ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » ॥ याहुनी करावें विशेष ॥

॥ याहुनी करावें विशेष ॥

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

प्रगत होण्याच्या नादात आपल्यापैकी अनेकजण आयुष्यातूनच आऊटडेटेड होतायत, याकडे आपलं लक्ष कुठं आहे? आपला मुलगा रट्टू पोपट किंवा रट्टू मैना करण्याच्या मागे लागलेले पालकही काही कमी नाहीयत. त्यामुळे, स्वाभाविकच माणसं आऊटडेटेड होणं थांबणार नाहीच. केवळ पुस्तकी शिक्षण हे संधी मिळवणं, संधी निर्माण करणं किंवा मिळालेली संधी टिकवणं या तीनही गोष्टी चांगल्याप्रकारे शिकण्यासाठी पुरेसं आहे का? यापेक्षा आपल्या मुलांनी आयुष्यात एका तरी कौशल्यात तरबेज होणं कितीतरी अधिक महत्वाचं आहे. स्वतःमधली विलक्षण क्षमता मुलांनी शोधणं गरजेचं आहे. आजच काही ठरवलं नाही तर, उद्या आपला मुलगा किंवा मुलगी याच चक्रात अडकतील आणि आऊटडेटेड होतील, यात शंकाच नाही. या मुला-मुलींची आज जशी अवस्था झालेली आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार कोण असेल तर त्यांचे पालक. आता एक पालक म्हणून आपण हा कालबाह्य होण्याचा खेळ आपण कसा थांबवू शकू, याचा विचार आज, आत्ता, ताबडतोब करायला हवा.

उत्तरार्ध

Outdated Career

Outdated Career

माझ्या दृष्टीने बुद्धिमान कोण? याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो.
ज्याला अतिशय चांगले लेख आणि निबंध लिहिता येतात,
ज्याला अनेक भाषा अतिशय चांगल्या लिहिता, बोलता आणि वाचता येतात,
ज्याला अतिशय चांगलं भाषांतर करता येतं,
जो छान कविता करतो,
जो अतिशय उत्तम गोष्टी लिहितो,
जो अतिशय चांगली आणि हुबेहूब चित्रं काढतो,
जो सुंदर गातो,
जो एखादं वाद्य अतिशय सुंदर वाजवतो,
जो एखादा खेळ अतिशय चांगला खेळतो,
ज्याला अनेक पाककृती अतिशय उत्कृष्ट करता येतात,
ज्याला बंद पडलेली किंवा बिघडलेली यंत्रे आणि वाहने उत्तमप्रकारे दुरुस्त करता येतात,
ज्याला नाजूक आणि कलाकुसरीची कामे अत्यंत चांगली जमतात,
ज्याचं गणित अचूक आहे,
ज्याला हिशोब करणं अत्यंत अचूक जमतं,
ज्याला प्राणी-पक्ष्यांची भाषा कळते,
ज्याला रुग्ण व्यक्तींची काळजी अतिशय चांगल्या पद्धतीने घेता येते,
ज्याला एखादा विषय लहान मुलांना अतिशय चांगला शिकवता येतो,
ज्याला एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन चांगलं करता येतं,
ज्याला रंगसंगती उत्तम साधते,
ज्याला अतिशय चांगले फोटो काढता येतात,
ज्याला अतिशय चांगले आणि अचूक कपडे शिवता येतात,
अशी प्रत्येक व्यक्ती माझ्या दृष्टीने हुशार आणि बुद्धिमान आहेच. कारण, चांगली बुद्धिमत्ता असल्याशिवाय यातलं कुठलंच काम जमणार नाही. आता अनेकजण असं म्हणतील की, असं कसं म्हणता येईल? पण एक गोष्ट लक्षात घ्या की, कोणतंही काम प्रत्येकाला उत्तमप्रकारे जमेलच असं नाही. मुळातच या यादीतली अशी अनेक कामे आहेत, जी आपल्याला अगदी कामचलाऊ पातळीवरसुद्धा जमणार नाहीत.
