ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » स्मरण ज्ञानेश्‍वरीचे…

स्मरण ज्ञानेश्‍वरीचे…

॥ विशेष : विशाखा पाठक|

जयंत्या-पुण्यतिथ्या या व्यक्तीच्या साजर्‍या केल्या जातात, त्यांचे गुण आठवण्याचे निमित्ताने. पण, जगात दोनच ग्रंथ असे असतील ज्यांची जयंती साजरी केली जाते. एक म्हणजे ‘गीता जयंती’ व दुसरी ‘ज्ञानेश्‍वरी जयंती.’ भगवंताचा निष्काम कर्मयोग ज्ञानोबांनी अनुसरला आणि म्हणूनच ‘ज्ञानेश्‍वरी जयंती’ निष्काम कर्मयोगाचे उत्तम उदाहरण ठरले! ‘प्रगट गुह्य बोले, माझा मर्‍हाटाचि कवतिके, अरूपासी रूप दाविन,’ अशा प्रतिज्ञा करून गीतेचा भावार्थ ज्ञानोबांनी प्राकृतात, जनसामान्यांच्या भाषेत केला. त्या ज्ञानेश्‍वरीची ३० सप्टेंबर रोजी जयंती साजरी झाली. त्यानिमित्ताने विशाखा पाठक यांचा हा विशेष लेख!

Dnyaneshwari

Dnyaneshwari

सहजे ब्रह्मरसाचे परगुणें। केले अर्जुनालागी नारायणें।
कीं तेचि अवसरीं पाहुणे। पातलो आम्ही॥
जे अर्जुनाचिये पांती। परिसणेया योग्य होती।
अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मानंदाची मेजवानी केली, तेव्हा त्याच्या पंक्तीला वेळेवर अवचित पाहुण्याप्रमाणे ज्ञानोबाही पोचले. भगवंतांनी त्यांचे स्वागत करून आग्रहाने अर्जुनाच्या पांती बैसविले व स्वत: भगवान वाढप करीत होते. सर्व वाढून झाल्यावर जेवायला सुरवात करण्याची भगवंतांनी विनंती केली. पंक्तीत बसलेली सर्व मंडळी जेवू लगली, पण ज्ञानोबा काही जेवेनात. भगवंताचे लक्ष गेल्यावर ते म्हणाले, ‘‘ज्ञानोबा सुरवात करा.’’ तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, ‘‘भगवंता, माझी एक विनवणी आहे.’’
भगवंत- ‘‘बोला ज्ञानोबा, संकोच करू नका.’’
ज्ञानोबा- ‘‘मुलं उपाशी असतील तर आई जेवेल का?
भगवंत- ‘‘शक्यच नाही, तिला घास जाणार नाही. पण असं का विचारता आहात ज्ञानोबा.’’
ज्ञानोबा- ‘‘भगवंता, माझी मुलं उपाशी आहेत. बिचारी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत. देववाणीमधील ज्ञान त्यांचे पोट भरू शकत नाही. भगवंता, ते ज्ञान प्राकृतात करून मी त्यांना भरवू का? तुमची परवानगी असेल तर माझ्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने मी त्यांना याचे छोटे छोटे घास करून दिले तर चालतील का? अनेक वर्षांपासून माझी ही मुलं उपाशी आहेत. मला आता त्यांचे हाल बघवत नाहीत.’’ आणि ज्ञानोबांच्या डोळ्यांना धारा लागल्या. भगवंतांनी त्यांचे सांत्वन करीत ते नवरसाने भरलेले ताट न्यायला परवानगी दिली व त्यात शांत रस वाढवून दिला व ‘माउली’ ज्ञानोबांना, जाण्याची रुद्ध कंठाने परवानगी दिली.
असं हे माउलीचं मन आपल्या सर्व अज्ञ मुलांसाठी कळवळलं आणि ते पुरुष असून ‘माउली’ हे बिरूद घेऊन नटले आणि नेवासे येथील मोहिनीराजाच्या मंदिरात ताट घेऊन आले. तोच हा ज्ञानेश्‍वरी जयंतीचा दिवस. आज ज्ञानेश्‍वर जयंती!
