ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:

स्वामी शरणम् अय्यप्पा…

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

हिंदू समाज हा काळानुसार सातत्याने बदलत गेला आहे. योग्य बदल त्यांनी नेहमीच अंगीकारले आहेत. आपली उपासनापद्धती मानत नसणार्‍या व्यक्तीला ठार करा; अशा हजार वर्षांपूर्वीच्या वाळवंटी संकल्पना घेऊन चालणारा हा समाज नव्हे! मात्र, जिथे स्त्री-पुरुष समानता हा मुद्दाच नव्हता, तिथे जाणीवपूर्वक तसा रंग देऊन हिंदूंचीच दिशाभूल करण्यात आली. शबरीमला निर्णयाविरुद्ध केरळमधील हिंदू संघटनांनी पुकरारलेल्या आंदोलनातील महिलांच्या प्रचंंड उपस्थितीतून हेच दिसून येते की महिलांचा देखिल या निर्णयाला विरोध आहे.

Ayyappa Swami Shabarimalai Protest

Ayyappa Swami Shabarimalai Protest

सप्टेंबर २०१८ च्या अखेरच्या आठवड्यात मा. सर्वोच्च न्यायालयाने, ४-१ अशा बहुमताने निर्णय देत शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात सर्व वयाच्या स्त्रियांना प्रवेश मिळावा, असा निर्णय दिला. पाचपैकी एकमेव महिला न्यायाधीश असलेल्या जस्टिस इंदू मल्होत्रा यांनी मात्र आपला निर्णय याविरुद्ध असल्याचे नमूद केले. तसे करतानाच त्यांनी नोंदवलेली प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे होती :
१. कोणत्याही धार्मिक बाबींत हस्तक्षेप करणारी जनहित याचिका दाखल केली जाणे/स्वीकारली जाणे हे देशाच्या समाजव्यवस्थेचे स्वास्थ्य धोक्यात आणणारे आहे.
२. घटनेच्या २५ व्या कलमानुसार दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा विचार करता; जोवर विशिष्ट भाविक समुदायातील व्यक्तींना आपल्या समुदायातील एखाद्या प्रथेबद्दल आक्षेप नाही; तोवर त्याबाबत न्यायालयाने ढवळाढवळ करणे योग्य नाही.
३. शबरीमला मंदिर वगळता अन्य सर्वच अय्यप्पा मंदिरांत स्त्रियांना प्रवेश आहे. या मंदिरांत अय्यप्पा स्वामी हे नैष्ठिक ब्रह्मचारी रूपात स्थापित असल्याने तिथे ठरावीक वयोगटातील महिलांना प्रवेश नसल्यास त्यात आक्षेपाचे काही कारण नाही. कारण हा प्रश्‍न लिंगभेदाचा नसून धार्मिक श्रद्धेचा आहे.
४. या मंदिरात महिलांना अशुद्ध मानून प्रवेश नाकारला जातो, हा अत्यंत चुकीचा समज आहे. येथील परंपरा कित्येक वर्षे चालत आल्या असून त्यांना आख्यायिकेचा आधार आहे. त्यामुळे घटनेचे कलम १६ इथे लागू करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.
न्यायाधीश मल्होत्रा यांनी उपस्थित केलेली निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण, शबरीमला प्रकरणाला देशातील छद्मी पुरोगामी आणि स्त्रीमुक्तिवाद्यांनी अतिशय विपर्यस्त स्वरूपात सामान्य जनतेसमोर ठेवले. या मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळाल्याने आनंद साजरा करणार्‍या बहुतांश लोकांना हे प्रकरण नेमके काय होते, तेदेखील नीटसे माहिती नाही. शबरीमला येथे स्त्रियांना प्रवेश का दिला जात नसे? या प्रश्‍नाचे उत्तर बहुतेक जण मासिक पाळीच्या वेळची तथाकथित अशुद्धता म्हणून किंवा लिंगभेद म्हणून, असे देतात. मात्र, हे गैरसमज जाणीवपूर्वक रुजवण्यात आले होते, हे नीट लक्षात घेतले पाहिजे.
नेमके प्रकरण काय होते?
पौराणिक आख्यायिकेनुसार; गालव ऋषींना महिषासुर आणि माहिषी नामक अपत्ये होती. महिषासुराचा वध दुर्गेने केला, तर माहिषी या राक्षसीचा वध शिव-मोहिनी यांच्या अपत्याने म्हणजेच अय्यप्पाने केला. यानंतर माहिषी शापमुक्त होऊन तिचे रूपांतर मलिकापूरथम्मा नामक सुंदर स्त्रीमध्ये झाले. तिने अय्यप्पा स्वामींना लग्नाची मागणी घातली. नैष्ठिक ब्रह्मचर्य स्वीकारलेल्या अय्यप्पांनी तिला, ज्या वेळी कुणीही कन्नी अय्यप्पा माझ्या दर्शनाला येणार नाही तेव्हा तुझ्याशी लग्न करेन, असे सांगितले. मलिकापूरथम्माचे मंदिरही अय्यप्पा मंदिराशेजारीच आहे. तिला दिलेल्या शब्दाचा मान आणि नैष्ठिक ब्रह्मचर्य कायम राहावे, यासाठी शबरीमला येथे प्रजननक्षम वयातील महिला दर्शनास जात नसत. १०-५० वर्षे वयोगट वगळता अन्य वयाच्या महिलांना प्रवेशबंदी नव्हती. थोडक्यात, हा प्रश्‍न जस्टिस मल्होत्रा यांनी नमूद केल्याप्रमाणे श्रद्धेचा होता, भेदभावाचा नाही. ज्यांची श्रद्धा आहे अशा महिला स्वखुषीने हा निर्णय पाळत होत्या. किंबहुना यातील कित्येक महिलांनी तर ठशरवू ढे थरळीं असे अभियानही चालवले होते. बहुसंख्य धार्मिक हिंदू स्त्रियांचा या प्रथेला कोणताही आक्षेप नव्हता.