एखादी गोष्ट एखाद्याला इतरांपेक्षा अधिक उत्तम आणि उत्कृष्ट दर्जाची जमते, याचा अर्थच असा होतो की, या विशिष्ट बाबतीत त्याची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा अधिक वेगाने आणि अचूक चालते. आता खरा घोटाळा इथेच होतो, जो साधारणपणे आपल्या सगळ्यांकडूनच होतो. तो म्हणजे, अभ्यास वगळता अन्य गोष्टी बुद्धीच्या आधाराशिवाय जमूच शकत नाहीत, ही गोष्टच आपण कुणी मान्य करत नाही. पण, प्रत्येक लहान-मोठी कृती करण्यासाठी आपल्याला आपली बुद्धिमत्ता वापरावीच लागते, ही गोष्ट विज्ञानाने वारंवार सिद्ध केलेली आहे.
त्यामुळे, उत्कृष्ट चित्र काढणं आणि उत्कृष्ट गणित करणं या दोन्हीसाठी बुद्धिमत्ता तर लागतेच. पण, विशिष्ट क्षमताही लागते, शिक्षण लागतं आणि सरावही लागतो. सरावानं आपली कौशल्ये अधिक उत्तम होतात. आत्मविश्‍वास वाढतो. या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर प्रत्येक कामामधील उत्कृष्टता वाढणारच. म्हणूनच, कोणत्याही ठराविकच क्षेत्रांमध्ये स्कोप कसा चांगला आहे, याची चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्यातल्या उत्तम क्षमतांचा शोध घेतल्यास त्याचा फायदा हजारो पटींनी अधिक होतो.
याचं कारण अगदी सरळ आहे. स्कोप तर प्रत्येक क्षेत्रात आहेच. हुशार आणि उत्कृष्ट कौशल्य असणार्‍या व्यक्तींची गरज प्रत्येक क्षेत्रात आहेच. ज्या क्षेत्राला अजिबात मागणी नाही, असं कुठलंच क्षेत्र नाही. मागणी सगळीकडे आहेच. फक्त आपल्याला ती मागणी शोधता येत नाही, म्हणूनच आपले करिअरबद्दलचे निर्णय चुकतात. हा सर्व करिअरचा प्रवास पाहता, तो एकूणच सहज-सोपा नाहीय हे लगेचच लक्षात येईल. ज्याचे करिअरच्या प्रवासातले निर्णय प्रत्येक टप्प्यावरयोग्य आणि अचूक ठरतात, तोच यशस्वी होतो, हे तर त्यातलं गमक आहे. म्हणूनच, या संपूर्ण प्रक्रियेकडे केवळ शिक्षणाच्या दृष्टीकोनातून किंवा केवळ कौशल्याच्या दृष्टीकोनातून पाहता येत नाही. किंबहुना, तसे पाहणे कधीही हिताचे ठरत नाही.
