ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच!

१०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच!

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आपल्या देशातला धोरणात्मक आणि मोठा बदल आहे. त्याची आपल्याला सवय नाही. पण जेव्हा दुर्धर रोग होतो तेव्हा कधीच ऑपरेशन न झालेल्या पेन्शटला जशी ऑपरेशन करून घेण्याची तयारी करावीच लागते, तसे हे देशावर झालेले ऑपरेशन आहे. नागरिकांच्या सवयी बदलण्यास आणि त्याचे परिणाम होण्यास वेळ लागणारच. सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या, तरी नोटबंदी यशस्वी झाली. कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येऊन प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही रोगट सूज होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्त्वाचे !

Noteban Pm Modi

Noteban Pm Modi

रिझर्व बँकेचा अहवाल आल्यावर नोटाबंदीविरोधातील हेका न सोडणार्‍यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. नोटाबंदी फसली, असा निष्कर्ष काढून काही माध्यमे मोकळी झाली आहेत. या देशाचे आर्थिक व्यवहार कधीच शुद्ध होऊ नयेत आणि निरपेक्ष किंवा पारदर्शी व्यवस्था कधीच उभी राहू नये, असे ज्यांना वाटते, तेच नागरिक नोटाबंदीला विरोध करू शकतात. ज्या सरकारकडे आपल्याला दाद मागायची आहे, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, बँकिंगचा फायदा जसा आपल्याला मिळतो आहे, तसा तो या देशातील सर्व गरिबांना मिळाला पाहिजे, थोडा त्रास झाला तरी चालेल पण आपल्या देशातील व्यवस्था पारदर्शी झाली पाहिजे, असे ज्यांना वाटते, ते नोटबंदीकडे नकारात्मक दृष्टीने पाहणार नाहीत.
नोटबंदीकडे एक वर्ष १० महिन्यांनी तरी वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ती अशी की, समजा आपल्याला नोटबंदी चुकीची वाटली, तरी हा निर्णय आता देशाचा झाला आहे. मागील दोर आता कापले गेले आहेत. आता पुढेच गेले पाहिजे. जसे गूगलचा नकाशा पाहताना आपण चुकलो तर गूगल नकाशा त्या पुढील मार्ग सांगते, तसा नवा मार्ग निवडला पाहिजे. पण ते न करता आपण जेथून निघालो, तेथेच पुन्हा गेले पाहिजे, असा जो सूर दिसतो आहे, तो सर्वथ: चुकीचा आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या रद्द केलेल्या १०० टक्के नोटा रिझर्व बँकेत परत आल्या असल्या, तरी नोटबंदी यशस्वी झाली आहे, हे समजून घेतले पाहिजे. उदा. नोटबंदीनंतर १० लाखांपेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करणार्‍यांची संख्या आहे ३.०४ कोटी! हा जो पैसा बँकेबाहेर रहात होता, तो बँकेत आला. त्यामुळे त्यांना त्या वर्षात इन्कम टॅक्स भरावा लागला. जो पूर्वी भरला जात नव्हता. काळ्या पैशांची व्याख्या आहे- ‘ज्या पैशाच्या माध्यमातून कर चुकविला जातो, तो काळा पैसा!’ याचा अर्थ त्यावर आता इन्कम टॅक्स भरला गेला म्हणजे तो आता शुद्ध झाला, एवढेच अपेक्षित होते. पण नोटबंदी विरोधकांना कोणाला तरी शिक्षा करावयाची आहे. पण ती प्रकरणे वेगळी आहेत, हे समजून घेतले पाहिजे. प्रत्यक्ष करांत १८ टक्के वाढ झाली आहे, यातच सर्व काही आले. त्यात २.०९ लाख नागरिकांनी प्रथमच इन्कम टॅक्स भरला आहे, ही आकडेवारीही बोलकी आहे.
नोटबंदी विरोधकांचा आवडीचा प्रश्‍न म्हणजे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करून २००० रुपयांची नोट का काढली? याचे थेट कारण असे आहे की ८६ टक्के चलन काढून घेतले तर आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबू शकतात, ते थांबू नयेत, म्हणून केलेली ती तात्पुरती व्यवस्था होती. ज्याला बायपास म्हणता येईल. महामार्गाची दुरुस्ती पूर्ण झाली की बायपास जसा बंद केला जातो, तशी २००० रुपयांची नोट आता व्यवहारातून काढून घेतली जाते आहे. गेल्या सप्टेंबरपासून या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. आणि रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालानुसार २००० च्या नोटांचे जे ३५० कोटी पिसेस होते, त्यातील फक्त १५.१ कोटी पिसेस आता व्यवहारात राहिले आहेत. ५०० आणि २०० च्या नोटा त्याप्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पण आपला ना आपल्या रिझर्व बँकेवर विश्‍वास आहे, ना सरकार नावाच्या व्यवपथेवरव्ग कारण आपल्याला फक्त राग व्यक्त करून विषय सोडून द्यायचा आहे. हे सर्व समजून घेतल्यावर, तरीही आपले मत वेगळे असूच शकते. अशावेळी सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाला मत न देण्याचा आपला अधिकार लोकशाहीत अबाधित आहे. पण सर्वच यंत्रणांवर अविश्‍वास दाखवून कोणतीच व्यवस्था कोणालाच न्याय देऊ शकणार नाही, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आपल्या देशातला धोरणात्मक आणि मोठा बदल आहे. त्याची आपल्याला सवय नाही. पण जेव्हा दुर्धर रोग होतो तेव्हा कधीच ऑपरेशन न झालेल्या पेन्शटला जशी ऑपरेशन करून घेण्याची तयारी करावीच लागते, तसे हे देशावर झालेले ऑपरेशन आहे. नागरिकांच्या सवयी बदलण्यास आणि त्याचे परिणाम होण्यास वेळ लागणारच. मोठ्या नोटा आणि रोखीचा अतिरेक झाल्यावर काय वेळ येऊ शकते, हे जगातील काही देश अनुभवत आहेत. अर्थव्यवस्थेला मोठ्या नोटांमुळे जी रोगट सूज आली होती, ती कमी होऊन देश पुढील भविष्यासाठी सशक्त होण्याची प्रक्रिया या बदलामुळे सुरू झाली, हेही समजून घेतले पाहिजे.

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (453 of 1224 articles)

Saji Thomas
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | अत्यंत विषम परिस्थितीत जीवनाची ४५ वर्षे पूर्ण करणार्‍या केरळच्या साजी थॉमसने केवळ भारताचीच मान उंचावली ...

×