असे असताना, पाच याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात घटनेच्या कलमांची पायमल्ली होत आहे असे सांगत, मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. वाचकांपैकी बर्‍याच जणांना ठाऊक नसेल; पण यांतील तीन याचिकाकर्त्या अ‍ॅड. प्रेरणा कुमारी, अ‍ॅड. सुधा पाल आणि अ‍ॅड. लक्ष्मी शास्त्री यांनी ऑर्गनायझर नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाची आपल्याला संपूर्ण माहिती नव्हती आणि महिलांच्या भावना देवस्थानच्या निर्णयासोबत आहेत हेही माहिती नव्हते, अशी कबुली दिली. ‘हॅपी टू ब्लीड’ नामक एका टोळक्याने या प्रकरणात अकारण हैदोस घालून वेगळेच वळण दिले. वरील याचिकाकर्त्यांना याचिका मागे घ्यायची होती. मात्र, एकदा सुनावणीसाठी समोर आलेली याचिका मागे घेता येणार नाही, असे मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याने प्रकरण सुरूच राहिले. जस्टिस मल्होत्रा यांनी नोंदवल्यानुसारच, संबंधित धार्मिक समुदायाने ही याचिका दाखल केली नसून; ज्यांचा या प्रथेशी संबंधही नाही वा ज्यांना याबाबत पूर्ण माहिती नाही असे लोक यात सामील होते. तरीही या व्यक्तींना स्त्रियांच्या हक्काबद्दल भूमिका घ्यावीशी वाटली, याचे आपण स्वागत करू या. पण, आश्‍चर्याची बाब अशी की, याचिकाकर्त्यांपैकी एक आणि इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या अ‍ॅड. नौशाद खान याला हिंदू मंदिरातील स्त्री-पुरुष समानता हा विषय आठवला, मात्र त्याच वेळी त्याच्या स्व-पंथाच्या प्रार्थनास्थळात वा रूढी-परंपरा यांत कोणताच लैंगिक भेदभाव दिसला नाही का? त्याबाबतही काही भूमिका का घ्यावीशी वाटली नाही? तिहेरी तलाक वा हलालाबाबत समानतेचे झेंडे मिरवणारे हे महाशय काहीच का बोलले नाहीत? हे प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहेत. काही ना काही कारण काढून आणि खोटे चित्र उभे करत हिंदूंना बडवणे, इतकाच एककलमी पुरोगामी कार्यक्रम सुरू असतो, याचे आणखी काय प्रमाण हवे बरे? प्रत्यक्षात हिंदू समाज हा काळानुसार सातत्याने बदलत गेला आहे. योग्य बदल त्यांनी नेहमीच अंगीकारले आहेत. आपली उपासनापद्धती मानत नसणार्‍या व्यक्तीला ठार करा; अशा हजार वर्षांपूर्वीच्या वाळवंटी संकल्पना घेऊन चालणारा हा समाज नव्हे! मात्र, जिथे स्त्री-पुरुष समानता हा मुद्दाच नव्हता, तिथे जाणीवपूर्वक तसा रंग देऊन हिंदूंचीच दिशाभूल करण्यात आली.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवायलाच हवा. मात्र, आजही कित्येक धार्मिक स्त्रिया आपल्या ठशरवू ढे थरळीं या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र आहे. देशात लाखो मंदिरे आहेत, जिथे कुणालाही बंधनाशिवाय दर्शन घेता येते. पुष्कर, अत्तुकल, कामायनी कामाख्या आणि विशाखापट्टणम् येथील कामाख्या पीठम् या मंदिरांत दर महिन्यातील ठरावीक दिवस पुरुषांना प्रवेशास मनाई असते. धार्मिक पुरुष या नियमाबाबत कोणतेही आक्षेप नोंदवताना आढळणार नाहीत. कारण, हे नियम पाळण्याकडे धार्मिक स्त्री-पुरुषांचा कल असतो. ते मोडून आपण क्रांती घडवत आहोत, असे गैरसमज त्यांना नसतात. ज्यांना केवळ प्रसिद्धीसाठी अभियाने चालवायची असतात, ते लोक मात्र जमेल त्या ठिकाणी हिंदूंच्याच धार्मिक श्रद्धांना दुखवण्यात धन्यता मानतात. हिंदू स्मशानात वाढदिवस साजरा करणारे लोक, कधी कब्रस्तानातही पार्टी करून दाखवण्याचे शौर्य दाखवतील काय?

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (174 of 1211 articles)

Sonia Rahul
संवाद : सोमनाथ देशमाने | आपण पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देशहितासाठी काय करणार आहोत, याविषयी मोदीविरोधक एक शब्द बोलायला तयार नाहीत. ...

×