ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे, स्तंभलेखक » हुकूमशहा जिनपिंग: भारतापुढील आव्हान

हुकूमशहा जिनपिंग: भारतापुढील आव्हान

॥ विशेष : सतीश भा. मराठे |

चिनी साम्यवादी पक्षात होऊ घातलेल्या घटनादुरुस्तीमुळे विद्यमान अध्यक्ष शि जिनपिंग हे हयात असेपर्यंत चीनचे अध्यक्ष राहतील. चिनी कम्युनिस्ट पक्षात आता त्यांना कोणी आव्हान देऊ शकणार नाही. ही वस्तुस्थिती असतानाही मोदी विरोधाने पछाडलेले काही विचारवंत ही वास्तविकता मान्य करण्यास तयार नाहीत असे दिसते. भारतातील डाव्यांनी अशी प्रतिक्रिया दिली असती तर नवल नव्हते.

Chinese President Xi Jinping, Chinese Leader Mao Zedong

Chinese President Xi Jinping, Chinese Leader Mao Zedong

चीनमधून गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत त्याच्या परिणामस्वरूप भारतापुढे नवीन आव्हाने उभी राहणार आहेत हे स्पष्ट आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या घटनेत महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या घटनांकडे चीनची अंतर्गत बाब असे समजून दुर्लक्ष करता येणार नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेनुसार त्या पक्षाच्या अध्यक्षपदावर असलेला नेता हाच देशाचा सत्ताधारी प्रमुख असतो. असा नेता दोन खेपेस अध्यक्ष म्हणून त्या पदावर राहू शकतो. दहा वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर त्याला पायउतार व्हावे लागते. चिनी साम्यवादी पक्षात होऊ घातलेल्या घटनादुरुस्तीमुळे विद्यमान अध्यक्ष शि जिनपिंग हे हयात असेपर्यंत चीनचे अध्यक्ष राहतील. चिनी कम्युनिस्ट पक्षात आता त्यांना कोणी आव्हान देऊ शकणार नाही. ही वस्तुस्थिती असतानाही मोदी विरोधाने पछाडलेले काही विचारवंत ही वास्तविकता मान्य करण्यास तयार नाहीत असे दिसते. भारतातील डाव्यांनी अशी प्रतिक्रिया दिली असती तर नवल नव्हते. मात्र एकेकाळी पंतप्रधानांचे सल्लागार असलेले सुधीन्द्र कुलकर्णी यांच्याकडून शि जिनपिंग हे शहेनशहा होऊ शकत नाहीत असे मत मांडण्यात आले.
२ मार्च २०१८ च्या एका वृत्तपत्रात ‘व्हाय शि इज नो एम्परर’ या शीर्षकाखाली सुधीन्द्र कुलकर्णी यांचा लेख प्रकाशित झाला. चीन हे लोकशाहीवादी राष्ट्र नसल्याने तेथील व्यवस्थेतील ही मोठी कमतरता आहे, असे सुधीन्द्र कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. असे मत मांडत असताना लगेच ते असेही म्हणतात की, चीनने लोककेंद्रित व राष्ट्रकेंद्रित व्यवस्था विकसित केली आहे. ही दोन्ही विधाने परस्पर विरोधी वाटतात. मोदी सरकारने राष्ट्रकेंद्रित धोरण राबविल्यास त्याला संकुचित ठरविण्यात येते. असेच धोरण चीनने राबविल्यास त्याला पुरोगामी ठरविण्यात येते. आपल्या देशात असा बुद्धिभेद करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून होत आला आहे. सुधीन्द्र कुलकर्णी यांच्या मते लोककेंद्रित नीतीमुळेच चीन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकला. वास्तविक लोककेंद्रित नीती