पैठणच्या ब्रह्मवृंदांनी शुद्धिपत्र दिल्याची वार्ता व पैठणच्या वाळवंटातील ज्ञानोबांच्या रसाळ कीर्तनाच्या वार्ता प्रवरा नदीने नेवासापर्यंत पोचवल्या होत्याच. स्वागताला अलोट जनसमुदाय. या प्रवासातच निवृत्तिनाथांनी ज्ञानोबांना श्रीमदभगवद्गीतेवर टीका लिहिण्याची अनुज्ञा दिलेली होती.
नेवासा येथील पैसाच्या खांबापासून संभामंडळ घालून प्रतिपदेपासून या ज्ञानयज्ञाला प्रारंभ झाला. घरातल्या देवघरात, मंदिरातल्या मूर्तीत बंदिस्त असणारा देव सर्व प्राणिमात्रांत आहे, हे रेड्यामुखी वेद बोलवून ज्ञानोबांनी सिद्ध करून दाखवले; तर निर्जीव भिंतीतदेखील चैतन्य वास करते, हे भिंत चालवून दाखवले. समाजाभिमुख परमार्थ ज्ञानोबांनी शिकवला आणि जणूकाही बंदिस्त देव मोकळे झाले.
नाथ संप्रदाय हा गुरू-शिष्य परंपरेचा. पण, ते गुह्यज्ञान बहुजन समाजासाठी ‘भावार्थदीपिकेच्या’निमित्ताने ‘ज्ञानेश्‍वरी’तून प्रकट केले. हे ज्ञान सर्व जगासाठी आहे.
‘प्रगट गुह्य बोले, माझा मर्‍हाटाचि कवतिके, अरूपासी रूप दाविन,’ अशा प्रतिज्ञा करून गीतेचा भावार्थ ज्ञानोबांनी प्राकृतात, जनसामान्यांच्या भाषेत केला. त्या ज्ञानेश्‍वरीची आज जयंती. जयंत्या-पुण्यतिथ्या या व्यक्तीच्या साजर्‍या केल्या जातात, त्यांचे गुण आठवण्याचे निमित्ताने. पण, जगात हे दोनच ग्रंथ असे असतील ज्यांची जयंती साजरी केली जाते. एक म्हणजे ‘गीता जयंती’ व दुसरी ‘ज्ञानेश्‍वरी जयंती.’ भगवंताचा निष्काम कर्मयोग ज्ञानोबांनी अनुसरला आणि म्हणूनच ‘ज्ञानेश्‍वरी जयंती’ निष्काम कर्मयोगाचे उत्तम उदाहरण ठरले! ५००० वर्षांपूर्वी सांगितलेल्या गीतेची बीजे ऋजु मनाच्या अर्जुनाच्या मनात पेरून आजही नित्यनूतनता मिरवणारी गीता, ७०० वर्षांपूर्वी सांगितलेली, नव्हे, लोकांनी डोक्यावर घेऊन मिरवलेली, वारकरी संप्रदायाने रुजवलेली ज्ञानेश्‍वरी ही शिक्षितांची मायच! आपल्या अशिक्षित माउलीच्या इच्छेखातर सुसंस्कृत मन असणार्‍या आईसाठी सुलभ अशा मराठीत भौमर्षी विनोबांनी लिहिलेली गीताई. ‘गीताई माउली माझी। मी तिचा बाळ नेणता॥’ असा गीतेचा गौरव करणारे विनोबा त्याच पंक्तीतले!