करिअर करताना जोखीम तर पत्करावी लागणारच –
हा आणखी एक विशेष महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला खरोखरच उत्तम करिअर करायचं आहे का? मग पुढील गोष्टींचा तुमचा अभ्यास अतिशय दांडगा असायलाच हवा. –
आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती,
आपल्या समाजाच्या समस्या आणि अडचणी,
अर्थशास्त्राचा वापर करता येणं आणि
जगात पुढच्या २० वर्षांमध्ये नेमके कोणते बदल होतील याचा अंदाज बांधता येणं
याच गोष्टींवर तुमचं करिअर दीर्घकाळ टिकणार, हे पक्कं लक्षात ठेवा. समाजाच्या गरजा काय आहेत, हे तुम्हाला अगदी चांगलं माहित असायला हवं. आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्यातल्या यशाच्या संधी आपण जशा पाहतो, तशाच जोखमीच्या गोष्टींचीही पडताळणी केलीच पाहिजे. बाजारात मिळणार्‍या अनेक गोष्टींवर ‘नो वॉरंटी नो गॅरंटी असं छापलेलं असतं. आकर्षक जाहिरातींना भुलून किंवा स्वस्त किंमतीचा विचार करून लोक अशा वस्तू खरेदी करतात. ती वस्तू अपेक्षेपेक्षा लवकर खराब झाली किंवा नादुरुस्त झाली तर, त्याची किंमत थेट शून्य होते. बाजारातून पूर्ण पैसे देऊन खरेदी केलेला नारळ घरी येऊन फोडल्यानंतर जर तो नासका निघाला तर त्याचा अन्नाच्या दृष्टीने काहीही उपयोग राहत नाही, तसंच करिअर च्या बाबतीतही होण्याची शक्यता असते. याच्या उलट कदाचित किंमत थोडीशी जास्त देऊन परंतु उत्तम दर्जाची खात्री करून खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला दीर्घकालीन उपयोगी पडतात. अधिक पैसे मोजण्याची जोखीम जरी पत्करली तरी त्याचा फायदा मात्र दीर्घकाळ होतो, हे चतुर आणि व्यवहारी व्यक्तींच्या पुरेपूर लक्षात आलेलं असतं.
करिअर म्हणजे काही नारळ नव्हे. नारळ खराब निघाला तर पुन्हा नवा आणता येतो आणि त्यावाचून फारसं काही अडत नाही. त्याची किंमतही फारशी नसते आणि नवा नारळही सहज उपलब्ध होतो. प्रत्येक वेळेस नवा नारळ खरेदी केला तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या किंवा वेळेच्या दृष्टीने विशेष फरक पडत नाही. पण, करिअरचं किंवा त्यासाठी घेतलेल्या शिक्षणाचं तसं नसतं. ते शिक्षण आपल्याला दीर्घकाळासाठी वापरायचं असतं. म्हणूनच तर, आपण त्यासाठी दहावीनंतरची किमान ७-८ वर्षं एखाद्या विशिष्ट क्षेत्राचं शिक्षण घेत राहतो. जर आपण घेत असलेलं शिक्षण ६-७ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी उपयोगी पडणार नसेल तर आपण त्याकरिता इतकी वर्षं खर्च करू का? नक्कीच नाही. किंवा आपण सध्या घेत असलेलं शिक्षण काही काळानंतर पूर्णतः निरुपयोगी होणार आहे, हे समजल्यानंतरही आपण तेच शिक्षण पुढे सुरु ठेवू का? खरी जोखीम इथेच आहे आणि ते जोखमीचं गणित नीट समजून घेतलं पाहिजे. जर हे गणित चुकलं तर सुधारण्याची संधी पुन्हा मिळेलच याचा काहीही भरवसा देता येत नाही. म्हणून, निर्णय घेण्याआधी व्यवस्थित विचार करणं गरजेचं असतं.
आपल्या गावातल्या चौकांचीही नावं धड माहिती नसणारा मुलगा ‘मी आयएएस होणार’ असं सांगताना मी पाहतो, तेव्हा मला फार हसू येतं. तो जेव्हा असं काही बोलत असतो, तेव्हा त्याचे पालक तर आनंद आणि अभिमानानं भारून गेलेले असतात. पण, तो भ्रमाचा भोपळा लवकरच फुटतो. मी असे कितीतरी बुद्धिमान भोपळे फुटताना पाहिलेले आहेत, आणि आज त्यांचे पालक काळजी आणि निराशेनं हवालदिल झाले आहेत.
