ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » युवा भरारी » नेत्रदान…

नेत्रदान…

शिरिष दारव्हेकर

nettradanसुरभीच्या कंपनीत सीएसआर विभागातर्फे नेत्रदानाची ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांकडून एक कार्ड भरून घेतले. या कार्डावर स्वतःची वैयक्तिक माहिती आणि मी नेत्रदान करेन असे हमीपत्र होते. सुरभी घरी आली आणि हातातलं ते कार्ड तिनं नाचत नाचतच तिच्या आई-बाबांना दाखवलं. सुरभी म्हणाली, हे बघा आई-बाबा, मी आता केव्हाही नेत्रदान करू शकते… आई-बाबा तिच्या या बोलण्यावर एकदम चक्रावलेच. पोरीला नेत्रदानातलं काहीही माहिती नाही हे तिच्या एका वाक्यावरूनच त्यांना कळलं.
सुरभीसारखी अवस्था आजघडीला अनेक तरुण मंडळींची झाली आहे. नेत्रदान करायची तर खूप इच्छा आहे पण त्यासाठी काय करायचं, कोणाला भेटायचं, त्याविषयीचे समज गैरसमज याविषयी मात्र काहीही माहिती नाही. घरातली ज्येष्ठ मंडळीही त्याविषयी फारसं काही बोलत नाहीत. अशा वेळी मग इच्छा असूनही नेत्रदानासारखा गंभीर विषय मागे पडतो.
खरं तर नेत्रदान हा शब्दच मुळात बर्‍याच अंशी चुकीचा आहे. नेत्रदानाच्या प्रक्रियेत संपूर्ण डोळ्याऐवजी केवळ दृष्टिपटल (कॉर्निया) दान केला जातो. मरणोपरांतच नेत्रदान करता येते. मात्र, नेत्रदानाचा संकल्प जिवंतपणीच व्यक्तीने केला पाहिजे. संकल्प केलेल्यापैकी केवळ एखाद दोन टक्केच व्यक्तींचे प्रत्यक्ष नेत्रदान होते. याचे कारण नेत्रदानाचे संकल्पपत्र हे काही कायदेशीर कागदपत्र नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जरी जिवंतपणी नेत्रदानाचा संकल्प केला असेल, परंतु त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तशी पूर्वकल्पना नसेल व त्यांनी प्रत्यक्ष नेत्रदानाचे वेळी जर हरकत घेतली किंवा नकार दिला, तर इच्छा असूनही संबंधित व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही, ही बाब येथे अधोरेखित करावीशी वाटते.
आजच्या घडीला अंदाजे २ लाखांहून अधिक दृष्टिहीन व्यक्तींना कॉर्नियाची गरज आहे. प्रतिवर्षी सुमारे २० हजार व्यक्ती कॉर्निया अंधत्वाचे शिकार होतात. यापैकी ६० टक्के दृष्टिहीन हे १२ वर्षांहून कमी वयाचे, तर ९० टक्के दृष्टिहीनांचे वय ४५ वर्षांहून कमी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन लोकांना दृष्टी मिळू शकते. नेत्रदानाचा संकल्प केलेली व्यक्ती मरण पावल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना त्यासंबंधी माहिती असल्यास त्यांनी तातडीने जवळील नेत्रपेढीशी संपर्क केला पाहिजे. मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आत नेत्रदान करावे लागते. दृष्टिपटलातील दोषामुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठीच केवळ (कॉर्निया) नेत्रदानाने फायदा होऊन पुन्हा दृष्टी मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच नेत्रदान गुप्तदान असते, त्यामुळे कोणाला तुमच्या प्रियजनाचे डोळे मिळाले आहेत याविषयी कधीही उलगडा होऊ शकत नाही व ते योग्यच आहे.
नेत्रदानाविषयी अनेक गैरसमज लोकमानसात आहेत. सर्व धर्माचे लोक नेत्रदान करू शकतात तसेच कोणत्याही वयाचे स्त्री-पुरुष नेत्रदानास पात्र असतात. चष्मा असलेले, कॉंटॅक्ट लेन्सेस वापरणारे किंवा डोळ्यासंबंधी कोणतीही शस्त्रक्रिया झालेले लोकही नेत्रदान करू शकतात.
नेत्रदानाचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीलंका देश. येथे नेत्रदानासंबंधी कोणताही कायदा नाही परंतु येथील डॉ. हडसन डिसेल्व्हा यांनी आपल्या जीवनात या विषयाबाबत प्रचंड कार्य व जनजागृती केली. प्रत्येक माणसाने जाताजाता या जगाला काहीतरी देऊन गेले पाहिजे हा भगवान बुद्धाचा संदेश येथील लोकांना व्यापक अर्थाने डॉ. हडसन यांनी समजावला. खरंतर कितीही गरीब माणूस असला तरीही तो नेत्रदानासारखे अत्यंत मोलाचे कार्य त्याच्या मरणोपरांत नक्कीच करू शकतो. त्यामुळेच येथील लोकांमध्ये याविषयी प्रचंड प्रमाणात आस्था आहे. नेत्रदानाविषयीचा संकल्प ती व्यक्ती करत असली तरीही त्या व्यक्तीचा यासंबंधीचा निर्णय प्रत्यक्षात आणण्याचे मोठे काम त्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना करावयाचे असते. त्यामुळेच नेत्रदानाविषयीचा निर्णय दुसर्‍याच्या वतीने केव्हा ना केव्हा आपल्यालाही घ्यावा लागू शकतो, हे लक्षात घेऊनच प्रत्येकाने याविषयी सजग व्हायला हवे, ही काळाची गरज आहे.
नेत्रदानासंबंधी काही गैरसमज व त्यांची उत्तरे
१.अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकते का?
– होय, मात्र या व्यक्तीचे कॉर्निया सुस्थितीत असतील तरच
२.नेत्रदानाने चेहरा खराब होतो का?
– नाही, नेत्रदानाचे वेळी केवळ डोळ्याचे दृष्टीपटल काढले जाते त्यामुळे चेहर्‍यावर त्याचा कोणताही अपाय होत नाही
३.जिवंतपणी नेत्रदान करता येते का?
– नाही, जिवंत व्यक्ती केवळ रक्त, लीव्हर आणि किडनी दान करु शकते, मात्र नेत्रदान हे केवळ मरणोपरांतच करता येते
४. एका शहरात नेत्रदानाचा संकल्प केला आणि दुसर्‍या शहरात संबंधित व्यक्तीला मरण आले तर तिचे नेत्रदान कसे करता येईल?
– नेत्रदानाचा संकल्प केलेली व्यक्ती कोणत्याही ठिकाणी मरण पावली तर तिच्या कुटुंबीयांनी वा आप्तेष्टांनी तातडीने जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करायला हवा. त्यानंतर नेत्रदानाची प्रक्रीया पूर्ण होईल.

https://tarunbharat.org/?p=240
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : युवा भरारी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in युवा भरारी (1 of 9 articles)


देवबा शिवाजी पाटील अभ्यासाची नावड का निर्माण होते याचा सखोल विचार केला तर त्यामागे अनेक कारणे असल्याचे लक्षात येईल. यामध्ये ...

×