ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » १९७५ ची आणिबाणी

१९७५ ची आणिबाणी

॥ विशेष : शोभा फडणवीस |

(मागील अंकवरून)

1975 Emergency

1975 Emergency

केंद्रातील मोदी सरकारच्या काळात देशात सगळ्यात जास्त सहिष्णुता अनुभवास येत असतानाही विरोधी पक्ष जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत. विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित असतानाही आवाज दाबला जात असल्याची टीका अवास्तव आहे. जे लोक आज मोदी सरकारवर टीका करीत आहेत, त्यांनी जरा आणिबाणीच्या काळात डोकावून पाहिले तर बरे होईल.
आणिबाणीत अटक केल्यानंतर आम्हाला कारागृहात पाठविण्यात आले होते. आमची महिलांची राहण्याची सोय नागपूर जेलमध्येफाशीखान्यात होती. फाशी देणार्‍या महिलांसाठी जी सोय ती आमच्याकरिता! कायपण यांचे विचार! सर्व चांगल्या घरातल्या, सुशिक्षित, शिकलेल्या अशा महिलांना उघड्यावर, अर्धवट सडलेल्या तरट्याच्या आडोशाला प्रातर्विधी करायला जावे लागे. विचार करा, आमची काय अवस्था असेल? उघड्यावर सामुदायिक आंघोळ, खोलीला मोठ्या सळाकींचा दरवाजा- त्यात कपडेबदल! कायपण आमची परिस्थिती होती. सर्व लाज-शरम खुंटीवर टांगली होती. तत्कालीन शासनाच्या निर्लज्जपणाचा कळस होता तो! झोपायला तणसाच्या गाद्या! मी एकदा सुपरिटेंडंटला विचारले, ‘‘साहेब, आमच्याकडे मेलेल्या व्यक्तीला तणसावर चादर टाकून झोपवितात, उशाला तणसाची उशी देतात. तुम्ही आम्हाला तेचं दिलं. आम्ही तुम्हाला फिरते मुर्दे वाटतो का?’’ हो, तसेही शासनाचे मन, विचार करण्याची स्थिती, माणुसकी मेलेलीच होती.
त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची, हाच प्रश्‍न आहे. पुन्हा यांना सत्ता हवी म्हणे? कशासाठी? आमच्या फाशीखान्यात ४महिन्यांनंतर एका स्त्री भुताचे आगमन झाले. ती कोणालाही रात्री उठवायची! एकदा सुमन पिंपळापुरेला रात्री २.३० वाजता उठवून टाक्यावर घेऊन बसविले. ती तिथे २ तास दात घासत बसली. नंतर तिच्या लक्षात आले व ती माझ्या खोलीत घाबरून बसली.
आमच्याकडे सकाळी चहा आणण्याकरिता महिलांची ड्युटी लावली होती. त्या दिवशी वेळकरताईंची ड्युटी होती. तिला पहाटे ३ वाजता उठवून दारात बसवून ठेवले. २ तास बसल्यानंतर लक्षात आले. आता मला सांगा, आम्ही १ वर्ष भुताच्या सान्निध्यात कसे घालवले असेल? फक्त आम्हा कुणाला त्या भुतापासून इतर त्रास नव्हता, मात्र जिवंत भुतांचा त्रास होता! जेवणाच्या बाबत तर विचारूच नका! सकाळचा चहा केटलीत यायचा. त्यावर माशांचा (मेलेल्या) थर असायचा. तो चहा आम्ही गाळून प्यायचो. चहात माशी पडली तर कॉलरा होतो म्हणून आपण घरी पित नाही. तिथेतर शेकडो माशांचा चहा आम्ही गाळून प्यायलो! आम्हाला कॉलराच काय, साधा तापही आला नाही! अशी ईश्‍वराची मर्जी आमच्यावर होती. ‘देव तारी त्याला कोण मारी?’ हेच खरे! याचे कारणही महत्त्वाचे होते, ते म्हणजे पुन्हा चहा मिळायचा नाही.
