ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:

हा तर अलर्ट कॉल!

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

आपण सोयीनं शब्दांचे अर्थ लावतो. आपल्याच सोयीनं ते बदलतो. कधीकधी मान्यवरांच्या वाक्यांची बिनधास्त मोडतोडही करतो. हे सगळं करताना आपल्याला निपक्षपातीपणा औषधालासुद्धा आठवत नाही. आणि आता मात्र न्यायालयाच्या निर्णयावर उलटसुलट चर्चा मात्र सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र न्यायालयानं व्यक्तिगत नीतीमत्तेलाच महत्व दिलंय, हे आपण का नाकारतोय?मुळातच, भारतीय नागरिकांनी स्वत:ची सत्सद्विवेकबुद्धी गुंडाळून न ठेवता ती वापरायला सुरूवात करावी, अशीच माननीय न्यायालयाची आत्यंतिक स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छा दिसते..! आणि अशी विवेकी, संयमी, समंजस, चारित्र्यवान माणसं किंवा कुटुंबं दिवसा दिवा घेऊन शोधण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठीचा हा ‘अलर्ट कॉल’ असावा!!!

Law Cartoon

Law Cartoon

‘शुभ बोल रे नार्‍या तर म्हणे मांडवाला लागली आग’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. सध्या देशात असंच काही तरी वातावरण आहे. कारण काय तर न्यायालयानं विवाहबाह्य संबंधांबाबत दिलेला निर्णय!
कलम ३७७ पाठोपाठ आता कलम ४९७ देखील सर्वोच न्यायालयाकडून रद्दबातल. कलम ४९७ मध्ये महिला कधीच दोषी धरली जात नव्हती. फक्त असे संबंध ठेवणारा पुरुष गुन्हेगार ठरवला जात असे, त्यामुळे हे कलम रद्द व्हावे अशी मागणी होती. त्यानुसार आता ४९७ हे घटस्फोटाचे मुख्य कारण होऊ शकते मात्र हा फौजदारी गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर समजा एखाद्या जोडीदाराने अनैतिक संबंधांना कंटाळून आत्महत्त्या केली तर मागे राहिलेल्या पार्टनरवर आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल होवू शकतो. अर्थातच, असे अनैतिक सबंध अस्तित्वात होते असा स्पष्ट सबळ पुरावा न्यायालयासमोर यायला हवा.
अनैतिक संबंध चुकीचे आहेत हे न्यायालयाने नाकारलेले नाही. परंतु, हा नैतिक गुन्हा आहे, फौजदारी नाही, असा न्यायासनाचा रोख आहे. अनैतिक संबधांमुळे वैवाहिक नाती मोडकळीस येतात असे म्हणण्यापेक्षा, सध्या असलेल्या वैवाहिक नात्यात जोडीदाराला (त्याच्या अपेक्षेप्रमाणे किंवा त्याला जसे व जेवढे हवे तसे) कसलेही सुख समाधान लाभत नाही म्हणून लग्नाव्यतिरिक्त अनैतिक संबंध ठेवले जातात.
कलम ४९७ हे घटनेच्या आर्टिकल १४ आणि आर्टिकल २१ ला बाधा आणणारे आहे. त्यामुळे ते सांविधानिक नाही.
या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की पती हा पत्नीचा मालक नाही. याचा अर्थ पत्नीने दुसर्‍या पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबध ठेवले तर तो गुन्हा होऊ शकत नाही. भारत सोडून आत्तापर्यंत अनेक देशात व्यभिचार हा लीगल/ कायदेशीर मानला जातो तो गुन्हा मानला जात नाही. (हे देखील सुप्रीम कोर्टाचेच म्हणणे आहे) त्यामुळे व्यभिचार हा वैवाहिक गुन्हा होऊ शकत नाही.
आता हा झाला न्यायासनानं दिलेला निर्णय! लगेच ऊहापोह सुरूच झाला. मला प्रश्‍न पडतो की, असे किती न्यायालयीन निर्णय आणि कायदे माणसं पाळतात? आणि स्वत:च जगण्यातले नियम ठरवण्याइतपत बुद्धी असलेल्या माणसाला काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवता येऊ नये?
न्यायालय म्हणतं ‘वाहतुकीचे नियम पाळा’, आपण ते कुठं पाळतो? न्यायालय म्हणतं, ‘कॉपी करणं हा गुन्हा आहे’, आपण ते कुठं पाळतो? आपण नियमबाह्य बांधकामं करतो, खोट्या बोगस संस्था चालवतो, पैशांची करोडो रूपयांची अफरातफर करतो, आपल्यात बोगस डॉक्टर निघतात, भ्रष्टाचार करून परीक्षा पास झालेले सनदी अधिकारी निघतात, आपल्यात मेझॉन वरून पार्सल मागवलेल्या वस्तूऐवजी दगड किंवा साबणाची वडी निघते, सिनेमा-नाटकांच्या पायरेटेड सीडीज् मिळतात, अंमली पदार्थ मिळतात… हे सगळं न्यायालयाच्या नियमांनुसार आहे का?
