ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » ॥ स्वामीये शरणम् अयप्पा ॥

॥ स्वामीये शरणम् अयप्पा ॥

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

काय गंमत आहे बघा! ज्यांना काफिरांचे अस्तित्वच मान्य नाही, असा एक अहिंदू काफिरांच्या मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात जातो! काफिरांच्या देवदेवतांचा प्रचंड तिरस्कार, टिंगलट करणार्‍या अहिंदू महिला नियम धाब्यावर बसवून सबरीमला मंदिरात बळजबरीने घुसायचा प्रयत्न करतात! हे सहजासहजी घडत असेल? ‘महिलांच्या मूलभूत हक्कासाठी लढा’ या गोंडस बुरख्याआड लपलेल्या अहिंदू षडयंत्राचा सुगावा लागल्यामुळेच महिलांच्या सबरीमला मंदीर प्रवेशाला हिंदुंकडून प्रचंड विरोध होत आहे. यात अयप्पा स्वामींवर प्रचंड श्रध्दा असलेल्या हिंदू महिला आघाडीवर आहेत, हे विशेष! ज्यांची अजिबात श्रध्दा नाही अशा मुठभर अहिंदू महिलांना मंदिरात थेट प्रवेश करायचा आहे आणि त्यांना हजारो हिंदू महिला प्रचंड विरोध करीत आहेत!