जेवणात ५२ पत्त्यांची भाजी (म्हणजे भाजीच्या झाडांची पाने), कच्च्या पोळ्या, भातात लेंड्या, वरणाच्या पाण्यात माशांचा थर, वाटीभर मुगात गुंडभर पाणी- ती पाण्याची उसळ, हा जेवणाचा मेनू! पहिले लेंड्या शोधा, मग माशा काढा व नंतर जेवण करा! हे रोजचेच जेवण सुरुवातीला असायचे. नंतर भाज्या आल्या, परंतु भाज्यांचे पाणीच फोडणी घालून मिळायचे, परंतु पर्याय नव्हता. गरीबसुद्धा त्यापेक्षा चांगले जेवण जेवतात. आम्ही गुन्हेगार नव्हतो, आम्ही कैदी नव्हतो, कारण त्यांच्या कैदेतही मर्यादा असते. आम्ही स्थानबद्ध होतो. मिसात होतो. आम्हाला न्याय मागण्याचा हक्कच नव्हता! हे असे का? हे विचारण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे आम्ही बाहेर जाण्याला मार्गही नव्हता. असे आमचे बेभरवशाचे जीवन होते. ही परिस्थिती या महाभागांना काय माहिती? पूर्वीचे लोक आम्हाला स्वर्ग-नरकाच्या कहाण्या सांगायचेपाप केलं तर नरक व पुण्य केलं तर स्वर्ग! हे लहानपणापासून मनावर बिंबलेले. इथेतर आम्ही नरकातच होतो! परंतु पाप्यांकडून सज्जनांना मिळालेला नरक होता तो!
उघड्या संडासच्या वासाने जीव गुदमरायचा, झोप येईना. खोल्यांमध्ये पांढर्‍या उवा भिंतीवर रांगेनी चालायच्या. आंघोळीला आडोसा नाही. कैदी महिलांच्या सहवासात दिवस घालवायचा, मोकळी हवा नाही. १२-१२ फुटाच्या भिंतीचे बंधन! कसे राहिलो असू आम्ही? ‘स्वर्गात इंद्राच्या अप्सरा नृत्य करतात म्हणे!’ इथेतर माशा घोंघावायच्या, डासांचे संगीत-नृत्य रात्रंदिवस चालायचे, संडासचा वास, ढेकणांचा सहवास, ऊन, वारा, पाऊस, थंडी… सारखेच सहन करायचे. पावसाळ्यात सगळीकडे भांडे ठेवून झोपायचे. कधीकधी पोटावर गंज घेऊन झोपायचे! अगदी स्वप्नात असल्यासारखे तुम्ही चित्र रंगवा. याला काय म्हणावे, ते ठरवा! याला सूड घेणे, जिवंत मरणं देणे म्हणतात! इतके अमानुष कृत्य यांचे होते. ते आम्ही कुणाला सांगणार? शेवटी १० महिन्यांनंतर सगळ्यांनाच असह्य झालं आणि कोर्टात जायचं निश्‍चित झालं. तोपयर्र्ंत हळूहळू आपल्या हक्काची जाणीव झाली. अन्यायाचा फासही हळूहळू कमी झाला. शेवटी काळ हा मदतीला धावून आला. आम्ही हेबिअर्स कार्पस टाकले. ते कोर्टाने नोंदवून घेतले.
आमचा न्यायासाठी, हक्कासाठी लढा सुरू झाला. आम्ही महिलांनी हेबिअर्स कार्पस टाकले. एकत्र केस कोर्टाने लावली. आमचे म्हणणे ऐकले नाही व निकाल दिला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, कोणी ऐकल्याही नाहीत, आम्हाला कोर्टाने बोलविलेही नाही. मला राग आला, मी माइया वकिलांवर भडकले. मी कोर्टातून न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही म्हणून हट्ट केला. तेव्हा वकील मला म्हणाले, एकच उपाय आहे, परंतु त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो, तुला कोर्ट कुठेही पाठवू शकते, तू ठरव. मी म्हटलं, मी ठरवले. या नरकापेक्षा वाईट कुठेच असू शकत नाही! मला त्यांनी, जज्जच्या केबिनमध्ये जा आणि त्यांना हे सर्व सांग, असे सांगितले. मी गेले, हायकोर्टाच्या जज्जच्या केबिनमध्ये घुसले. ‘‘जज्ज दचकले. काय आहे हे?’’ त्यांनी मला विचारले. मी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही आपल्या कोर्टात महिलांची केस टाकली. आपण त्याचा विचारही केला नाही व निर्णय दिला! आम्हाला न्याय कोण देईल?’’