ज्ञानेश्‍वरीमध्ये ज्ञान, कर्म, भक्ती, उपासना, योग या सर्व अंगांना स्पर्श करताना ते ‘सोहपे’ कसे होईल, हे बघितले आहे. ज्ञानेश्‍वरीचा आवाका काही पानांत सामावणे, हे मात्र कठीणच आहे. तेव्हा कर्माची कुशलता व भक्तीचा सोपान यांचा योग साधण्याचा हा प्रयत्न. गीतेने कर्मयोगासाठी तिसरा व चौथा अध्याय निवडला. कर्म, कर्मफल, कर्मफलत्याग व निष्काम कर्म अशा त्याच्या पायर्‍या. हा सोपान चढताना कर्माचे तीन प्रकार- विहित कर्म, नित्य नैमित्तिक कर्म व निषिद्ध कर्म. कर्माला स्वधर्म असाही शब्द वापरला आहे. जन्माला आल्यापासून कर्म करावेच लागते. जन्माला येणं हेच कर्म आहे. तेव्हा कर्माचा निषेध नाही, निषिद्ध कर्माचा निषेध करावाच लागतो. शरीर आहे तोवर कर्म करावेच लागणार. म्हणून-
परीस पां सव्यसाची। मूर्ति लाहोनि देहाची। खती करिती कर्माची ते गावंढेगा।
सांगे पैलतीरा जावे। ऐसे व्यसन कां जेथ पावे। तेथ नांवेते त्यजावे। घडे केवी॥
प्रपंचातून परमार्थाच्या पैलतीराला जायचे असेल, तर कर्माची नाव टाकून देऊन कसे चालेल? तेव्हा कर्म जास्तीत जास्त अचूक कसे होईल, त्यातील अहंपणा कसा टाकता येईल व ते निष्कामतेकडे कसे वाटचाल करेल, हे पाहणे महत्त्वाचे.
हे कर्म मी कर्ता। कां आचरेन या अर्था। ऐसा अभियान झणेचित्ता। रिघो देसी॥
साधे ऑफिसमध्ये जाण्याचे कर्म. यात मला मुक्कामी पोचविण्यापर्यंत किती जणांचा सहभाग असतो याचा विचार केला, तर मी ऑफिसला गेलो म्हणण्यापेक्षा मी अनेकांच्या मदतीने ऑफिसला सुखरूप पोहचवले, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. व्यवहारात तसे म्हटले नाही, तरी मनात ती जाणीव असेल, तर ‘मी कर्ता’ हा अहंकार कमी व्हायला नक्कीच मदत होईल. मी एकटा काहीच करू शकत नाही. अनेकांच्या सहकार्यानेच मी करतो म्हणून कर्तेपणाचा त्याग सुचविला आहे.
बरेचदा आपल्या मनात, दुसरा कसा सुखी आहे, मजेत आहे, त्यांच्या आयुष्यात कधी चढउतार नाही, आघात नाही. माझ्याच वाट्याला का? असा विचार येतो, तेव्हा ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या मदतीला येतात-
अगा स्वधर्म हा आपुला। जरी कां कठीण जाहाला।
तरी हाचि अनुष्ठिला। भला देखें॥
तरी लोकांची धवळारें। देखोनियां मनोहरें।
असती आपुली तणारें। मोडावी केवी॥
नित्य नैमित्तिक कर्मरूपी स्वधर्माचे आचरण जो करतो तो, त्या निष्काम करण्याने मोक्षालाच प्राप्त होतो, मृत्यूनंतर नाही इथेच. मोक्ष म्हणजे आनंद. निखळ आनंद. आनंद पैशात नसून निष्काम कर्म करण्यात आहे. आपल्या विदर्भातील आमटे कुटुंबीय कुष्ठरोग्यांच्या सेवेत चार पिढ्या या आनंदाच्या वाटेकरी आहेत. शोधग्राम येथील डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य. मेळघाटमध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. कोल्हे दाम्पत्य. ही सर्व मंडळी या निष्काम कर्माच्या आनंदाचे भागीदार आहेत. ज्यांनी मळलेल्या वाटा सोडून नवीन वाटा निर्माण केल्यात.
मुंबईचे सुप्रसिद्ध किडनीतज्ज्ञ कै. डॉ. अजित फडके यांनी सांगितलेली एक घटना इथे मुद्दाम नमूद कराविशी वाटते. प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांच्या घरचे खानसामा (स्वयंपाकी) यांचे किडनीचे ऑपरेशन डॉ. फडके यांनी केले. त्यांच्यासाठी पथ्याचे जेवण दवाखान्यात स्वत: मिसेस टाटा घेऊन येत असत. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचा जिव्हाळा व अकृत्रिम स्नेहच यातून दिसतो. यापेक्षा वेगळे नैष्कर्म्य काय?
