ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » ॥ याहुनी करावें विशेष ॥

॥ याहुनी करावें विशेष ॥

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

आयुष्यात वरवर सोपा वाटणारा एक निर्णय पुढच्या आयुष्यात किती महत्वाचा ठरतो, हे शालेय वयात फारसं स्पष्ट दिसत नसतं. म्हणूनच, त्या टप्प्यावर निर्णय चुकण्याचा संभव अधिक असतो. निर्णय झाल्यानंतर तो यशस्वी होण्यासाठी योग्य ते शिक्षणही घेणं तितकंच महत्वाचं आहे. शिक्षणानं माणूस सक्षम झाला की, तो कठीण आव्हानं पेलू शकतो. क्षमता आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या तरीसुद्धा एकमेकांशिवाय दोन्ही अपूर्णच आहेत. असाच प्रकार माहिती आणि ज्ञान या दोन्ही बाबतीत आहे. माहिती मिळवणं आणि ज्ञान मिळवणं या दोन गोष्टींमध्ये आपण खूपवेळा फरकच करत नाही.

School Drawing

School Drawing

पुर्वार्ध
पुण्याजवळच्या एका खेडेगावात मी एका कामाच्या निमित्ताने गेलो होतो. गावातल्या प्रमुख मंडळींना भेटण्याची जागा म्हणजे गावातलं देऊळ. मी त्या मंडळींना देवळात भेटलो, चर्चाही चांगली झाली. देवळाच्या शेजारीच गावातली शाळा होती. आजूबाजूच्या गावातली मुलं तिथं शिकायला यायची. आम्ही त्या शाळेत गेलो. मराठी माध्यमाची शाळा. एक छोटी दगडी, बसकी इमारत. कौलारू छप्पर असलेली. आजूबाजूला चांगली मोठी झाडं होती. गर्द सावली होती. छोटं मैदान होतं. शाळा तर छान होती.
गावातल्या मंडळींनी दहावीच्या वर्गाचा विषय काढला. मुलांना इंग्रजी विषयाची भीती आहे आणि मुलं त्याच विषयात नापास होतात, असं समजलं. मी मुलांशी थोडंसं बोललो आणि परत पुण्यात आलो. सकाळी ज्ञानू ला फोन केला आणि भेटायला बोलावलं. ज्ञानू हा माझा एक खूप जवळचा आणि लाडका विद्यार्थी आहे. त्याचं खरं नाव आहे पांडुरंग. मी त्याला ज्ञानू का म्हणायला लागलो, हे माझं मलाही ठाऊक नाही. ज्ञानू दहावी झाला आणि पुढचा मार्ग सापडेना, म्हणून काऊन्सेलिंग साठी माझ्याकडे आला होता. या मुलाला मुळातच नवनव्या गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याचीही आवड होती. वाचनाची आवड होती. ज्ञानू तर भेळेचा कागदही वाचल्याशिवाय सोडत नाही. इंग्रजीची आवड आधी नव्हती, पण नंतर त्याने ती विकसित केली आहे. ज्ञानू आता विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवतो. घरीच शिकवतो. सगळे त्याला ‘सर’ म्हणतात. कुठलाही मुलगा त्याच्याकडे आणा, तो उत्तम इंग्रजी शिकलाच म्हणून समजा, अशी त्याची आता प्रसिद्धी आहे. असा हा आमचा ज्ञानू..
ज्ञानू आला. मी त्याला माझी कल्पना सांगितली. ज्ञानू एकदम खूष झाला. या घटनेला आता दोन वर्षं झाली आहेत. आता आजची त्या गावातली परिस्थिती पाहूया. प्रत्येक रविवारी गावातल्या शाळेत आजूबाजूच्या गावांमधून, वाड्या-वस्त्यांमधून मुलं-मुली येतात. ज्ञानू त्यांना इंग्रजी शिकवतो. साधारणपणे ५० विद्यार्थ्यांची एक तुकडी, या नुसार एका दिवशी ज्ञानू ३ तुकड्यांना शिकवतो. एकटाच शिकवतो. रविवारी सगळे अगदी इंग्रजीमय झालेले असतात. एका