Ayappa Swami

Ayappa Swami

ठराविक वयोगटातील महिलांसाठी सबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावर असलेल्या प्रतिबंधाच्या विरोधात-समर्थनार्थ गेली काही वर्षे चर्चा, वाद-प्रतिवाद झडत आहेत. दहा वर्षाच्या आतील मुली आणि पन्नास वर्षावरील प्रौढ महिला यांच्या मंदीर प्रवेशावर प्रतिबंध नाहीत. अनेक वर्षांच्या चिंतनातून, अनुभवांमधून तावून सुलाखून निघाल्यानंतर आमच्या दृष्ट्या हिंदू पूर्वजांनी स्थलकालपरत्वे काही रीतीरिवाज, परंपरा, दंडक व्यक्तीच्या आणि समाजाच्या व्यापक हितासाठी ठरवून दिलेले आहेत. घरात, मंदिरात, समाजात वावरताना कुठली बंधनं स्वयंस्फूर्तीने का पाळावीत याचेही मार्गदर्शन केले आहे. मंदिरं ही हिंदुंसाठी श्रध्दास्थानं आहेत, तशीच ती समाजाला मार्गदर्शन करणारी, प्रशिक्षण देणारी व्यासपीठं, विद्यापीठं आहेत, प्रेरणास्थळं आहेत. म्हणून तर विदेशी, विधर्मी आक्रमकांचा पहिला हातोडा देवदेवतांच्या मूर्तींवर, मंदिरांवर पडायचा! हिंदुंच्या मर्मस्थळांवर, आस्थांवर घाव घातले की हिंदू कोसळतो, हे परकीय असहिष्णू आक्रमकांनी ओळखले होते. म्हणून तर गझनीच्या मोहम्मदाने सोरटी सोमनाथाचे मंदीर उध्वस्थ करायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. काशी विश्‍वनाथाच्या मंदिरात, द्वारकाधीशाच्या मंदिरात घुसलेल्या मशिदी आणि अयोध्येतील श्रीराम मंदीर उध्वस्थ करुन त्याच ठिकाणी बांधलेली तथाकथित बाबरी मशिद, ही त्याची ठळक उदाहरणं आहेत. स्वतंत्र भारतातही हिंदुंच्या आस्थांवर, प्रार्थनास्थळांवर होणारे आघात थांबलेले नाहीत. कार्यशैली तेवढी बदलेली आहे. पूर्वी जे काम विदेशी, विधर्मी आक्रमक करायचे, तेच काम आज हिंदू धर्म सोडलेल्या अहिंदुंकडून, हिंदू असूनही हिंदू असल्याचा विसर पडलेल्या भंपक सेक्युलॅरिस्ट, वामपंथीयांकडून करुन घेतले जात आहे.
सबरीमला मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश द्यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करणारा अर्जदार अहिंदू आणि सर्वोच्च न्यायालयाकडून तसा निर्णय आल्यानंतर मंदीर प्रवेशासाठी हट्टाला पेटलेल्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या महिलाही अहिंदुच आहेत! काय गंमत आहे बघा! ज्यांना काफिरांचे अस्तित्वच मान्य नाही, असा एक अहिंदू काफिरांच्या मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात जातो! काफिरांच्या देवदेवतांचा प्रचंड तिरस्कार, टिंगलटवाळी करणार्‍या अहिंदू महिला नियम धाब्यावर बसवून सबरीमला मंदिरात बळजबरीने घुसायचा प्रयत्न करतात! हे सहजासहजी घडत असेल? ‘महिलांच्या मूलभूत हक्कासाठी लढा’ या गोंडस बुरख्याआड लपलेल्या अहिंदू षडयंत्राचा सुगावा लागल्यामुळेच महिलांच्या सबरीमला मंदीर प्रवेशाला हिंदुंकडून प्रचंड विरोध होत आहे. यात अयप्पा स्वामींवर प्रचंड श्रध्दा असलेल्या हिंदू महिला आघाडीवर आहेत, हे विशेष! अयप्पा स्वामींवर ज्यांची अजिबात श्रध्दा नाही अशा मुठभर वळवळ्या अहिंदू महिलांना मंदिरात थेट प्रवेश करायचा आहे आणि त्यांना हजारो स्वामीभक्त हिंदू महिला प्रचंड विरोध करीत आहेत! देवाच्या दर्शनासाठी मंदिरातच कशाला गर्दी केली पाहिजे? श्रध्दा असेल, तर तुमचा देव घर बसल्या भेटेल, अशी एरवी टीका करणारे सेक्युलर भामटे सबरीमला मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश मिळालाच पाहिजे म्हणून शंख करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदीर प्रवेशाची अनुमती दिली आहे ना? मग प्रवेश कधी करायचा? करायचा की नाही? याचा निर्णय आस्तिक भाविक महिलांनाच घेऊ द्या ना? नास्तिक हिंदू-अहिंदुंनी त्यात लुडबुड करायचे प्रयोजन काय? आमच्या निर्णयाची अंमलबजावनी करा, याचा ठेका सर्वोच्च न्यायालयाने यांच्याकडे दिला आहे काय?
दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना सबरीमला मंदिरात प्रवेश करायला आमच्या पूर्वजांनी प्रतिबंध का घातला असेल, ते समजून घेतले पाहिजे. हिंदुंच्या आस्था आणि स्त्री-पुरुष समानता यांच्यात टकराव न होता सुवर्णमध्य काढता येऊ शकतो. त्यासाठी भाविक महिला आणि मंदीर प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. नास्तिकांनी, परधर्मीयांनी त्यात ढवळाढवळ करु नये.
सबरीमला मंदीर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार भगवान अयप्पा स्वामी आजीवन ब्रह्मचारी असल्यामुळे वरील वयोगटातील महिलांनी मंदिरात प्रवेश करणे निषिध्द मानले जाते. या परंपरेला विरोध करणारी मंडळी महिलांच्या मूलभूत अधिकाराचा प्राधान्याने विचार केला पाहिजे, असा युक्तीवाद करतात! याच युक्तीवादाचा आधार घेत एक जनहितार्थ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सबरीमला मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश दिला जावा, असा निवाडा दिला. माकडांच्या हातात कोलीत मिळाले! ही याचिका आम्हालाही मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून कुण्या प्रवेश प्रतिबंधित हिंदू भाविक महिलेने दाखल केली नव्हती, तर ती काफिरांच्या धर्मपरंपरांशी संबंध नसलेल्या नौशाद अहमद खान या मुसलमानाने दाखल केली होती! आपल्या मुस्लिम आयाबहिणींची तीन तलाक, हलालासारख्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून या वकील नौशादमियाँने कधी याचिका दाखल केली नाही? मोदी सरकारने काढलेल्या तीन तलाक बंदी विधेयकाला जाहीर विरोधच केला! यांना हिंदू महिलांचा पुळका कसा काय आला? गणपती बाप्पा मोरया म्हणणार्‍या वारीस पठाणला माफी मागावी लागली, पण नौशाद अहमद खानवर कुठलीच कारवाई झाली नाही! मुसलमानांच्या मशिदींमध्ये, ख्रिश्‍चनांच्या चर्चमध्ये काय चालते, याची कुठलीही उठाठेव कुण्याही हिंदुने कधीही केली नसताना, ही मंडळी हिंदुंच्या सणोत्सवांविरुध्द, मठमंदीर प्रशासनाविरुध्द सतत कागाळ्या करीत असतात! कारण, आमच्या देशातली सेक्युलर सरकारं, न्यायालये यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतात! हिंदुंच्या भावभावनांची मात्र सतत अवहेलना केली जाते. हज यात्रेसाठी कुणी जावे, कुणी जाऊ नये याविषयी हिंदू कधीही मतप्रदर्शन करीत नाही. भारतातील चर्च प्रशासनाचे निंयंत्रण भारताबाहेरुन, व्हॅटिकनकडून केले जाते, यावरही हिंदुंनी कधी आक्षेप घेतला नाही. तरीही हिंदू असहिष्णू असल्याची जागतिक बोंबाबोंब हीच मंडळी करीत असतात! हिंदुंच्या मातृभूमीत हिंदू पोरके असल्याची केविलवाणी अवस्था हिंदुंनी आणखी किती वर्षे सहन करायची? आमच्याही भावनांची तातडीने दखल घेणारी सरकारं, न्यायालये आमच्या नशीबातच नाहीत का? हिंदुस्थानात हिंदू म्हणून जन्माला येणे पाप आहे का?
सबरीमला प्रशासनाविरुध्द नौशाद अहमद खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायनिवाडा करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मंदीर प्रशासनाची मतं जाणून घ्यायची तसदी घेतली नाही! ज्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती, त्या भाविक हिंदू महिलांचे विचार ऐकून घ्यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटले नाही! हिंदू धर्मीयांची अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडीत काढण्याचा आदेश देण्यापूर्वी साधुसंतांना, हिंदुंचे धर्मगुरु शंकराचार्यांना विचारावेसे सर्वोच्च न्यायालयाच्या मनातही आले नाही! एका मुसलमानाने हिंदुंच्या मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश दिला जावा म्हणून याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने नौशादला हवा तसा निर्णय देऊन टाकला! उद्या एखाद्या हिंदुने चर्च प्रशासनाविरुध्द, वक्फबोर्ड, जामा मशिद, अलिगड मुस्लिम विद्यापीठ यांच्याविरुध्द अशीच एखादी याचिका दाखल केली, तर सर्वोच्च न्यायालय संबंधीतांना विश्‍वासात न घेता असाच एकतर्फी निर्णय द्यायची हिंमत करील का? अलिगड मुस्लिम विद्यापीठात असलेली पाकिस्तान निर्माता मोहम्मद अली जिन्ना यांची तसबीर काढून टाकण्याविषयी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करुन घेईल का? नौशादच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले, भेदाभेद अमान्य! मग त्याच समानतेच्या तत्वानुसार ३५-अ, ३७० काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालय पुढाकार का घेत नाही?