आपण नक्की कोणत्या आधारावर आपलं करिअर ठरवतो? बहुतेक वेळा त्याचा प्रमुख आधार असतो – पैसा आणि श्रीमंती. एखादा पदवीधर किंवा त्याहीपेक्षा अधिक शिकलेला मुलगा / मुलगी नोकरीच्या शोधात वणवण फिरत असतात आणि खूप प्रयत्न करूनही त्यांना काम मिळत नाही, मला त्यांचं खूप वाईट वाटतं. इतकं शिकूनही काम का मिळत नाही? असा प्रश्‍नही त्यांना पडत नाही. परिस्थितीचा रेटा प्रचंड असतो, त्यापुढे शरणागती पत्करून अनेकजण शेवटी मिळेल ते काम स्वीकारत आयुष्याचं ओझं घेऊन जगत राहतात. आपल्या देशात अशाच पदवीधर बेरोजगारांची संख्या अधिक आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतेच आहे.
आपण कॉलेजात नेमकं काय शिकलो आणि आपण जे शिकलो त्यात आपली प्रगती किती झाली, या प्रश्‍नाचं उत्तर १०० पैकी ९० मुला-मुलींकडे नसतंच. आपण अमुक कोर्स का निवडला, याचंही उत्तर अनेकांकडे नसतं. आपण पदवी तर मिळवली पण ज्ञान मात्र मिळवलंच नाही आणि त्यामुळेच आपल्याला काम मिळत नाहीय, हे लक्षात यायला फार वेळ लागतो. म्हणूनच, बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय, गरिबी वाढतेय, बेकायदेशीर वस्त्या वाढतायत, गुन्हेगारी वेगाने वाढत चालली आहे आणि यामध्ये युवावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.
आपण घेत असलेल्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा उपयोग पुढच्या काळात स्वतंत्रपणे आणि योग्यप्रकारे करता येणं, ही जशी प्रगतीची संधी आहे, तशीच ती मोठी जोखीमही आहे. शिक्षण तर घेतलं आहे पण त्याचा उपयोगच करता येत नाहीय, अशी स्थिती असेल किंवा उपयोग कसा-कुठे करायचा हे स्पष्ट दिसतंय, पण घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा किंवा त्यातली गती अगदीच सुमार दर्जाची असेल, तर उपयोग काय? कठीण किंवा आव्हानात्मक परिस्थितीत आपण आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोगच करू शकणार नाही. नेमक्या ह्याच समस्येमुळे आज तरुणांना नोकर्‍या किंवा कामाच्या संधी उपलब्ध होत नाहीयत, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
तुम्हांला एक यशाची सत्यकथा सांगतो.कॉलेजात एकत्र शिकलेल्या ८ मित्रांनी एक कंपनी सुरु केली. भांडवल कुणाकडेच नव्हते. या ८ जणांनी आपल्या आयुष्यातील ५०० दिवस नोकरी करण्याचे ठरवले आणि या कामातून भांडवल जमा करण्याचे ठरवले. ५०० दिवसांनंतर या ८ जणांकडे केवळ २ लाख रुपये जमा झालेले होते. उपलब्ध पैशात जागा, भांडवल, लोकांचे पगार, मार्केटिंग या गोष्टी करणे महाकठीण होते. योगायोगाने एक संधी चालून आली. एका कंपनीचे बंद पडलेले कॅन्टीन होते. त्या कंपनीला ते पुन्हा सुरु करायचे होते. जागा होती, फर्निचर होते, किचन होते. या ८ जणांनी ही संधी घेण्याचे ठरवले. पण एकालाही या कामाचा अनुभव नव्हता. काम तरी कसे करणार? रिस्क होती. व्यवहारज्ञान, जनसंपर्क, जगात डोळे-कान उघडे ठेवून वागणं, मित्र जोडण्याची कला या गोष्टी आयुष्यात क्षणोक्षणी उपयोगाला येतात. केवळ पुस्तकी अभ्यास कसा कामी येणार? प्रत्यक्षात काम करण्याचे महत्व मोठे आहे, ते नाकारून चालत नाही. पुढच्या ८ दिवसात या सगळ्यांनी रेल्वे स्टेशन्स, बस स्टॅन्ड अशी सार्वजनिक ठिकाणे पालथी