खरे तर कुणाची कांहीच गैरसोय नसावी.. नाही का..!
‘सोय‘ हा माणसाच्या जीवनातील परवलीचा शब्द असतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा भागवताना माणसानं आपल्या ऐहिक प्रपंचाचा बडिवार व्यर्थतेत आणि सार्थतेत मोठ्या सोयीस्करपणे वाढवत नेला. त्यामुळे खरे तर ‘सोय‘ ही माणसाची पहिली गरज बनलेली असते. कोणतीही सोय केवळ सायीपाशी येऊन थांबू नये.. कोणत्याही सोयींचा केवळ सोयीस्करपणे वापर होऊ नये, या भूमिकेतून संस्कार नावाची गोष्टही माणसाने निर्माण केली. मानवप्राण्याचे रुपांतर माणसात बनवणे हे काम संस्कार नावाचे छिन्नी आणि हातोडा करु लागले. तरीही अजून ‘स्वत:ची सोय‘ या एका गोष्टीकडे मानवप्राणी अधिकाधिक झुकतोच आहे. कोणतीही गोष्ट स्वत:च्याच सोयीने व्हावी हा अट्टाहास असणे, हे मानवप्राण्याचे निसर्गसुलभ लक्षण आहे. सोय लावणे, सोय करणे, सोयीचे बघणे, सोय पहाणे, सोयीस्कर होणे यासारखे शब्द भाषेच्या प्रगतीबरोबरच माणूस मोठ्या खूबीने वापरत आला आहे. योगक्षेमाकरिता अन्नाचा जितका वापर होतो त्याच्या कैक पटीने माणूस भाषेचा मोठ्या सोयीने उपयोग करत आला आहे. माणसाच्या भौतिक विकासाबरोबरच, ऐहिक, लौकिक आणि पारलौकिक विकासात भाषेचा वापर करण्याचे त्याचे कौशल्य स्वाभाविकपणे त्याला इतर सजीव प्राण्यांपेक्षा खूपच पुढे घेऊन गेले. म्हणजेच माणूस भाषेच्याच आधाराने स्वत:ची सोय करुन घेऊ लागला, हे सत्य होय..
संस्कारदृष्टीने पाहिले तर माणसाच्या जीवनाचे दोन भाग पडतात. एक व्यावहारिक जीवन आणि दुसरे व्यवहारापलीकडचे जीवन. या दोन्ही जीवनाचे वेगळेपण सांगणारी सीमारेषा सतत हलती ठेवणे हे माणसाच्या चतुराईचे पहिले लक्षण होय. ‘बघून सांगतो आणि सांगून बघतो‘ या दोन छोट्या वाक्यांनी माणसाचे व्यावहारिक जीवन सतत हलते ठेवले जाते. व्यवहारापल्याडचे जीवन मात्र केवळ स्वानुभूतीवर आधारित असल्याने त्याला कौटुंबिक स्पर्श असतो. तेथे ‘बघून सांगतो.. आणि सांगून बघतो..‘ या विधानांना शून्य किंमत असते. कुटुंबामध्ये आपल्या सदस्यांचे एकमेकांप्रति असलेले प्रेम-वात्सल्य याच्या मर्यादा अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न होत रहातो. तो तसा सामाजिक जीवनातसुद्धा व्हायला सुरुवात झाली की राष्ट्र या व्यापक संकल्पनेला कौटुंबिक अर्थ प्राप्त होतो.  म्हणूनच उंबरठ्याबाहेरच्या विश्वात बघून सांगतो आणि सांगून बघतो. या दोन्ही विधानांना मोठा अर्थ प्राप्त होत असला तरी व्यवहारापलीकडील कौटुंबिक नात्यात मात्र ही विधाने नगण्य ठरतात.. एकमेकांची सोय लावताना आणि एकमेकांसाठी सोयीचे असे कांही करताना माणूस सोयीची भाषा वापरु लागला.. हे माणसाच्या विकसित जीवनातील सोयीस्कररित्या बदलणारे तंत्र मात्र माणसाला विकासापासून दूरच ठेवते हे मात्र नक्कीच सोयीचे नाही..!

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under आसमंत, दीपक कलढोणे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, दीपक कलढोणे, स्तंभलेखक (822 of 923 articles)


कटाक्ष : गजानन निमदेव | पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या अचानक घोषित करण्यात आलेल्या निर्णयामुळे ज्याप्रमाणे भारतवासीय ...