महिलांना समाजात त्यांचे उचित हक्क मिळावेत, ती केवळ महिला आहे म्हणून तिच्याशी भेदाभेद करु नये याविषयी कुण्या हिंदुच्या मनात दुमत असण्याचे कारण नाही. सबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश हा विषय महिला हक्काचा, भेदाभेदाचा नसून हिंदुंच्या आस्था, परंपरांचा आहे. त्यात महिलांना दुय्यम वागणूक द्यायचा हेतू नाही.
सबरीमला मंदिरात प्रवेश करु इच्छिणार्‍या भाविकांना ठराविक प्रक्रियांमधून जावे लागते. गृहस्थाश्रमी भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ब्रह्मचर्य पाळणे, जमिनीवर झोपणे, दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करणे, नशापाणी-मौजमजा न करणे, खडावा घालणे, धार्मिक अनुष्ठान करणे अशी बंधनं ४१ दिवस पाळावी लागतात! त्यानंतर डोक्यावर मंगल कलश घेऊन पायी चालत गेल्यानंतर गाभार्‍यात प्रवेश दिला जातो! पब-क्लब-ब्युटी पार्लरमधून निघाले आणि थेट गेले दर्शनाला, तर प्रवेश दिला जात नाही.
जीवाला शिवाची भेट घ्यायची असेल, तर आंतरबाह्य सुचिर्भूत होऊनच जावे लागते. शेवटचे घरटे, म्हणजे आपला नरदेह, भगवंताच्या दरबारात घेऊन गेल्यानंतर आपल्या पंखांवरुन त्याचा प्रेमळ हात एकवार फिरावा, असे प्रत्येक आस्तिक हिंदू भक्ताला वाटत असते. म्हणून मलीनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात!
४१ दिवसांचा खडतर परिपाठ आणि महिलांची जीवशास्त्रीय मर्यादा लक्षात घेऊन दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना मंदीर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही, या वयोगटातील हिंदू भाविक महिलांकडूनच तशी मागणी आली असती, तर मंदीर प्रशासन, हिंदू धर्माचार्य, अयप्पा स्वामींवर नितांत श्रध्दा असलेल्या हिंदू महिला प्रतिनिधी यांनी एकत्र बसून, विचारविनिमय करुन कुणाच्याही भावना न दुखावता तोडगा काढता आला असता! असे अनेक नाजुक प्रश्‍न हिंदू समाजाने हळुवारपणे हाताळले आहेत. परंतु ज्याच्या धर्माला अन्य धर्मीयांचे अस्तित्वच मान्य नाही, त्या नौशादमियाँना, धर्माला अफूची गोळी समजणार्‍या नास्तिक कम्युनिस्टांना, धर्मांतरण घडवून हिंदुंचे लचके तोडणार्‍या ख्रिश्‍चन मिशनर्‍यांना आमच्या धर्मपरंपरांवर अक्कल पाजळण्याचा नैतिक अधिकार नाही. ही मंडळी हिंदुंचा सर्वनाश करुन भारत पादाक्रांत करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी हिंदुंविरुध्द सतत षडयंत्रं रचण्यात येत आहेत. तरीही हिंदू जागा व्हायला तयार नाही! इतिहासाचे स्मरण करुन आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकडे बघायला तयार नाही. पेट्रोल-डीझल पाचपन्नास पैशांनी महागले, तर आरडाओरड करत रस्त्यावर उतरणारा हिंदू, आपल्या धर्मावर येणारी आक्राळविक्राळ संकटं समोर दिसत असतानाही खाली मान घालून कसा काय बसू शकतो? कुठे गेले हिंदुंचे क्षात्रतेज? परधर्मीयांसमोर नांगी का टाकतो आपण? कुठून आली ही नपुंसकता?