हे आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा कर्माला ज्ञानाचे डोळे असतील तेव्हा. म्हणनच ज्ञानोबा म्हणतात-
तुम्ही व्रत नियम न करावे। शरीरातें न पिडावें।
दूरी केही न वचावे। तीर्थासि गा॥
देवतांतरा न भजावे। हे सर्वथा काही न करावें
तुम्ही स्वधर्मयज्ञीं यजावें। अनायासे॥
अशाच सांगलीच्या एक सामान्य बाई, गुरंढोरं पाण्याविना तडफडतात असे पाहून स्वत:चे सगळे सोने गहाण ठेवून शेततळं बांधलं, गुरांना पाणी पिण्यासाठी. सोन्यासारखी गुरं जगवण्यासाठी स्वत:च्या सोन्याचा विचार न करणारी माउली, हिला ज्ञानेश्‍वरी कळली नाही असे कोण म्हणेल?
देखा स्वधर्माते भजाल। तरी कामधेनु हा होईल॥ असे सांगायला माउली विसरत नाही.
तिसरा अध्याय कर्मयोगाचा असला तरी चौथ्या, पाचव्या व १८ व्या अध्यायातही त्यासंबंधी ओव्या आहेत. आपल्या वाटेला आलेले कर्म अनन्य ओलाव्याने व तन्मय होऊन केले जाते तेव्हा ते सुंदरच होते. त्याला माउलींचा शब्द आहे- विधिगौरवें शृंगारोनि. कर्म तोपर्यंत करायचं जोपर्यंत त्यातून सुटण्याचे ज्ञान होत नाही. ज्ञानाचे डोळे लावून जर कर्म पाहू लागले तर चटकन उमजते. जसे अर्जुनाला ज्ञानचक्षू मिळाल्याबरोबर विश्‍वरूप दर्शन होऊ लागले.
नुसते ज्ञान आणि नुसते कर्म दोन्ही रूक्ष आहेत, पण भक्तीने त्या दोघांना अर्थ येतो. आद्य प. पू. शंकराचार्यांनी फक्त ज्ञान सांगितले, तर आ. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती पुष्ट केली. माउलींनी सेतू बांधला. सगुण भक्ती सोपी व निर्गुण भक्ती कठीण म्हणून मध्य मार्ग काढला.
सगुणाचेनि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। विश्‍वरूप दर्शन पाहताना अर्जुन घाबरला व सगुण रूप दाखव म्हणू लागला. तेव्हा देदीप्यमान, कुणीही न पाहिलेले असे विश्‍वरूप भयंकर असले, तरी यापेक्षा माझे चतुर्भुज रूप श्रेष्ठ समजू नकोस, असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. असे असले तरी पावसाळ्यात रौद्ररूप धारण करणार्‍या भगवंताच्या रूपाची आपल्याला भीतीच वाटते व आपण ते रूप सौम्य करण्यासाठी भक्तीचाच आधार घेतो. उत्तराखंडातील विध्वंस टीव्हीवर पाहतानादेखील मन भयकंपित झाले तसेच केरळमधीलही. त्यामागील भगवंताचा हेतू अनाकलनीय असतो.
भक्तीचा सोपान चढताना सातव्या अध्यायात भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी. ज्ञानी सोडून सगळ्यांची कामनिक भक्ती, वणिक, भक्ती, देवघेवीची. आर्त भक्त दु:ख नाहीसे होण्याकरता, तर अर्थार्थी धनाकरिता, जिज्ञासू भगवंताला जाणण्याकरिता. त्यामुळे या तिघांची भक्ती गौण मानली आहे. मात्र, ज्ञानी भक्त कसा असतो तर जनांमधे राहे। जनावेगळी गोष्टी सांगे।
आपल्या सर्वांना परिचित असणारे जनार्दनस्वामी भगवे कपडे व खांद्याला झोळी. त्यात योगाची पुस्तके. संपूर्ण जीवन योगासाठी वाहिलेले. त्याशिवाय बोलणं नाही. आसनं करता का? जमत नसेल तर सांगतो. करवून घेत. युक्त आहारविहार.
