ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, तरुण विजय, पुरवणी, स्तंभलेखक » हिंदुत्व हाच जगाचा तिसरा पर्याय!

हिंदुत्व हाच जगाचा तिसरा पर्याय!

॥ अन्वयार्थ : तरुण विजय |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे भाषण ऐकण्यासाठी देशातील ख्यातनाम बुद्धिजीवी, राजनयिक, कलावंत आणि विविध पंथांच्या संतमहात्म्यांची सलग तीन दिवस उपस्थिती आणि भाषणाला रोज आदल्या दिवसापेक्षा अधिक गर्दी, हे दिल्लीच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. डॉ. मोहनजी भागवत यांची त्रिदिवसीय व्याख्याने देशातील कोट्यवधी जनतेने विविध चॅनेल्सच्या माध्यमातून ऐकली. सारे जगावेगळे व अभूतपूर्व असेच होते. संघ कोणती चिरंतन, वैश्‍विक मूल्ये मानतो आणि भविष्यातील भारताविषयी संघाला काय वाटते, याविषयी प्रथमच देशवासीयांनी जाणून घेतले.

Rss Dr Bhagwat

Rss Dr Bhagwat

‘‘वर्तमान घृणा आणि हिंसाचाराच्या पल्याड तिसर्‍या वैचारिक पर्यायाचा शोध घेणार्‍या जगाला केवळ भारताचा शाश्‍वत कल्याणाचा विचार व चिरंतन नीतिमूल्येच दिलासा देऊ शकतात. कारण भिन्न मतावलंबीयांना, वेगळे मत असणार्‍यांनाही वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि त्यांचा आदरसन्मान केला पाहिजे, हा मूल्यबोध म्हणजेच हिंदुत्व! जगातील अन्य कुठलाही देश अथवा विचारसरणीत हे सामर्थ्यच नाही. सर्वानुमतीने, सर्वसहमतीने, समाजाच्या सर्व वर्गांना सोबत घेऊन राष्ट्रहितासाठी पुढे घेऊन जाणे, हाच भारताचा मूळ राष्ट्रीय स्वभाव आहे, हाच भारतीय धर्माचा आद्यसंदेश आहे आणि हेच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी आम्हाला सांगितले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणार्‍या, सर्व मतावलंबीयांचा आदर करणार्‍या भारताच्या या राष्ट्रीय स्वभावाचे अनुसरण केल्यानेच आज संघाला सर्वत्र यशप्राप्ती होत आहे आणि याच माध्यमातून संघ अशी पिढी निर्माण करू इच्छितो जी आपल्या बळावर, आपल्या सामर्थ्यावर आणि आपल्या गुणवत्तेने राष्ट्राला परम वैभवाकडे घेऊन जाईल. राष्ट्रविकासाचे श्रेय संघ स्वत:कडे घेऊ इच्छित नाही आणि संघाची ती महत्त्वाकांक्षाही नाही. सर्वांना संघात आवर्जून निमंत्रित करण्यात येते. संघ एक खुले संघटन आहे. आपण संघात, संघस्थानावर येऊन प्रत्यक्ष सर्व गोष्टी बघा, निरीक्षण, अवलोकन करा आणि मगच आपले जे मत बनवायचे आहे ते बनवा. पण आपण निष्क्रिय राहू नये, हीच आमची एकमेव अपेक्षा आहे. आपली इच्छा असेल, तर आपण संघकार्यात प्रत्यक्ष सहभाग घ्या अथवा स्वयंसेवकांद्वारे चालविण्यात येणार्‍या सामाजिक परिवर्तनाच्या कुठल्याही उपक्रमाशी जुळा अथवा आपल्या आवडीनुसार, स्वभावानुसार जे काही छोटे मोठे काम आपण करू इच्छिता ते अवश्य करा, मात्र या राष्ट्राला आपल्या स्वत्वावर उभे करणार्‍या आणि वैभवशाली बनविण्याच्या कुठल्या ना कुठल्या कार्यात, उपक्रमात अवश्य सहभागी व्हा. आपली मते आमच्याशी जुळत नसतील किंवा आपण आमचे वैचारिक विरोधक असलात, तरी राष्ट्रहितासाठी आपण जे काही कार्य करीत आहात त्याला आमचे संपूर्ण सहकार्य लाभेल, आम्ही आपल्याला सक्रिय पाठिंबा देऊ.’’