मुलाची महिन्याची फी ४०० रुपये आहे. एका महिन्याला ज्ञानू ला या कामाचे ६० हजार रुपये मिळतात. पण, ज्ञानू अक्षरशः जीव तोडून शिकवतो. गावातली मुलं आता मस्त इंग्रजी बोलायला लागली आहेत. गावात इंग्रजी पेपर इतक्या वर्षांमध्ये प्रथमच येऊ लागला आहे. मुलं आता इंग्रजी पुस्तकं वाचायला लागली आहेत. इंग्रजीची भीतीच संपून गेली आहे. केवळ शाळेचा निकालच उत्तम लागतोय असं नाही तर, मुलांमध्येही विलक्षण बदल दिसून यायला लागलेत. गावात जणू काही इंग्रजीची क्रांतीच झाली आहे.
मला ७-८ वर्षांपूर्वीचा ज्ञानूच्या आईबाबांचा काळजीने ग्रासलेला चेहरा आजही आठवतो. ज्याला गणित आवडत नाही, विज्ञानात रस नाही, प्रयोगशाळा आवडत नाही, अशा मुलाचं पुढं जाऊन काय होणार? असा प्रश्‍न त्याचे बाबा मला पुनःपुन्हा विचारत होते. ज्ञानूनं भाषा विषयात करिअर करावं हा मी दिलेला सल्ला त्यांना मुळीच पटलेला नव्हता. पण, माझं मत मान्य करून ज्ञानू कला शाखेला गेला आणि संस्कृत शिकायला लागला. पण मध्येच कुठल्यातरी क्षणी इंग्रजी भाषेशी त्याचे सूर जुळले. त्याचं आयुष्यच पार बदलून गेलं. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी या चारही भाषा शिकवणारी एक संस्था त्यानं सुरु केली आहे. त्याचं उत्तम चाललं आहे.
आयुष्यात वरवर सोपा वाटणारा एक निर्णय पुढच्या आयुष्यात किती महत्वाचा ठरतो, हे आपल्याला शालेय वयात फारसं स्पष्ट दिसत नसतं. म्हणूनच, त्या टप्प्यावर निर्णय चुकण्याचा संभव अधिक असतो. नुसता निर्णय तरी काय कामाचा? निर्णय झाल्यानंतर तो यशस्वी होण्यासाठी योग्य ते शिक्षणही घेणं तितकंच महत्वाचं आहे. शिक्षणानं माणूस सक्षम झाला की, तो कठीण आव्हानं पेलू शकतो. क्षमता आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या तरीसुद्धा एकमेकांशिवाय दोन्ही अपूर्णच आहेत. असाच प्रकार माहिती आणि ज्ञान या दोन्ही बाबतीत आहे. माहिती मिळवणं आणि ज्ञान मिळवणं या दोन गोष्टींमध्ये आपण खूपवेळा फरकच करत नाही. खर्डेघाशी करून किंवा घोकंपट्टी करून फारतर माहिती मिळवता येईल, पण, ज्ञान तसं मिळवता येत नाही. विशिष्ट ध्येयानं कष्ट करावे लागतात. विशेष अभ्यास करावा लागतो आणि याकरिता आपला मार्गदर्शक किंवा गुरुसुद्धा तितकाच उत्तम असावा लागतो.
संधी मिळवणं आणि योग्य संधीचा योग्य लाभ घेता येणं हे दोन्ही गुण करिअरसाठी अतिशय महत्वाचे असतात, हे जगाला आता पदोपदी पटायला लागलेलं आहे. संधी काही आपोआप मिळत नसतात, त्या आपणहून शोधाव्या लागतात, त्यासाठी सतत जागरूक राहावं लागतं. अनेक गोष्टी आपल्या समोर असतात, रोज दिसतात, पण त्यात आपल्याला संधी वगैरे काही दिसत नाही. एखाद्या माणसाला ती दिसते आणि तो त्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होतो. संधी ओळखता तर यायला हवी. शालेय आयुष्यात प्रगतीपुस्तकावर धडाकेबाज गुण दिसणं आणि संधी शोधण्याची दृष्टी विकसित होणं या दोन गोष्टींपैकी मी दुसरी गोष्ट जास्त महत्वाची मानेन. कारण, संधीच शोधता आली नाही तर आपलं उत्तम शिक्षणसुद्धा निरुपयोगी ठरतं. संधी सापडली की, ती स्वीकारण्यासाठी धाडसही लागतं. एका मुलाखतीमध्ये विचारलेल्या एका प्रश्‍नाला संधी दिसली की, मी ती आधी स्वीकारतो आणि नंतर ती सिद्ध करण्यासाठी पडतील तितके कष्ट करतो, असं उत्तर टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी दिलं आहे.