राबविल्यामुळे चीन बलशाली झाला नसून, हुकूमशाही व दंडेलशाहीमुळे चीनने जगापुढे आव्हान उभे केले आहे. भारतात असे होऊ शकत नाही. चीनच्या तुलनेत आपला विकासाचा वेग कमी आहे ही वास्तविकता आहे. लोकशाही मूल्ये राबवीत असताना एकमत घडवून आणण्यात नेतृत्वाचा कस लागतो व कालापव्ययही होतो. लोकशाहीसाठी अशी किंमत चुकविणे अपरिहार्य ठरते. काही बुद्धिवाद्यांना मात्र ही बाजू समजून घ्यायची नाही असे दिसते. अध्यक्ष शि जिनपिंग यांचे स्थान ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसनंतर बळकट झाले होते. आता होणार्‍या घटनाबदलानंतर ते निरंकुश सत्ताधीश होतील. ऑक्टोबर बैठकीआधी डोकलाम प्रकरण उकरून काढत पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याची खेळी शि जिनपिंग यांनी खेळली होती, हे विसरून चालणार नाही. सुधीन्द्र कुलकर्णी यांच्यासारखे विचारवंत मात्र याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करतात हीच खरी शोकांतिका आहे.
सदर लेखात सुधीन्द्र कुलकर्णी यांनी असे मतप्रदर्शन केले की, ‘भारताने चीनकडे पश्‍चिमी जगताच्या डागाळलेल्या चष्म्यातून बघू नये. या धोरणात्मक गंभीर बाबीकडे मात्र नीती निर्धारणकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे असे वाटते. लेखात सुधीन्द्र कुलकर्णी यांनी आणखी एक विसंगत विधान केले आहे. त्यांच्या मते १९६६-७६ या कालखंडातील माओ यांच्या सांस्कृतिक क्रांतीनंतर ते पक्षापेक्षा मोठे नेते झाले होते. ही चीनसाठी आपत्ती होती. यातून चिनी कम्युनिस्ट पक्षाने धडा घेतला असून, पुन्हा दुसरा हुकूमशहा निर्माण होऊ नये अशी व्यवस्था केली होती. ती मोडीत काढून सध्या चिनी कम्युनिस्ट पक्षात होणार्‍या बदलाने मात्र दुसरा हुकूमशहाच निर्माण होणार हे उघड आहे.
या परिस्थितीमुळे भारतावर होणार्‍या विपरीत परिणामांचा ऊहापोह करणे गरजेचे आहे असे वाटते. यासाठी इतिहासात डोकावणे आवश्यक आहे. हुकूमशहा माओ चीनमध्ये सत्तेवर असताना १९५० च्या दशकाच्या पूर्वार्धात त्यांना पाकिस्तानऐवजी भारत जवळचा वाटत होता. याला कारण म्हणजे भारताचा समाजवादाकडे असलेला कल. मात्र १९५५ सालची बुल्गानीन-क्रुश्‍चेव्ह यांची भारतभेट व चीनचा सोव्हिएट संघाबरोबर निर्माण झालेला सीमावाद यामुळे चीन भारताप्रती साशंक झाला. मार्च १९५९ च्या दलाई लामांच्या भारतप्रवेशाने चीनचा तिळपापड झाला. चीनचा या बाबतीतील क्षोभ आजपर्यंत ओसरला नाही. या घटनेनंतर माओने भारताला दंडित करण्याचा व धडा शिकविण्याचा विडा उचलला. या परिस्थितीत एप्रिल १९६० मध्ये चिनी पंतप्रधान चाऊ एन लाय यांनी भारताला भेट दिली. भारत-चीन सीमावाद कूटनैतिक वाटाघाटीने व देवाणघेवाणीने सोडविला जावा अशी भूमिका त्यांनी मांडली. पं. नेहरूंपुढे त्यांनी एक बार्टर प्रस्ताव ठेवला होता. हा चिनी डावपेचाचा व भारताला कोंडीत पकडण्याचा डाव होता. अखेर माओने जे ठरविले होते तेच १९६२ साली करून दाखविले. भारतासाठी आजची परिस्थिती त्या वेळपेक्षाही चिंताजनक आहे, असे म्हटल्यास चूक ठरू नये. १९६२ चा भारत आज राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. चीनही आर्थिक, सैनिकी व तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहे हेदेखील नाकारता येत नाही.