घातली. गरीब आणि गरजू कामगार शोधले, हाताला उत्तम चव असलेले-पण आर्थिकदृष्ट्या गरीब असे २ आचारी शोधले. शहरातले बचतगट शोधले आणि त्यातील एका बचतगटाला पोळीभाजी, पराठे आदी पदार्थ ऑर्डरनुसार बनवण्याचे काम दिले. प्राथमिक तयारी तर पूर्ण झाली होती. माणसांची योग्य पारख करता आली आणि निवडलेल्या माणसांवर पूर्ण विश्‍वास टाकता आला तर मनुष्यबळ अतिशय उत्तम दर्जाचे मिळते. या दोन्ही गुणांचा या ८ जणांना फार मोठा फायदा झाला. एक वर्षात हे प्रोजेक्ट अगदी व्यवस्थित सेटल झाले. पुढच्या एक वर्षात यांनी याच प्रोजेक्टमधून भांडवल जमा केले. आता एका वर्षात त्यांच्याकडील रक्कम होती १४ लाख रुपये. त्यांनी हाच बचतगट फॉर्म्युला पुन्हा वापरण्याचे ठरवले. पुन्हा नव्याने शोध सुरु केला आणि आणखी एक बचतगट शोधला. शहराच्या मध्यभागात एक जागा भाड्याने घेऊन एक फूड कॉर्नर सुरु केला. हाही प्रोजेक्ट यशस्वी झाला. आता याच कंपनीचे त्या शहरात २५ पेक्षाही जास्त फूड कॉर्नर्स आहेत आणि त्यांनी याच माध्यमातून २५ बचतगटांना काम दिले आहे. २०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. आणखी प्रगती सुरु आहेच. ९-१० वर्षे सातत्याने कष्ट केले, माणसे जोडली, उत्तम ध्येय डोळ्यासमोर ठेवले, टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले, व्यवहारात नेहमी उत्तम पारदर्शकता ठेवली, मतभेद टाळले. याचाच परिणाम म्हणून, हे यश मिळाले. यश कसे मिळवायचे याचं गमक नेमकं उमगलेलं असल्यामुळे ते मिळालेलं यश टिकवून कसं ठेवायचं, याचंही भान त्या आठ मित्रांना आलेलं आहे. जगात वावरताना आपले डोळे आणि कान उघडे ठेवून वावरल्याचा हा फायदा..
आपल्या समाजातलं शिक्षणाचं महत्व वाढताना मी पाहतो, मला त्याचं अप्रूप वाटतं. समाजाला हे प्रगतीचं किंवा जागरूकतेचं लक्षण वाटतही असेल. पण, त्याची दुसरी बाजू आपण कधीतरी लक्षात घेणार आहोत की नाही? वयाच्या पंचविशीपर्यंत शिकायचं, नोकरीला लागायचं, दोन-तीन वर्षांनी लग्न करायचं, आयुष्य जरा कुठे स्थिरावतंय असं वाटेपर्यंत पुढे संकट उभं ठाकलेलं असतं. आऊटडेटेड होण्याचं…
हे नेमकं काय प्रकरण आहे, हे आज दहावी-बारावी किंवा पदवीच्या वर्षांमध्ये शिकणार्‍या मुला-मुलींच्या गावीही नसेल. आणि अर्थातच, त्यांच्या पालकांच्याही माहितीत असं काही समाजात घडतंय याची योग्य ती जाणीव असावी, असंही मला जाणवत नाहीय.आम्ही शिकताना किंवा कोर्सेस निवडताना भविष्यकाळाचा विचारच केला नाही. आम्हांला कुणी तसा विचार करायला शिकवलंच नाही. असं अनेक तरुण मुलं-मुली म्हणतायत. वर्गांच्या चार भिंतींमध्ये, पाठ्यपुस्तकात छापलेलं, शिक्षक शिक्षक शिकवतील ते शिकायचं, अशा बंदिस्त पद्धतीत शिकलेली ही मुलं आता मात्र प्रत्यक्ष जगताना स्वतःच्या जगण्याची माती करून बसली आहेत. या मुलांमध्ये कदाचित एखादी विलक्षण क्षमता असेलही, पण ती कुणालाच जाणवली नाही आणि स्वतः त्या मुलालाही याची जाणीव झाली नाही. त्यामुळे, साधारणपणे बालवाडी ते पदव्युत्तर पदवी पर्यंत जवळपास १९ वर्षं शिकूनही केवळ साक्षरताच पदरात पडली आणि जगण्याच्या प्रश्‍नातून सुटका झालीच नाही ! जगायचं कसं, हे कुठं शिकवलंच नाही कुणी. तेलही गेलं, तूपही गेलं आणि धुपाटणंही गेलं.