पुण्याचे स्वामी माधवनाथ. गेल्यावर दोन मिनिटं कौटुंबिक बोलणे. लगेच ध्यानाला बसता का? दासबोध, ज्ञानेश्‍वरीचे नित्य वाचन चालू आहे नं! अत्यंत मृदु बोलणे. डोळ्यांतून स्नेह. ज्ञानेश्‍वरीशिवाय चिंतन नाही. असे कितीतरी ज्ञानी भक्त आपल्या अवतीभवती असतात, पण चर्मचक्षूंनी त्यांना आपण ओळखू शकत नाही.
अहा थोर बाऊर जाहालें
अमृतें संमार्जन म्या केले
वारिकें घेऊन दिधले। कामधेनुतें॥५३८.११॥
हे आजिचेंचि पाहे पां रोकडे। कवण जुंझ हे केवढे। एथ परब्रह्म तू उघडे। सारथी केलासी ॥११.५४१.
अर्जुन म्हणतो, हाय हाय माझे फार अनुचित वर्णन झाले. मी अमृताने सडासंमार्जन केले, कामधेनूला देऊन शिंगरू घेतले. आजचेच पाहा, हे युद्ध ते काय व कितीसे, पण तू स्पष्ट परब्रह्म असून तुला मी या क्षुल्लक कामासाठी सारथी केला.
ज्ञानचक्षूच्या अभावाने आपण या ज्ञानी भक्ताला म्हणजेच ज्ञान्याला ओळखू शकत नाही. तो ज्ञानी भक्त होण्यासाठी प्रथम गौणी भक्ती टाकावी लागते. प्रपंचात भक्तीच्या परीक्षा द्यायला वेळ नसतो, तेव्हा भगवंतच भक्ताला मार्ग दाखवतात. थोडा वेळ काढून ‘जेथे नामघोषु बरवा करिती माझा’ तिथे बैस, मुखाने नामगजर कर, कानाने श्रवण कर, या देहाची काय दशा होणार आहे, ते समजून घे. काळाच्या मुखात दरक्षणाला तुझ्या देहाचा घास पडतोय्, तेव्हा सावध हो. मला सन्मुख होण्याची तातडी कर. भगवंतांनाच जणू जिवाला बाहेर काढायची घाई आहे. माउली म्हणते, ‘झडझडोनि वहिला निघ। इथे भक्तिचिये वाटे लाग॥’
दहाव्या अध्यायात अर्जुन भगवंतांना, या सृष्टीत मी तुम्हाला कुठे कुठे पाहू, असे विचारतो. भगवंत ७५ विभूती सांगतात व महत्त्वाची ओवी ज्ञानोबा सांगतात-
जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोग निश्‍चित। जाण माझा ॥१०/११८॥
सगळ्यांमध्ये मला पाहणं, हीच खरी भक्ती व त्यानुसार आचरण करतो तोच खरा भक्त! इतकी सोपी व्याख्या भक्त व भक्तीची केली.
अशी भक्ती व भक्त जिथे तिथे मी आहेच. मलातरी कुठे वैकुंठात करमतंय्? ज्यांच्या मुखी माझे नाम, ज्यांची दृष्टी माझे रूपात मग्न, ज्यांचे श्रवण माझीच कीर्ती ऐकतात ते कुठल्याही योनीमध्ये असे नात का. शबरी असो की अजामेळ असो, गजराज असो की वानर असो, त्या सर्वांचा सांभाळ मी करतो. मला ते लेकुरवाळेपण आवडतं. मी मिरवतो
पैं भक्ती एकी मी जाणें
तेथ सानें थोर न म्हणें
आम्ही भावाचे पाहुणें
भलतेया।
मी फक्त भक्ती जाणतो. भाव ओळखतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अव्याभिचारी भक्ती भगवंताला आवडते. सोमवारी शिव, मंगळवारी गणपती, गुरुवारी दत्त, तर शुक्रवारी देवीशिवाय वेळप्रसंगी आणखी कोणी पुजणे ही भक्ती नव्हे. हा तर भक्तीचा व्यभिचार, असे स्पष्टपणे ज्ञानोबा सांगतात.