या पार्श्‍वभूमीवर १९५० च्या दशकात चीनचा पाकिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता हे बघणे उपयुक्त ठरेल. पाकिस्तान हा पहिला मुस्लिम देश होता ज्याने सगळ्यात आधी १९५० साली कम्युनिस्ट चीनला मान्यता दिली. १९५१ साली पाकिस्तानी राजदूताने माओ यांच्या समक्ष अधिकारपत्रे सादर केली. या समारंभात अन्य दोन देशांच्या राजदूतांचा समावेश होता. पाकिस्तानी राजदूताला शेवटच्या रांगेत बसविण्यात आले. माओंनी पाक राजदूताची दखलही घेतली नाही.
माओ सत्तेवर असताना चाऊ एन लाय हे मुरब्बी व कूटनैतिक धूर्तता असलेले पंतप्रधान चीनची धुरा सांभाळत होते. माओ व चाऊ एन लाय यांचा स्वभाव व कार्यशैली पूर्णत: भिन्न होती. आज शि जिन पिंग यांच्यासमोर पक्षांतर्गत स्पर्धेत चाऊ एन लाय यांच्यासारखे नेतृत्व अस्तित्वात नाही. यामुळे ते माओपेक्षाही अधिक सशक्त नेते म्हणून पुढे येत आहेत. भारतासाठी हे दुश्‍चिन्ह आहे. (याबाबत भारतातील डाव्यांचे काय मत आहे, अशी विचारणा माध्यमे का करीत नाहीत?) १९५० च्या दशकात चीन-पाकिस्तान दरम्यान सीमाविवाद होता. एकदा तर प्रकाशित चिनी नकाशांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. विवाद्य नकाशे चीनने परत न घेतल्यास पाकिस्तान बलप्रयोग करेल अशी धमकी अध्यक्ष अयुब खान यांनी दिली होती. आज हे कोणाला कदाचित खरेही वाटणार नाही अशी स्थिती आहे. २ मार्च १९६३ रोजी झालेल्या चीन-पाकिस्तानमधील सीमा कराराने हा वाद संपुष्टात आला. भारतासाठी मात्र याने कायमस्वरूपी डोकेदुखी निर्माण केली. या वेळी पाकिस्तान अमेरिकन नेतृत्वाखालील सैनिकीसंधीचा दोन ठिकाणी सदस्य होता. याचाच अर्थ स्वत:च्या स्वार्थासाठी चीनने त्यांच्या तथाकथित आदर्शवादाला मूठमाती दिली होती हे स्पष्ट आहे. आज चीन-पाकिस्तान कॉरिडॉरचे जे निर्माणकार्य होत आहे त्याची पायाभरणी या कराराद्वारे झाली. आज चीनने भारताला सर्व बाजूंनी घेरले आहे. माओ यांच्यापेक्षा शि जिन पिंग यांची स्थिती मजबूत आहे. त्यांची हुकूमशाहीकडे होणारी वाटचाल भारताच्या अस्तित्वाला आव्हान ठरू शकते. डोकलाम प्रकरणाने याचे संकेत दिले आहेत.
१९६२ साली चीनबाबत कसे धोरण राबवावे याविषयी आपण संभ्रमावस्थेत होतो. आजही चीनविषयक आपले ठोस व निश्‍चित धोरण आहे असे वाटत नाही. राजकीय इच्छाशक्ती, धोरणनिश्‍चिती व कूटनैतिक दूरदृष्टी असल्याशिवाय उदयास येणार्‍या चिनी हुकुमशाहीशी टक्कर देणे भारताला सोपे जाणार नाही हे नक्की!

Posted by : | on : 1 Apr 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे, स्तंभलेखक (1050 of 1367 articles)

Hutatma Shivram Rajguru
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | ‘आमच्या वेळेला’ हा कित्येकांचा परवलीचा शब्दप्रयोग असतो. दोन पिढ्यांतील फरक; किंबहुना नवीन पिढी ही ...

×