या मुलांच्या १९ वर्षांच्या शैक्षणिक काळात शिक्षकांची भूमिका किती मोलाची होती, यावर आपण विचार केला पाहिजे. एखादं आयुष्य घडवण्याची सुवर्णसंधी या मुलांच्या शिक्षकांनी किती सहजगत्या गमावली आहे, याची त्या शिक्षकांना तरी जाणीव असेल का? नसेलच. नाहीतर त्या जाणीवेनं शहाणपण येऊन पुस्तकी पोपट तयार करण्याचे कारखाने शिक्षकांनी चालूच दिले नसते. हे कारखाने आजही, आत्ताही सुरूच आहेत. उत्तम शिक्षक तयार होणं, ते टिकणं आणि त्यांची संख्या वाढणं याकडेही कुणीच लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे या कारखान्यांमध्ये आणखी भर पडत राहिली. जर स्वतः शिक्षकच ‘घोका आणि ओका’ या पठडीतून तयार झालेले असतील, मग विद्यार्थ्यांची सध्याची स्थिती कशी बदलणार?
प्रगत होण्याच्या नादात आपल्यापैकी अनेकजण आयुष्यातूनच आऊटडेटेड होतायत, याकडे आपलं लक्ष कुठं आहे? आपला मुलगा रट्टू पोपट किंवा रट्टू मैना करण्याच्या मागे लागलेले पालकही काही कमी नाहीयत. त्यामुळे, स्वाभाविकच माणसं आऊटडेटेड होणं थांबणार नाहीच. केवळ पुस्तकी शिक्षण हे संधी मिळवणं, संधी निर्माण करणं किंवा मिळालेली संधी टिकवणं या तीनही गोष्टी चांगल्याप्रकारे शिकण्यासाठी पुरेसं आहे का?
यापेक्षा आपल्या मुलांनी आयुष्यात एका तरी कौशल्यात तरबेज होणं कितीतरी अधिक महत्वाचं आहे. स्वतःमधली विलक्षण क्षमता मुलांनी शोधणं गरजेचं आहे. आजच काही ठरवलं नाही तर, उद्या आपला मुलगा किंवा मुलगी याच चक्रात अडकतील आणि आऊटडेटेड होतील, यात शंकाच नाही. या मुला-मुलींची आज जशी अवस्था झालेली आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार कोण असेल तर त्यांचे पालक. आता एक पालक म्हणून आपण हा कालबाह्य होण्याचा खेळ आपण कसा थांबवू शकू, याचा विचार आज, आत्ता, ताबडतोब करायला हवा. नाहीतर झोप उडेल ती पुन्हा न लागण्यासाठीच…
मानसतज्ञ – करिअर काऊन्सेलर, संचालक – प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. •••

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (35 of 729 articles)

Kerala Flood 2
विशेष : विश्‍वराज विश्‍वा, कोची | हजारो लोक मरत होते, जीव वाचविण्यासाठी लष्कर आणि नौदलाची मदत मागत होते. कुणाचा विश्‍वास ...

×