ही होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची त्रिदिवसीय व्याख्यानमालेत निनादलेली सिंहगर्जना! वस्तुत: ते एक नवे उपनिषदच होते. सनातन, चिरंतन भारतीय मूल्यांची कालानुरूप, आजच्या संदर्भानुसार सरसंघचालकांनी नव्याने केलेली ती मांडणीच होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे भाषण ऐकण्यासाठी देशातील ख्यातनाम बुद्धिजीवी, राजनयिक, कलावंत आणि विविध पंथांच्या संतमहात्म्यांची सलग तीन दिवस उपस्थिती आणि भाषणाला रोज आदल्या दिवसापेक्षा अधिक गर्दी, हे दिल्लीच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. डॉ. मोहनजी भागवत यांची त्रिदिवसीय व्याख्याने देशातील कोट्यवधी जनतेने विविध चॅनेल्सच्या माध्यमातून ऐकली. सारे जगावेगळे व अभूतपूर्व असेच होते. संघ कोणती चिरंतन, वैश्‍विक मूल्ये मानतो आणि भविष्यातील भारताविषयी संघाला काय वाटते, याविषयी प्रथमच देशवासीयांनी जाणून घेतले. केवळ एका संघटनेविषयी ऐकण्यासाठी लोक येथे आले नव्हते, तर त्या शक्तिसंपन्न व भारतातील विविध क्षेत्रात आपले संघटन आणि जनप्रवाहाच्या बळावर नवीन अजेंडा ठरविणार्‍या जगातील सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेला समजून घेण्याचा तो एक सामूहिक प्रयत्न होता, जी आठ वर्षांनी आपली शताब्दी साजरी करणार आहे.
संघ मुस्लिमविरोधी आहे, महिलाविरोधी आहे, वर्णव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्थेनुसार मागासांना अज्ञानाच्या अंधकारात ढकलून देऊ इच्छितो, संघाजवळ ना कुठले शैक्षणिक धोरण आहे ना कुठले आर्थिक धोरण, संघ अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करतो, असा नकारात्मक आणि विषारी प्रचार संघविरोधी विविध संघटना, राजकीय पक्ष आणि पत्रकारांनी सातत्याने आपल्या लेखणी व वाणीद्वारे केला. मात्र, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अतिशय कठोर, टोकदार आणि तीव्र टीकात्मक प्रश्‍नांना अतिशय समर्पक आणि संयमित उत्तरे देऊन तिसर्‍या दिवशी वैचारिक दिग्विजयाचे वातावरण निर्माण केले.
सर्वानुमती अर्थात सर्वांना सोबत घेऊन जाणे, हाच भारताचा मूळ राष्ट्रीय स्वभाव आहे आणि संघ त्याचेच अनुसरण करतो. संघ आपले विचार दुसर्‍यांवर जबरदस्तीने लादू इच्छित नाही, ज्याने त्याने आपले मत व विचारधारेनुसार राष्ट्रहिताचे कार्य करावे. भलेही जर ते आमचे वैचारिक विरोधक असले तरीही आम्ही त्यांना साथ देऊ, त्यांना आपले मानू. संघाचा कुणी शत्रू नाही. संघ कुणालाच आपला शत्रू मानत नाही. भारताकडे पाहण्याच्या तीन गोष्टी स्वीकारार्ह असाव्यात, हीच आमची अपेक्षा असते आणि त्यातील पहिली म्हणजे पूर्वज, दुसरी मातृभूमी आणि तिसरी संस्कृती. बाकी आपण कुठला पंथ, मत, भाषा, विचारसरणी मानता ही आपली मर्जी आहे, हेच सरसंघचालकांच्या भाषणाचे मध्यवर्ती सूत्र होते.
