ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » पुरवणी, मानसी » घर मनातलं, प्रत्यक्षातलं!

घर मनातलं, प्रत्यक्षातलं!

घर..! चार भिंती, छत असलेलं मायेचा उबदार निवारा. या यंत्रयुगात उदरनिर्वाहाच्या चक्रात अडकलेल्या धावपळीच्या जगातलं. निवांत हक्काचा मायेचा आसरा!
आपल्या घराचा सबंध आपल्या मनाशी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असतो. घराच्या अंतरंगाचा आरसा त्या घरात राहणार्‍या व्यक्तीच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब असतं.
असं हे आपल्या स्वप्नातलं, अंतर्मनातलं घराचं स्वप्न मोठ्या कष्टाने साकारलं जातं, तेंव्हा त्या घरातला कोपरा न कोपरा आपला होऊन जातो. त्यावर मायेनं हात फिरवला जातो. प्रसन्नतेनं घराचं पावित्र्य जपलं जातं.
भिंतीवरल्या रंगाचा गुळगुळीत स्पर्श असो वा भिरभिर उडणार्‍या देखण्या चौकटीतला खिडकीतला कलात्मक पडदा, मनावर हलकंच मोरपीस फिरवून जातं.
दिवाणखाण्यात दिमाखाने मिरवणारी हक्काच्या कोनाड्यात बसलेली एखादी सुबक मूर्ती अन् तिच्यावर हळूवार प्रकाशाची झालर धरली तर कुणाचंही त्या कोनाड्यावर लक्ष वेधल जाईल.
कधी एखादी भिंत जुन्या आठवणींना उजाळा देताना लहान-मोठ्या वयातल्या हसर्‍या-दुखर्‍या क्षणांनाही त्या चौकटीतून जिवंत करून जाते. तर कधी एखादी निसर्गाची चौकट त्या भिंतीला तजेला देते.
हीच एखादी भिंत छोट्यांच्या खोलीत रंगाच्या पॅलेटवर कुठे कार्टुन तर कुठे खेळायला प्रोत्साहन देत बालरंगात रंगून जाते अन् ही छोटी मंडळी मग रात्रीच्या कुशीत स्वाधीन होताना छतावरील चंद्र तार्‍यांच्या टिमटिमणार्‍या उजेडात स्वप्नांच्या नगरीत कधीच जाऊन पोहोचतात.
आई-बाबांच्या रूमचा भारदस्तपणा त्याच्या हळूवार संवेदनशील मनाचा गाभाराच असतो.
कधी एखाद्या कोपर्‍यात थकून भागून आलेल्या आई बाबांसाठी आरामखुर्ची असेल अन् सोबत म्युझिक प्लेअरवर हळूवार वाजणारं एखादं आवडतं गाणं सुरू असेल मग हळूच बाबांना त्यांच्या पुस्तकांचं छोटेखानी कपाट त्याच्या पारदर्शी काचेतून खुणावू लागतं. निवांत आराम करण्यासाठीचा नीटनिटका बेड कधी झोपेच्या स्वाधीन करतो, कळतच नाही आणि हो, या रूमचा अविभाज्य भाग असलेलं प्रशस्त कपाट आपल्या अंतरंगात नानाविध कपड्यांचा खजिनाच दडवून ठेवतं.
घराचं ह्रदय असलेल्या स्वयंपाक घराची शान काही औरच असते. इथे प्रत्येक वस्तू कशी गुण्यागोविंदाने नांदत असते. वाफाळता चहा अन् सोबतीला खमंग पोह्याचा सुगंध पोटातील अग्नी बळावतोच.
मग रात्रीला एकत्र जेवणाची मैफल डायनिंग टेबलावरच्या पंगतीत चार घास अधिकच जेवत हास्यविनोदात रंगली जाते.
रात्री मग कलात्मकतेने सजवलेल्या भिंतीवरचा आधुनिक जगाची खबरबात देणारा टीव्ही आजी आजोबा, ताई, दादा, आई, बाबांच्या संवादात सहभागी होतो.
कधी कधी शतपावली घालायला वा एखादी गाण्याची लकेर गुणगुणायला छोटी बाल्कनी असेल तर क्या बात! सोबत निशिगंध, मोगर्‍याची दरवळणारी बाग मन प्रसन्न करून जाते.
तर मंडळी अशा या चार भिंती व छताला जिवंतपणा देणार्‍या घराची अंतर्गत सफर आपण सर्व जण मिळून करूयात. दर आठवड्याला तुमच्या घरातील एखादी रूम, एखादा कोनाडा, एखादी भिंत बोलकी करूयात. तुमच्या सूचनांचा, अनुभवांचा खजिना सोबत घेऊया. ही सावली पुढील सदरात तुमच्या घराच्या उंबरठ्यातून डोकवणार आहे बरं.
(लेखिका पुण्यात इंटेरीअर डेकोरेटर म्हणून व्यवसायिक आहेत.)
– सावली-सुप्रिया

Posted by : | on : Sep 11 2017
Filed under : पुरवणी, मानसी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पुरवणी, मानसी (736 of 952 articles)

Sucided Actress
लाईट, कॅमेरा आणि ऍक्शन असे म्हटले की, डोळ्यांसमोर ग्लॅमरस दुनियेचे एक झगमगते चित्र उभे राहते. नेम, फेम देणार्‍या या फिल्मी ...

×