हे समस्तही श्रीवासुदेवो
ऐसा प्रतितीरसाचा वोतला भावे।
म्हणौनि भक्तांमाजी रावो। आणि ज्ञानिया तोचि॥
तो ज्ञानी भक्त म्हणून मला सर्वात प्रिय आणि घाबरू नकोस, तुला जर असं माझं लाडकं व्हायचं असेल, तर तुला मी सोपा मार्ग सांगतो. तू आपलं चित्त, मन बुद्धिसहित मला देऊन टाक. हे कठीण वाटते का? बरं मग असं कर, दिवसाचे आठ प्रहर यातले रोज त्रोटके निमिषभरी चित्त तू मल दे. असे रोज देता देता ते चित्त भोगाकडून निघून भक्तीला लागेल आणि मग हळूहळू ते मलाच अर्पण होईल. अरे. अभ्यास करणार्‍याला काय कठीण सांग बरं? आणखी या भक्तीचे गुपित सांगतो, हे जे तुझे चंचल मन आहे ना, त्याचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे वर्णन ज्ञानोबा छान करतात-
‘कां जे यया मनाचे एक निकें
जे देखिले गोडीचिया ठाया सोके
मग अनुभव सुखचि कवतिकें
दावीत जाईजे।’
तू याला एकदा का चांगल्या गोष्टीची, मग भजन असो, जप असो, ध्यान असो, गोडी लावली की तेच करायला ते सोकावतं व तू नाही म्हटलंस तरी तुला ‘त्या’ अनुभवसुखाची आठवण करून तिथेच घेऊन जातं व जाता जाता भगवंताचेच होऊन जातं.
ज्ञानेश्‍वरी वाचता वाचता आपण भान विसरून जातो. भक्त-भगवंत एकरूप होतात. अशा भक्ताला आलिंगन द्यायला भगवंत दो वरी दो भुजा घेऊन चतुर्भुज होतात. भक्ताचे अपरंपार कौतुक भगवंतांना असते, त्यामुळे आपण भक्तीचे बालक व्हावे व माउलीच्या मांडीवर लोळून किंवा कडेवर बसून लाड करून घ्यावे.
ज्ञानेश्‍वरी जयंतीच्या निमित्ताने एक जाणवले की, भौमर्षी विनोबाजींच्या ‘गीताई’चीदेखील जयंती साजरी व्हायला पाहिजे. विनोबाजींच्या १२३ व्या जयंतिनिमित्त त्यांच्या गीताईचं चिंतन खास जाणवून गेलं. ती मराठी साहित्यापेक्षा गृहिणीलाच जास्त भावणारी आहे. ग्रामीण भागात आजही दिवसभराचे काम आटोपून घरी परतलेल्या माता-भगिनींना गीताई ज्ञान व विरंगुळा याहीपेक्षा वाचनाचे वेड लावेल. ‘‘आपल्याले काय बापा गीता समजते, पन इनोबांची गीताई लई सोप्पी. देवानं अर्जुनाले का सांगितलं ते लई सोप्या भाषंत लिवलं हाय त्याईनी. जीवन कसं जगलं पायजे ते बी वाईच समजत बगा!’’ हे उद्गार घरोघरी ऐकू यावेत.
आ. विनोबांच्या आईने त्यांना म्हटले, ‘‘विन्या, तूच गीतेचा अनुवाद का करीत नाहीस? तू नक्की करू शकशील.’’ १९१५ ची ही घटना. १९१८ ला विनोबांची आई गेली! आईच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी १९३० च्या ७ ऑक्टोबरच्या पहाटेच्या प्रार्थनेनंतर ५ वाजता त्यांनी गीताई लेखनाला सुरवात करून ६ फेब्रु. १९३१ ला पूर्ण केली. आईच्या निधनानंतर १४ वर्षांनी. त्या काळी त्याचे मूल्य एक आणा होते. गाडे गुरुजींनी घरोघरी जाऊन पोचवण्याचा प्रयत्न केला.
आज ज्ञानोबा जगात नाहीत, पण ‘ज्ञानेश्‍वरी’ कायम आहे. तसेच विनोबा गेले, पण ‘गीताई’ मागे आहे. •••

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (242 of 835 articles)

Historical Haritage
भाग्य विधाता : प्रशांत आर्वे | ...याचा वसा गेले पाचशेपन्नास दिवस चंद्रपुरातील तरुणांच्या ‘इको प्रो’ या स्वयंसेवी संस्थेने घेतला आहे. ...

×