संघ राजकारणात उतरणार नाही, पण राष्ट्रहिताच्या मुद्यावर आम्ही प्रखरतेने आमची मते मांडू. उदाहरणार्थ घुसखोरीचा प्रश्‍न. आमिष, प्रलोभने दाखवून, फसवून, कपट करून केलेले धर्मांतर याला आमचा सख्त विरोध आहे. स्वत:च्या इच्छेने किंवा आपणहून कुणी धर्मपरिवर्तन करीत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. अशी अनेक उदाहरणे नागपुरात आहेत. मात्र, आमचे त्यांच्याशी सदैव चांगले संबंध राहिले आहेत. पण, कपटाने, आमिष दाखवून केलेले धर्मांतर आम्हाला मान्य होणार नाही, असेही सरसंघचालकांनी स्पष्टपणे नमूद केले. रामजन्मभूमीवर मंदिर बनले पाहिजे आणि विधिसंमत मार्गाने जितक्या लवकर त्याची उभारणी होईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्व ही सनातन मूल्यबोधांवर आधारित सातत्याने चालणारी निरंतर प्रक्रिया आहे, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. चिरंतन व शाश्‍वत मूल्ये काळ किंवा परिस्थितीनुसार मांडता येतात. संघ ही विचारांची बंद पेटी नाही. डॉ. हेडगेवार यांनी आम्हाला काळानुरूप व स्वयंसेवकांची सहमती लक्षात घेऊन सर्वानुमते नवीन प्रयोग आणि विचार परिवर्तनाची परवानगी दिली आहे आणि हीच भारताची मूळ ओळख आहे, जी जगात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही.
रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांचे भाषण केवळ चर्चा अथवा वर्तमानपत्रांसाठी बातमीचा विषय होऊ शकत नाही. त्यांनी उच्चारलेल्या एकेक शब्दामागे मोठी तपश्‍चर्या, साधना असते. त्यामुळेच त्यांच्या वाणीचा, भाषणाचा प्रभावी परिणाम होतो. संघ राष्ट्रकार्यातील कोणत्याही उपलब्धीचे श्रेय घेऊ इच्छित नाही. भारतात उदय पावलेले सर्व मत, पंथ, आस्था, परंपरांना डॉ. मोहनजी भागवत यांनी भारतीय धर्माची संज्ञा दिली, जी अतिशय गहन, महत्त्वपूर्ण आणि अद्भुत अशी गोष्ट आहे. मात्र, मीडियाचे या शब्दाकडे लक्ष गेले नाही. हा भारतीय धर्म म्हणजे नेमके काय? याचा अर्थ आहे, ‘त्या तमाम आस्था, श्रद्धा, परंपरा आणि विचार जे भारतात जन्मले, ज्यात शीख, बौद्ध, जैन, शैव-शाक्त, सनातनी यांचा समावेश आहे. या सगळ्यांचा मूल्य समुच्चय अर्थात सामूहिक संदेश एकच आहे आणि तो म्हणजे ‘सरबत दा भला’ अर्थात सर्वांचे कल्याण असो, सर्व जण सुखी असोत, जे गुरुनानक यांनी सांगितले, सर्व संत आणि महात्म्यांनी देखील याचाच उद्घोष केला आहे की, ईश्‍वर सर्वांचे भले करो, सर्वांचे कल्याण असो, सर्वांना आरोग्य प्राप्त होवो, सर्वांची प्रगती होऊ दे आणि सर्वांनाच ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त होवो. हे भारतीयांचे मूळ तत्त्व व शाश्‍वत मूल्य आहे. आम्ही असे कधीच म्हणत नाही की केवळ आमचेच भले व्हावे, अथवा जे आमच्या धर्म, आस्था, श्रद्धेला मानतात त्यांचेच कल्याण होवो, असे आम्ही कधीच म्हणत नाही. भारताच्या मूळ राष्ट्रीय स्वभावातच सर्वसहमती अर्थात सर्वानुमती आणि सर्वांचे कल्याण अंतर्निहित आहे, संघाचा यावर विश्‍वास आहे.
डॉ. मोहनजी भागवत यांचे दिल्लीतील त्रिदिवसीय व्याख्यान कोेणतीही आस्था, विचार, अथवा मत, पंथ असलेल्या भारतीयाच्या विरोधात नाही. याविषयी सरसंघचालकांची भूमिका सुस्पष्ट आहे. कारण जे संघाच्या विचारांशी सहमत नाहीत पण, आपापल्या दृष्टीने भारताच्या हितार्थ कार्य करीत आहेत, त्यांनाही डॉ. मोहनजी भागवत यांनी आपले म्हटले आहे.