सर्वोच्च न्यायालयाकडून मंदीर प्रवेशाची अनुमती मिळालेली असतानाही हिंदू भाविक महिला सबरीमला मंदिराकडे फिरकायला तयार नाहीत, असे दिसताच हिंदुंच्या वाईटावर टपून बसलेली अहिंदू मंडळी पुढे सरसावली आहेत. नौशाद अहमदने मंदिराचे दरवाजे उघडायला लावले आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहान फातिमा प्यारीजान सुलेमान, मेरी स्विटी, कविथा कोशी या महिला सबरीमला मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला अयप्पा स्वामीभक्त हिंदू महिलांचा प्रचंड विरोध होत आहे. या रेहान वगैरे महिला कुणी पत्रकार, समाजसेविका वगैरे आहेत म्हणून ४१ दिवसांचा बंधनकारक परिपाठ न करताच यांना मंदिरात थेट प्रवेश हवा आहे. न्यायालयाने प्रवेशाला अनुमती दिली आहे, पण त्यासाठीचे नियम पाळू नका, असे म्हटलेले नाही! अनेक वर्षे चालत आलेली परंपरा मोडून, कोट्यावधी हिंदुंच्या भावना पायदळी तुडवून अमंगलांना गाभार्यात प्रवेश करु द्यायचा? या महिला ना हिंदू आहेत, ना त्यांचा हिंदू संस्कृतीवर विश्‍वास आहे! ज्यांना अयप्पा स्वामींचे ब्रह्मचर्य मान्य नाही, ४१ दिवसांचा काटेकोरपणा मान्य नाही, त्यांची अयप्पा स्वामींवर श्रध्दा नाही, हे उघड आहे! त्यांनी गाभार्यात जायचा आग्रह धरणे, हा आडमुठेपणा झाला! या अहिंदू महिलांनी आजपर्यंत हिंदू धर्माला बदनाम करण्याचेच काम केले आहे. अयप्पा मुर्तीवर फेकण्यासाठी वापरलेले गलिच्छ सॅनिटरी नॅपकीन सोबत घेऊन जाणार्‍या फातीमाची मध्ययुगीन मुर्तीभंजक गझनी विकृती वेळीच ठेचून काढली पाहीजे! ब्रह्मचारी अयप्पा गाभार्‍यात संभोग करायची धमकी देणारी विकृती भारतीय असू शकत नाही. प्रेषितांचे व्यंगचित्र ज्यांना सहन होत नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी हिंदुंनी नेभळटपणा सोडून आक्रमक झाले पाहिजे!
रेहान फातिमाने हिंदुंसाठी निषिध्द असलेली किस ऑफ लव्ह चळवळ डाव्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली होती. या चळवळीत सहभागी झालेली जोडपी देहविक्रय व्यवसायातली होती, हे नंतर उघड झाले. रेहान फातिमाच्या थोबाडपुस्तिकेतील प्रत्येक छायाचित्रातून बिभत्स हिंदूद्वेश ठायीठायी टपकतोय. यांच्या वैयक्तिक छायाचित्रांमधून हिडीस नग्नता विपूल प्रमाणात आढळते. अशा महिलांना नियम धाब्यावर बसवून ४१ दिवसांचा परिपाठ न करताच स्वामी दर्शन हवे आहे. हिंदुंची मंदीरं म्हणजे मौजमजा करण्यासाठीची पर्यटनस्थळं वाटली की काय यांना? नागडं नाचायला? मंदिराचे पावित्र्य जपणे ही भाविकांची, प्रशासनाची जबाबदारी असते. हिंदू परंपरांचा अपमान करुन हिंदू भाविकांना भडकाविण्याचे काम या अहिंदू महिला करत आहेत. म्हणूनच मंदीर प्रशासनाने नाही, तर हिंदू भाविक महिलांनी यांचा मंदीर प्रवेश रोखून धरला आहे.
भारतातील वामपंथी, जिहादी आणि ख्रिश्‍चन मिशनरी हे हिंदूविरोधात नेहमी गळ्यात गळे घालतात. यांना सबरीमला मंदीर उध्वस्थ करायचे आहे. लाल शिरोमणी सीताराम येचुरी म्हणाले, सबरीमला मंदीर परिसरात बाबरी मशिदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे! म्हणजे आग लावायची यांनी आणि खापर फोडायचे हिंदुंच्या डोक्यावर! सबरीमला डोंगर परिसरात प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. त्यांची अयप्पा स्वामींवर नितांत श्रध्दा आहे. ती एकदा तोडली की मिशनर्यांना धर्मांतरासाठी रान मोकळे! शिवाय सबरीमला मंदिराच्या मालकीची हजारो एकर जमीन आहे. ती यांना घशात घालायची आहे! सबरीमला मंदीर ताब्यात आले की सार्‍याच गोष्टी सोप्या होणार आहेत. मायबाप वामपंथी केरळ सरकार आहेच मदतीला! हा केवळ महिलांच्या मंदीर प्रवेशाचा प्रश्‍न नाही, तर त्यामागे फार मोठे देशविघातक षडयंत्र आहे.
हे अयप्पा स्वामी महाराजा, सर्व मतभेद विसरुन देशहितार्थ एकत्र यायची हिंदुंना सुबुध्दी दे! ते शक्य नसेल, तर संकटांची अशी एक मालिका पाठवून दे, ज्यात असूरी प्रवृत्तींचा सर्वनाश होईल, प्रत्येक हिंदू होरपळून निघेल, पण मरणार नाही! अधूनमधून हादरे बसत आहेतच, पण एक जोरदार झटका होऊन जावू दे! त्यानंतर कदाचित हिंदू जागे होतील! स्वामीये शरणम् अयप्पा।

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (58 of 1153 articles)

Isi Agent Nishant Agrawal Bhramos
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | हेरगिरी हादेखील युद्धनीतीचाच एक भाग आहे. त्यामुळे देशाशी गद्दारी करणार्‍या अशा बदमाशांवरील खटले भारतीय ...

×