ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी |

स्वयंसेवकत्व हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आधार अटलबिहारी वाजपेयींनी अबाधित राखला आहे. ‘राजनीति की रपटिली राहे’ या पुस्तकात अटलजी म्हणतात, ‘‘लाखो स्वयंसेवकांचे कष्ट, परिश्रम, त्याग व समर्पण यामुळे आपल्याला हा दिवस पाहायला मिळत आहे. जे आज आपल्यात नाहीत अशा सर्वांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आणि जे स्वयंसेवक आज आपल्यासोबत आहेत त्या सर्वांना मी असे आश्‍वासन देतो की, ज्यामुळे संघाच्या धवल कीर्तीला काळिमा लागेल असे कोणतेही काम माझ्या हातून कधीही होणार नाही.’’ पन्नास वर्षांहून अधिक काळ अटलजी संसदेत आहेत. संघावर जे आरोप-प्रत्यारोप केले जातात, त्यांची सडेतोड उत्तरे देऊन अटलजींनी विरोधकांना निरुत्तर केले आहे.

Atal Bihari Vajpayee Rss

Atal Bihari Vajpayee Rss

भारताचे पंतप्रधान, एक महान राजकीय नेते, विकासपुरुष अशी अटलजींची ओळखच सर्वमान्य आहे, त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हीसुद्धा त्यांची ओळख आहे आणि आपण स्वयंसेवक असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. ‘संघ माझा आत्मा आहे,’ असे ते म्हणतात. १९३९ पासून त्यांचा संघाशी संपर्क आला. त्या वेळी ते आर्य कुमार सभेमध्ये जात असत. तिथे त्यांची भेट भूदेव शास्त्री यांच्याशी झाली. त्यांनी अटलजींना सहज विचारले, ‘‘सायंकाळी तू काय करतोस?’’ ते म्हणाले, ‘‘विशेष काही नाही.’’ शास्त्रींनी त्यांना सायंकाळी संघाच्या शाखेत जाण्यास सांगितले. अटलजी रोज शाखेत जाऊ लागले. शाखेतील खेळ व कार्यक्रम त्यांना खूप आवडले. पण, त्याहीपेक्षा आठवड्यातून एकदा होणार्‍या बौद्धिक कार्यक्रमाचे त्यांना अधिक आकर्षण होते.
अटलजींवर त्या वेळी सर्वात जास्त प्रभाव पडला तो संघाचे प्रचारक नारायणराव तर्टे यांचा. अटलजी त्यांना आपले गुरू मानतात. आता तर्टे यांचे वय नव्वदीपेक्षाही जास्त आहे. ते नागपूरला महाल कार्यालयात राहतात. नारायणराव तर्टे यांनीच अटलजींना देशभक्तिपर कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अटलजींनी हे गुरुशिष्याचे नाते प्रकटपणे व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘‘मी आज जो काही आहे तो नारायणराव तर्टे यांच्यामुळेच!’’
अटलजींवर प्रभाव टाकणारे अन्य ज्येष्ठ संघकार्यकर्ते म्हणजे बाबासाहेब आपटे, भाऊराव देवरस व पं. दीनदयाळ उपाध्याय हे होत. १९४० सालचा संघ शिक्षावर्ग पाहण्यासाठी अटलजी गेले असताना, संघसंस्थापक प.पू. डॉक्टरजींचे प्रथम दर्शन त्यांना झाले होते. अटलजींचा प्रथम संघ शिक्षावर्ग १९४२ साली झाला. ते जेव्हा तृतीय वर्ष शिक्षित झाले तेव्हा ते बी.ए. शिकत होते. इयत्ता दहावीत असतानाच त्यांनी ‘हिंदु तन मन, हिंदु जीवन…’ ही प्रसिद्ध कविता केली होती. अटलजींनी १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेऊन कारावास भोगला होता. त्या वेळी त्यांचे वय १६ वर्षे होते. १९४७ पासून ते संघाचे प्रचारक म्हणून निघाले. जनसंघाच्या स्थापनेपासून त्यांना जनसंघात काम करण्यासाठी पाठविण्यात आले.
भाऊराव देवरस यांचे १५ एप्रिल १९९२ रोजी निधन झाले. निगमबोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी श्रद्धांजली वाहताना अटलजी म्हणाले, ‘‘पू. डॉक्टरजींबद्दल असे म्हटले जाते की, चलते चलते वे स्वयं राह बन गये! (मार्गावर वाटचाल करता करता ते स्वत:च मार्ग बनले.) भाऊरावदेखील याच श्रेणीतील कार्यकर्ते होते.’’ त्या वेळी अटलजींनी भाऊरावांची एक आठवण सांगितली. एकदा एका कार्यक्रमासाठी चाळीसेक तरुण स्वयंसेवक भोजन करीत होते. एक स्वयंसेवक दही वाढत होता. त्याचा पाय अडखळला व हातातील दह्याचे मडके खाली पडून फुटले. सर्वांचे लक्ष त्याकडे गेले, पण कुणी काहीही बोलायच्या आत भाऊराव पटकन उद्गारले, ‘‘त्याच्या पायाला लागलेबिगले का ते पाहा बरं!’’ त्यांच्या एका शब्दाने सर्वांचे लक्ष दह्यावरून त्या स्वयंसेवकाच्या पायावर गेले. अटलजींनी जाणले की, हा माणूस काही वेगळाच आहे. माणसांची काळजी घेणारा, माणसांची मने राखणारा हा माणूस आहे. आपल्या एका वाक्याने पूर्ण वातावरण बदलून टाकण्याचे सामर्थ्य अंगी असणारा हा माणूस आहे. भाऊरावांचा असा प्रभाव अटलजींच्या मनावर पुढे सतत राहिला.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्याशीही अटलजींचे असेच आत्मीयतेचे संबंध होते. त्यांचाही प्रभाव अटलजींच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आहे. जनसंघाची स्थापना झाल्यापासून अटलजींचे जे नाते उपाध्यायजींशी जुळले ते अगदी अखेरपर्यंत टिकले. अशा रीतीने संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेला एक ज्येष्ठ स्वयंसेवक आज देशाचे मा. पंतप्रधान म्हणून देशाचा गौरव वृद्धिंगत करीत आहे, ही सर्व स्वयंसेवकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
स्वयंसेवकत्व हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आधार अटलबिहारी वाजपेयींनी अबाधित राखला आहे. ‘राजनीति की रपटिली राहे’ या पुस्तकात अटलजी म्हणतात, ‘‘लाखो स्वयंसेवकांचे कष्ट, परिश्रम, त्याग व समर्पण यामुळे आपल्याला हा दिवस पाहावयाला मिळत आहे. जे आज आपल्यात नाहीत अशा सर्वांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आणि जे स्वयंसेवक आज आपल्यासोबत आहेत त्या सर्वांना मी असे आश्‍वासन देतो की, ज्यामुळे संघाच्या धवल कीर्तीला काळिमा लागेल असे कोणतेही काम माझ्या हातून कधीही होणार नाही.’’
पन्नास वर्षांहून अधिक काळ अटलजी संसदेत आहेत. विरोधकांकडून संघावर केली जाणारी टीका अनाठायी आणि अनुचित असल्याचे अटलजींनी त्यांच्या लक्षात वेळोवेळी आणून दिले आहे. संघावर जे आरोप-प्रत्यारोप केले जातात, त्यांची सडेतोड उत्तरे देऊन अटलजींनी विरोधकांना निरुत्तर केले आहे. १९९६ साली त्यांचे तेरा दिवसांचे सरकार असताना संसदेत विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘‘ज्या संघटना राष्ट्र उभारणीच्या आणि व्यक्तिनिर्माणाच्या कार्यात गुुंतलेल्या आहेत अशा संघटनांची नावे ओढूनताणून या चर्चेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माझा इशारा रा. स्व. संघाकडे आहे. रा. स्व. संघाच्या विचारांशी कुणाचा मतभेद असू शकतो. परंतु, संघावर जे आरोप केले गेले ते करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. संघाच्या रचनात्मक कार्याबद्दल काँग्रेस व अन्य पक्षांच्या मनातसुद्धा आदराची आणि सहकार्याची भावना आहे. जर संघाचे लोक दीनदु:खी लोकांच्या वस्तीत जाऊन कार्य करीत असतील, वनवासी लोकांच्यात जाऊन शिक्षण प्रसाराचे कार्य करीत असतील तर यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहिजे. तसेच त्यांना पूर्ण सहकार्य केले पाहिजे.’’
अटलजी पुढे म्हणाले की, ‘‘मी एक ताजे उदाहरण देतो. मी या गोष्टीचा उल्लेख करीत नाही की, चीनच्या आक्रमणानंतर पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली आपली राष्ट्रीय एकजूट प्रकट करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी ज्या स्वयंसेवी संघटनांना बोलावण्यात आले होते, त्यांच्यात रा. स्व. संघाचाही समावेश होता. मात्र, त्यांच्यात कम्युनिस्टांचा समावेश नव्हता. कम्युनिस्ट तेव्हा कोठे होते ते मी सांगू इच्छित नाही. लालबहादूर शास्त्री हे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आपले पाकिस्तानसोबत युद्ध झाले तेव्हा दिल्लीत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षित माणसांची गरज भासली तेव्हा संघाचे स्वयंसेवकच ते काम करण्यासाठी सरसावले होते.’’
अलीकडेच बंगलोरमध्ये आणिबाणीच्या विरोधात एक संमेलन घेण्यात आले ज्यात देवेगौडा उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रा. स्व. संघ ही एक निष्कलंक संघटना आहे. चाळीस वर्षांहून अधिक काळाच्या माझ्या राजकीय जीवनात मी एकदाही संघावर टीका केलेली नाही. ही गोष्ट ते अत्यंत जबाबदारीने सांगत आहेत व आणिबाणीच्या काळात संघाने जी सक्रिय भूमिका बजावली होती त्याबद्दलही आपले काही दुमत नाही, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आणिबाणीच्या काळात जे लोक इंदिराजींच्या सोबत होते, त्यांची व आणिबाणीची प्रशंसा करीत होते, ते लोक आज आमच्या सोबत आहेत व सत्तेचे सुख अनुभवीत आहेत. जिला काळिमा लागलेला नाही अशी एकमात्र संघटना म्हणजे रा. स्व. संघच आहे! इतर लोक तर कधी इकडे तर कधी तिकडे असे भटकत राहिले आहेत.