अनेक जण असा विचार नक्कीच करीत असतील की निवडणुकीपूर्वी, वर्तमान परिस्थितीत अशी कोणती गरज निर्माण झाली की सरसंघचालकांना तीन दिवस संघाच्या अवधारणेविषयी समजावून सांगावे लागले. मात्र, ही एक स्वाभाविक आणि सामान्य गोष्ट आहे की समूहाचा हिंसाचार, हिंदुत्वावर कलुषित, नकारात्मक मानसिकतेने केलेले वारंवार आघात, हिंदुत्व आणि गोरक्षेच्या नावाखाली काही तत्त्वांकडून करण्यात येणारी गुंडगिरी आणि संघाला भारताच्या भविष्यासंदर्भात दृष्टीच नसल्याचा आरोप हे सर्व पाहता कठोर आणि कटुशंका आणि प्रश्‍नांचाही संघाने स्वीकार करावा आणि त्यांचे समाधानकारक निराकरण करावे ही गोष्ट अतिशय आवश्यक होऊन बसली होती. डॉ. मोहनजी भागवत यांचे त्रिदिवसीय उद्बोधन म्हणजे हिंदूंसाठीही आपला मार्ग सुधारण्यासाठी एक कठोर संदेश होता. ज्यात त्यांनी जातिभेदामुळे होणार्‍या चुकीच्या गोष्टींवर टीकेचे प्रहार केले. महिलांना देवी बनवून मंदिरात बसविण्याच्या आणि घरात तिच्याशी दासीप्रमाणे व्यवहार करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी प्रखर टीका केली. राष्ट्रहिताविषयी कुठल्याही मुद्यावर तसुभरही तडजोड करण्यास नकार दिला, मग तो राम जन्मभूमीवर मंदिर निर्माणाचा मुद्दा असो अथवा कलम ३७० संपुष्टात आणणे असो, अथवा समान नागरी कायदा असो. सरसंघचालकांची ही व्याख्याने म्हणजे संघाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. तसेच भारताच्या सामाजिक जीवनात देखील ही घटना म्हणजे मैलाचा दगड ठरेल, यात काहीच शंका नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प. पू. श्रीगुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’ अथवा ‘वुई अ‍ॅण्ड अवर नेशनहूड’ या पुस्तकांविषयी चर्चा असो अथवा अल्पसंख्यक, बहुसंख्यकांचे प्रश्‍न अथवा शिक्षण आणि आर्थिक धोरणाविषयीचे प्रश्‍न असोत, या सर्वच प्रश्‍नांना अतिशय संतुलित व अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन नवीन भारत निर्माणाचे एक महान, विराट आणि सर्वसमावेशक चित्र प्रस्तुत करण्यात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत संपूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. अपण त्यांच्या भाषणातील काही विचारसूत्रांवर दृष्टिक्षेप टाकूया…
१) अन्य मत, पंथांविषयी समन्वय, संतुलन अथवा ताळमेळ साधणारी एकमात्र विचारसरणी भारतीयता अथवा हिंदुत्व आहे.
२) आदिवासी, वनवासी समाज देखील हिंदूच आहे. समान मूल्यबोध घेऊन मार्गक्रमण करणार्‍या विराट विचारधारेचे प्रतीक वनवासी आमचे पूर्वज आहेत याच भावनेने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.
३) आंतरजातीय विवाह आणि जातिभेद सोडून ‘रोटी-बेटी संबंधां’ना संघाने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे आणि १९४२ मध्ये महाराष्ट्रात जेव्हा पहिला आंतरजातीय विवाह झाला तेव्हा नवदाम्पत्याला शुभसंदेश व आशीर्वाद देणार्‍यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच प. पू. श्रीगुरुजींचाही समावेश होता. नवदाम्पत्याचे
अभिनंदन करताना प. पू. गुरुजी आपल्या संदेशात म्हणतात, ‘ केवळ शारीरिक आकर्षणापोटी आपण विवाह केलेला नाही तर आपण समाज म्हणून एकच आहोत, असेच या माध्यमातून आपल्याला सांगायचे आहे.’