शोधक वृत्ती प्रत्येकात सापडतेच असं नाही. जशी संधी शोधावी लागते, तसा विविध क्षेत्रांमधल्या तज्ञ माणसांचाही शोध घ्यावा लागतो, त्या माणसांशी संपर्कात राहावं लागतं. या गुणाला समर्थ रामदासांनी ‘पंडित मैत्री’ असं म्हटलं आहे. ज्ञानी आणि तज्ञ माणसांशी मैत्री करण्याचा गुण आपल्याला आयुष्यात नेहमी यशाचा मार्ग दाखवतो. हे सगळे गुण एकत्र आले की, माणसाच्या प्रगतीचा आलेख सतत चढता राहतो. ज्ञानूमध्ये हे सगळे गुण मला नेहमी दिसत आले आहेत आणि याच गुणांचा ज्ञानूला नेहमी फायदा झालेला आहे. मला त्याच्या या गुणांचं नेहमी कौतुक वाटतं.
ज्ञानू रोज ५-६ वेगवेगळी वर्तमानपत्रं वाचतो, महत्वाची कात्रणं काढतो. रात्रीसुद्धा विविध विषयांवरची पुस्तकं चाळतो. तज्ञ व्यक्तींच्या मुलाखतींच्या कार्यक्रमांना आवर्जून जातो. चालू जगतातल्या घडामोडी माहित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणं त्याला सोपं जातं. इंग्रजी विषयाला तो विविध विषयांशी अगदी सहजपणे जोडतो, म्हणूनच विद्यार्थ्यांना त्याचं शिकवणं आवडतं. अजूनही तो अनेक गोष्टी उत्साहानं शिकतो. इंग्रजी भाषेत संवादलेखनाचा एक कोर्स त्यानं नुकताच पूर्ण केला आहे. ज्ञानू अजूनही त्याच्या शाळेत जातो, शिक्षकांशी गप्पा मारतो. त्याला ज्या गोष्टी आनंद देतात, त्या त्या गोष्टी तो करतो. म्हणूनच, तो समाधानी आहे आणि यशस्वी आहे.असे ज्ञानू घराघरांत असायला हवेत…
मला ग्रॅन्डमास्टर व्हायचंय हे वाक्य मी आजपर्यंत कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीच्या तोंडून ऐकलेलं नाही. त्यामुळे तुला मोठेपणी कोण व्हायचंय? या प्रश्‍नाचं हे उत्तर मला अगदी अनपेक्षित होतं. या मुलाची बुद्धिमत्ता विलक्षण तीक्ष्ण आहे. कारण, त्यानं मला त्याचं केवळ स्वप्नच सांगितलं नाही तर, त्या बरोबरच त्याला बुद्धिबळाच्या क्षेत्राविषयी काय माहिती आहे, हेही सांगितलं. त्यानं सांगितलेली माहिती अचूक होती. मी त्याला प्रत्यक्ष बुद्धिबळ खेळण्याविषयी विचारलं तर, त्यानं मला अगदी उघड आव्हान दिलं. तो म्हणाला, तुम्ही कोणतीही पहिली चाल खेळा. मी त्यापुढच्या तुमच्या दहा चाली एका मिनिटाच्या आत सांगतो. मी त्याच्याबरोबर खेळलो आणि खरोखरच त्यानं मला ते करूनही दाखवलं. बुद्धिबळ खेळण्यातली त्याची गती नक्कीच विशेष आहे, याची मला खात्रीच पटली. बोलता बोलता तो जे बोलून गेला ते वाक्य मला फार महत्वाचं वाटलं. मी बुद्धिबळाकडे खेळ म्हणून बघतच नाही. मी स्वतःला राजा समजूनच खेळतो. त्या मुलाला त्याच्या स्वतःच्या ध्येयाची इतकी सुस्पष्ट जाणीव होती की, त्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकताच नव्हती.