आत्महत्या.. हा तर मोठा गंभीर प्रश्‍न आहे. न्यायालयीन व्याख्येनुसार तो गुन्हा आहे. पण आत्महत्या करणं थांबलेलं नाही. पंधरा-सोळा वर्षांची मुलं-मुलींसुद्धा आत्महत्या करत आहेत. हे न्यायालयाच्या नियमांमध्ये बसतं का? बेकायदा वीजेची चोरी आजही सुरूच आहे. काकाकुवा मॅन्शन, आदर्श सारखी प्रकरणं स्वच्छ प्रतिमेची उदाहरणं आहेत का?
न्यायासनाचा सन्मान करणार्‍या देशात परीक्षांचे पेपर फुटतातच कसे? पेपर तपासणीत घोळ होतोच कसा? बोगस पीएचडी डिग्री मिळतातच कशा? बेकायदा जमिनी लाटल्या जातातच कशा? डुप्लिकेट औषधं सापडतातच कशी? गर्भलिंग निदान चाचण्या होतातच कशा? वृद्धाश्रम निघतातच कसे? आंतरजातीय विवाह केलेल्या सुनांची किंवा जावयांची सुपारी देऊन हत्या होतेच कशी? एवढ्या न्यायप्रिय देशात अशा गोष्टी घडणं अपेक्षितच नाही. पण तरीही हे सगळंच सुरू आहे.
प्रश्‍न वृत्तीचा आहे, नैतिकतेचा आहे. माणसांच्या स्वत:च्या आंतरिक नैतिकतेच्या अस्तित्वावरच न्यायालयानं यानिमित्तानं बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला न्यायालयीन नियमात बांधून समाज सुधारत तर नाहीच, पण न्यायदेवतेचा आणि कायद्याचा अपमान मात्र क्षणोक्षणी होत राहतो, याकडेच न्यायालयाने सूचकपणे बोट दाखवले आहे. कायद्याच्या भीतीपेक्षा मानसिक संयम आणि शुद्ध चारित्र्याच्या भिंतीच अधिक भक्कम असायला हव्यात असं न्यायासनाचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यात गैर काय आहे?
न्यायालयानं केलेला प्रत्येक निर्णय आपण पाळत तर नाहीच, उलट तो धुडकावण्यातच आपल्याला फार अभिमान वाटतो, हे तर नुकत्याच घडलेल्या डॉल्बी प्रकरणावरून सिद्ध झालेलं आहेच. पॉर्नोग्राफीक वेबसाईट्सवर बंदी आणणारी याचिका खुद्द केंद्र सरकारने दाखल केलेली असतानासुद्धा तिला समाजातीलच काहींनी विरोध केला तेव्हा न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनेच निर्णय दिला, हे आपण विसरू नये.
पण व्यक्तिस्वातंत्र्याच्या सुद्धा काही नैतिक मर्यादा, चौकटी असतात, याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो आणि सोयीस्करपणे आठवणही होते. अभिव्यक्ती, भाषण किंवा लेखन स्वातंत्र्याचा अधिकार वापरून वक्तव्यं करणार्‍यांना ती वक्तव्यं चुकीची निघाली तर नैतिकता किंवा कर्तव्यांना स्मरून जाहीर माफी मागाविशी वाटत नाही. हा आपमतलबीपणा कशासाठी? शोले चित्रपटातल्या दोन्ही बाजू सारख्याच असलेल्या नाण्यासारखाच हा खेळ केला जातोय, असं आपल्याला वाटत नाही का?
आपण सोयीनं शब्दांचे अर्थ लावतो. आपल्याच सोयीनं ते बदलतो. कधीकधी मान्यवरांच्या वाक्यांची बिनधास्त मोडतोडही करतो. हे सगळं करताना आपल्याला निपक्षपातीपणा औषधालासुद्धा आठवत नाही. आणि आता मात्र न्यायालयाच्या निर्णयावर उलटसुलट चर्चा मात्र सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र न्यायालयानं व्यक्तिगत नीतीमत्तेलाच महत्व दिलंय, हे आपण का नाकारतोय?
मुळातच, भारतीय नागरिकांनी स्वत:ची सत्सद्विवेकबुद्धी गुंडाळून न ठेवता ती वापरायला सुरूवात करावी, अशीच माननीय न्यायालयाची आत्यंतिक स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छा दिसते..! आणि अशी विवेकी, संयमी, समंजस, चारित्र्यवान माणसं किंवा कुटुंबं दिवसा दिवा घेऊन शोधण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठीचा हा ‘अलर्ट कॉल’ असावा!!!
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (10 of 1057 articles)

Plastic Polution
विशेष : प्रा. मधुकर बाचुळकर, पर्यावरणतज्ज्ञ | जगभरात दरवर्षी प्लॅस्टिकचा जवळपास नऊ दशलक्ष टन कचरा समुद्रात पडतोय्. याचं सर्वात जास्त ...

×