४) जीवनातील प्रत्येक कृतीत, व्यवहारात समाजाकडे अभेद (भेदरहित, अद्वैत) दृष्टीने पाहणे हीच आमची भावना, श्रद्धा आहे.
५) संघ आधी कृती करतो आणि नंतर त्या विषयासंदर्भात बोलतो.
भटक्या आणि विमुक्त समाजाला स्वावलंबी आणि श्रेष्ठ बनविण्यासाठी देशात कदाचित सर्वप्रथम संघानेच प्रथम कार्य उभे केले. आज जातिव्यवस्था संपुष्टात येत आहे, नव्हे ती संपायलाच हवी. मात्र, याविषयीच वारंवार बोलण्याऐवजी भविष्यात काय व्हायला हवे यावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य आहे. अंधारात केवळ काठी फिरवून काहीही साध्य होणार नाही.
एक दीप प्रज्वलित करा, अंधार आपोआपच दूर होईल.
६) काश्मिरातही आमचे अनेक कार्यकर्ते तेथील लोकांसाठी विकास आणि आर्थिक स्वावलंबनासाठी काम करीत आहेत. हे काम फार वर्षांपासून सुरू आहे आणि त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. अशीच अनेक कामे व्हायला हवीत.
७) नवीन शिक्षण धोरणात आपल्या देशाच्या विचारधारेचे, प्राचीन इतिहासाचे, श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब उमटलेच पाहिजे. पंथ अथवा संप्रदायAरिलिजनविषयी भलेही शिक्षण देऊ नका. मात्र, श्रेष्ठ व चिरंतन मूल्यांविषयी अभ्यासक्रमातून माहिती दिलीच पाहिजे. जे विचार बाहेरून आलेले असतील त्यातून देखील श्रेष्ठ मूल्ये घेऊन ती शिकवली पाहिजेत.
८) शिक्षणाची पातळी कधीही खालावत नाही, तर शिक्षण घेणार्‍याची आणि देणार्‍याची पातळी खालावते. यादृष्टीने विचार करायला पाहिजे.
९) धर्माच्या नावाखाली कितीतरी अधर्माचरण करण्यात आले. त्यामुळेच समाजात तीव्र असंतोष खदखदत आहे. प. पू. डॉ. हेडगेवार यांनी तत्त्व आणि व्यवहाराची गोष्ट केली होती. तत्त्वे महान असतील मात्र, त्याला अनुसरून जर आचरण होत नसेल तर कसे होईल?
१०) कपट, कारस्थान व विश्‍वासघाताने केलेल्या धर्मांतराला आमचा सख्त विरोध आहे. परमेश्‍वराला बाजारात विकता येत नाही. अध्यात्माचा बाजार होऊ शकत नाही.
११) कुणाविषयी देखील वाईट चिंतणे आमचा हेतू नाही. सर्वेषांअविरोधेन हाच संघाचा व्यवहार आहे.
१२) आमचा कुणी शत्रू नाही. ना जगात ना देशात. जर कुणी विरोधकही असतील तरी त्यांना संपविण्याची आमची आकांक्षा नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यावर आमचा विश्‍वास आहे.
१३) पुष्कळ धनसंपत्ती अर्जित करा आणि तेवढीच ती (दान म्हणून) वाटूनही टाका, असे
आमच्याकडे सांगण्यात आले आहे. यशस्वी जीवन हवेच पण ते अर्थपूर्णही असले पाहिजे, यावर आमचा भर असला पाहिजे.
१४) संघ मनमर्जीचे काम आहे. येणे-जाणे नि:शुल्क आहे. आपली मैत्रीही फार आहे.
१५) संघ केवळ व्यक्तिनिर्माणाचे कार्य करतो. मात्र, स्वयंसेवक समाजनिर्मितीसाठी जे काही योग्य आहे ते करतात. कुठल्या कार्याशी जुळायचे अथवा आपले नवीन, स्वतंत्र, स्वावलंबी कार्य सुरू करायचे हे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे.