आपल्या एका भाषणात अटलजी म्हणाले होते की, ‘‘या देशातील जे लोक देशभक्त, विवेकी आहेत व अंत:करणपूर्वक देशाचे भले इच्छितात आणि संघाच्या संपर्कात आले आहेत असे सर्वजण ही गोष्ट जाणतात की, ही संघटना देशहिताकरिता समर्पित आहे.’’
अटलजी असे पहिले पंतप्रधान आहेत की, ज्यांनी पूर्वेकडील देशांचा प्रवास केला आहे. उदा. थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया इ. त्यांच्या या भेटीमुळे या देशांशी आपले सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. कारण या देशांची संस्कृती व आपल्या देशाची संस्कृती यांच्यातील साम्य ते जाणतात. अटलजींनी एक स्वयंसेवक म्हणून या देशाचा सांस्कृतिक वारसा आत्मसात केला आहे, जोपासला आहे. जागतिक स्तरावरील नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची आणि आत्मीयतेची भावना आढळून येते. अशी भावना निर्माण करण्यात आपल्या स्वयंसेवकत्वामुळेच त्यांना चांगले यश लाभले आहे.
आपली भारतीय संस्कृती जगाच्या समोर योग्य प्रकारे मांडण्यातदेखील त्यांना यश लाभलेले आहे. येथे अल्पसंख्यक समाज सुरक्षित नाही, अशी आवई मतलबी लोकांकडून वारंवार उठविण्यात येत असते. परंतु, यातील फोलपणा अटलजींनी वेळोवेळी दाखवून दिला आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यता फार पुरातन आहे आणि सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा गुणविशेष आहे. हा गुण भारतीयांच्या रक्तातच भिनलेला आहे. म्हणून येथे अल्पसंख्य समाजाला भय बाळगण्याचे काही कारण नहाी. ते नेहमीच येथे सुरक्षित राहणार आहेत, हे अटलजींनी स्पष्ट केले आहे. भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगून एक प्रकारे संघविचारच त्यांनी मांडलेला आहे.
अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू आहे आणि तो म्हणजे निगर्वित्व आणि ऋजुता. एका संघ शिक्षावर्गात १९५९ साली मी त्यांना प्रथमच पाहिले होते. पू. श्रीगुरुजींच्या बौद्धिक वर्गाच्या वेळी स्वत: गुरुजींनीच सर्व शिक्षार्थींना त्यांचा परिचय करून दिला होता. ते संसदपटू आहेत, जनसंघाचे मोठे नेते आहेत, इ. गुरुजी सांगत होते, तेव्हा त्यांच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकताना अटलजी संकोचून उभे होते. मी त्यांना जवळून ओळखतो. मी त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहे, पण संघाचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नेहमीच त्यांनी मला आदराची वागणूक दिली आहे. केवळ माझाच नव्हे, तर इतरांचाही असाच अनुभव आहे. चमनलालजी हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांना आजारपणात सुयोग्य उपचार मिळावेत म्हणून अटलजींनी स्वत: लक्ष घातले होते.
अटलजींच्या स्वभावाचा आणखी एक विशेष गुण म्हणावा लागेल की, कुणी त्यांच्याबद्दल काहीही प्रतिक्रिया व्यक्त करोत, त्यांनी मनाचा समतोल कधी ढळू दिला नाही. संघपरिवारातील संस्थांबद्दल कधीही कटु उद्गार त्यांनी काढलेले नाहीत. अटलजी विरुद्ध अडवाणीजी असाही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु, सहकारी कार्यकर्ता म्हणून आदर्श उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले आहे, हे आज आपण पाहतो आहोत. तसेच सहमतीच्या राकारणाचा जो वस्तुपाठ अटलजींनी घालून दिला आहे त्यामुळे ज्याला पर्याय नाही असे समर्थ नेतृत्व अटलजींच्या रूपाने आज देशाला लाभले आहे.

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (429 of 926 articles)

Atal Bihari Vajpayee Hd
आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च अधिकारांचे वजन लपेटून एका पारड्यात बसलेले वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि अनुभवसमृद्ध अटलजी आणि ...

×