त्यावर त्यांनी सरकारी वकिलाला बोलावले व त्यांना आमचे म्हणणे सांगितले. त्यावर त्या वकिलाने जज्जसाहेबांना सांगितले, ‘‘सर, मी त्यांच्या जेलमध्ये गेलो होतो, पाहणी केली. सर्व ठीकच तर आहे!’’ शेवटी जेल म्हणजे घर नव्हे, हॉटेल नव्हे, हे त्यांना कळायला हवे’’ मला संताप आला. हा वकील खोटं बोलत होता. मी जज्जसाहेबांना विनंती केली, ‘‘सर, यांच्या बायकोला आमच्याबरोबर चार दिवस ठेवा म्हणजे आमचे हाल यांना कळतील सर! आम्ही चांगल्या घरच्या महिला आहोत. आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही खून केलेले नाही, मग आम्ही नरकात का राहायचे?’’ यावर कोर्टाने दुसरे दिवशी स्पेशल केस लावली. सर्व जेल अधिकार्‍यांना नोटीस दिली. आम्हालाही उपस्थित राहण्याची नोटीस दिली व आमची केस आम्ही लावून घेतली. केस पूर्ण वाचल्यानंतर जज्जसाहेबांना आमची गंभीर परिस्थिती कळली. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. एका महिन्याच्या आत पक्के संडास, बाथरूम बांधण्याचा, वाळ्याच्या ताट्या लावण्याचा, बंद डब्यात स्वच्छ व चांगले जेवण देण्याचा आदेश दिला. आम्ही जिंकलो, आनंद व्यक्त केला. असा आमचा जेलप्रवास होता. जज्जसाहेबांच्या केबिनमध्ये घुसून बेकायदेशीर प्रवेश करूनही काही झाले नाही. मग जेलमध्ये हक्कासाठी भांडायचे, आपले हक्क मिळवायचे, ही मनाशी खूणगाठ बांधली व आमचे हक्कासाठी अंदोलन सुरू झाले व यशस्वीही झाले.
आम्हाला बाहेर निघण्याची आशा नव्हती. कुणाचीही मध्यस्थी काम करीत नव्हती. आम्ही जिथे होतो त्याच्या मागे तेवढ्याच खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत आमच्या दोघींच्या समाध्या बांधण्याचे पत्र आम्ही सुपरिंटेंडंटना दिले. भविष्यात कुणी आमच्या घरचे आले व त्यांनी काही आणले, तर कैद्यांना वाटून द्याल, असे कळविले. त्या वेळी मात्र जेलर, सुपरिंटेंडंट यांच्या डोळ्यांत पाणी आले. ‘‘हे सर्व सहज रीत्या तुम्ही कसे सहन करता? एवढे असूनही तुमच्या चेहर्‍यावरचे हास्य कमी होत नाही!
धन्य तुम्ही!’’ त्यांच्यातली माणुसकी, त्यांच्यातला माणूस जागविण्याचे काम आम्ही केले, याचाच आनंद आम्हाला झाला. दुसर्‍या दिवशी ते राखी घेऊन आले व म्हणाले, ‘‘ताई, तुम्हाला माझ्यासारखा, आमच्यासारखे भाऊ आवडणार नाही, अत्याचारी भाऊ कुठल्याच बहिणीला नको असतो. परंतु, तुमच्यासारखी बहीण आम्हाला चालेल. फक्त एवढं ऐका व आम्हाला राख्या बांधा.’’ तो सोहळा अतिशय भावनिक होता. पाषाणालाही पाझर फोडण्यात आम्ही यशस्वी झालोत. याला म्हणतात आणिबाणी! ही यांना कुठे दिसली ते दाखवा? उगीचच ‘उचलली जीभ व लावली टाळूला!’ असे करू नका. मलातर भीती वाटते. समजा, चुकूनही वाईटातले वाईट म्हणून त्यांचे राज्य आले, तर हे आमच्यासाठी पुन्हा आणिबाणी आणणार तर नाहीत? कारण त्यांच्या मनात आणिबाणीचे भूत भरलेले आहे! लोकांना, ‘सावधान’ एवढेच मला म्हणावयाचे आहे. विषाची परीक्षापण नको! (लेखिका राज्याच्या माजी मंत्री आहेत)

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (235 of 875 articles)

Shriguruji
विशेष : डॉ. मनमोहन वैद्य, सह सरकार्यवाह, रा.स्व.संघ | ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये ‘अंतर्गत संकट’ नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा उल्लेख ...

×