१६) कुठेही जर चांगले कार्य होत असेल तर ते कोणाचे आहे? कोण उभारत आहे? आमचा सर्मथक आहे की विरोधक आहे याकडे मुळीच लक्ष देऊ नका. चांगल्या कामासाठी सहकार्य करा.
१७) कुणाविषयी भीती नाही व कुणाविषयी अधिक मैत्री नाही, हाच संघाचा स्वभाव आहे.
१८) महिलांना आम्ही शक्तिस्वरूपा, जगदंबा म्हणतो. मात्र, व्यवहारात पाहिले असता त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. देवी बनवून मंदिरात बसवून पूजण्याची आवश्यकता नाही. मात्र, तिला दासीप्रमाणे वागवू नका. महिलांना बरोबरीचा अधिकार आहे. तेवढीच तिची जबाबदारीही आहे. आम्ही ‘या बिचार्‍या’ महिलांचा उद्धार करीत आहोत, असा दृष्टिकोन त्यांच्याविषयी बाळगू नका. कित्येक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ कार्य करीत आहेत. त्यांच्यापेक्षा सशक्त आणि बुद्धिमान असतात. महिला आणि पुरुष परस्पर पूरक आहेत, बरोबरीचे आहेत. निर्णयापासून जबाबदारीपर्यंत महिलांचे पुरुषांसमवेत बरोबरीने सहभागी होणे हे संघाचे सुविचारित मत आहे.
१९) हिंदुत्व हा परंपरेने आलेला, सर्वांना मान्य असलेला, सर्वसंमत विचार आहे. हिंदुत्व त्या मूल्य समूच्चयाचे नाव आहे, ज्यात विविधतेत एव्कता, समन्वय, त्याग, समर्पण, मातृभूमीविषयी निष्ठा, पूर्वजांविषयी आदरभाव आणि संस्कृतीविषयी एकात्मतेचा भाव अंतर्भूत आहे.
२०) जगातील विविधतेचा आदर करा, त्यांचा उत्सव करा, मात्र आपल्या वैशिष्ट्यांवर दृढ, अढळ राहा आणि सर्वांना सोबत घेऊन चला. या मूल्यांनाच हिंदुत्व म्हटले जाते.
२१) भारत एका विशिष्ट स्वभावाचे, संस्कृतीचे नाव आहे आणि हा आशय स्पष्ट करणारा शब्द आहे हिंदू.
२२) संविधान आजचा आचारधर्म आहे. भारत धर्म आहे आणि अनेक जणांनी भरपूर विचार आणि चर्चा केल्यानंतर संविधानाची निर्मिती केली, ज्यावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे.
२३) आम्ही एकटेच अथवा भारत एकटाच सर्वांचा उद्धार करेल हा अहंकार बाळगण्याचे कारण नाही. कुणीही अहंकार बाळगू नये.
२४) आमचे पूर्वज एकच आहेत, आमची एकात्म व एकरस संस्कृती आहे आणि आमची मातृभूमी एक आहे, हे आमच्या बंधुभावाचे आधार आहेत.
२५) आम्हाला भविष्यातील भारत असा हवा की जो सामर्थ्य संपन्न, ज्ञान संपन्न, शील संपन्न असेल. तसेच आर्थिक आणि सामरिक शक्तीने संपन्न असावा. एक असा समतायुक्त, शोषणमुक्त, विश्‍वासाठी मनात सद्भावना ठेवून मार्गक्रमण करणारा, कुणाचेही नुकसान न करता सर्वांना कल्याणकारक मार्गाने घेऊन जाणारा, त्रस्त मानवतेला नवीन संजीवनी प्रदान करणारा भविष्यातील भारत आम्हाला हवा आहे. रवींद्रनाथ यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ‘ऐसा भारत जहाँ-चित्त जेथे भयशून्य…!
(लेखक हे माजी राज्यसभा सदस्य आणि पाञ्चजन्यचे माजी संपादक आहेत)

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, तरुण विजय, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, तरुण विजय, पुरवणी, स्तंभलेखक (380 of 1224 articles)

Rafale Rahul
सारांश : ल.त्र्यं. जोशी | राहुल व त्यांच्या टीमचा अभ्यासाच्या अभावाचा प्रश्‍न केवळ राफेलपुरताच मर्यादित नाही. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी ...

×