एखादं क्षेत्र एखाद्या माणसाच्या करिअरचा मार्ग कसा काय बनतं? हा खरे पाहता एक अतिशय निराळा आणि संशोधनाचा विषय आहे. विविध प्रकारच्या विद्या, अभ्यास, संशोधन, खेळ, कला यापैकी प्रत्येक गोष्ट हि करिअरशी जोडली गेलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रगतीच्या संधी दारात उभ्याच आहेत. प्रगती तर आहे, पण ती प्रत्येकाची होईलच असे नाही. आपल्याला त्याकरिता प्रयत्नपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे. माहिती मिळवणे आवश्यक आहे. एखाद्या क्षेत्रात अतिशय चांगल्या दर्जाचे करिअर करण्यासाठी आपल्यामध्ये काही कौशल्ये असावी लागतात, विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते. नुसती बुद्धिमत्ता किंवा कौशल्ये असूनही चालत नाही, तर त्याकरिता पुन्हा विशिष्ट शिक्षण किंवा प्रशिक्षण घ्यावे लागते. एकदाच शिकून किंवा एखादा कोर्स करून आयुष्यभर त्यावरच विसंबून काम करता येतेच असे नाही. त्यामुळे, आपापल्या क्षेत्रातले अद्ययावत ज्ञान, माहिती आणि तंत्रे सतत शिकत राहणे तर क्रमप्राप्तच असते. ज्यांना हे सगळे जमते ती माणसे यशस्वी होत जातात, ज्यांना हे जमत नाही, त्यांच्यापासून यश नेहमी दूरच राहते. करिअरमधल्या घोटाळ्याची सुरुवात नेमकी इथूनच होते. हे गौडबंगाल नेमके आहे तरी काय, हे आपण विद्यार्थी आणि पालकमित्रांनी नीट लक्षात घेणे आवश्यक आहे.
हुशार, बुद्धिमान, डोकेबाज, विचारी, चौकस बुद्धीचा, एकपाठी हि सगळी विशेषणे आपण कुणाच्या बाबतीत वापरतो? सर्वसाधारणपणे ज्याला परीक्षेमध्ये सर्वांपेक्षा जास्त गुण मिळतात, त्यांच्याकरिता लोक ही सगळी विशेषणे वापरतात. एक फार मोठी गंमत तुम्हाला सांगतो, ती म्हणजे – ही सगळी विशेषणे स्मरणशक्तीशीच संबंधित आहेत. स्मरणशक्ती म्हणजे अनेक गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याची क्षमता. जो अनेक गोष्टी अतिशय उत्तमप्रकारे लक्षात ठेवू शकतो, तो हुशार, असं आपण मानतो. ते खरंही आहे. पण पूर्णपणे खरं नाही. उदाहरणार्थ, एखाद्या विषयाच्या परीक्षेत तुम्हाला ५० प्रश्‍न विचारले आहेत, त्या सर्व ५० प्रश्‍नांची उत्तरे एका पुस्तकात दिलेली आहेत, तुम्ही त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तोंडपाठ केली आणि परीक्षेत लिहिली. तुम्हाला त्या पैकीच्या पैकी गुण मिळाले. म्हणून, तुम्ही हुशार आहात, असं सगळेजण म्हणू लागले. सगळ्यांचं म्हणणं खरं आहे. पण ते पूर्णपणे खरं नाही. याचं कारण असं की, परीक्षा आणि त्यातले गुण हा बुद्धिमत्ता पाहण्याचा केवळ एक मार्ग आहे. परंतु, त्यावरून बुद्धिमत्ता ठरवता येत नाही. (क्रमश:)
मानसतज्ञ – करिअर काऊन्सेलर,
संचालक – प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे. •••

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (119 of 794 articles)

P C Mustafa
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | सहाव्या इयत्तेत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आज १०० पेक्षा जास्त कोटींचं साम्राज्य उभं करणार्‍या केरळातील एका कुलीच्या ...

×