ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » फिचर, विविधा » टाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…

टाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…

►मानवजातीने निर्माण केलेली कृत्रिम पाणीटंचाई उलटणार,
तभा वृत्तसेवा
नागपूर, २१ मार्च –
भूगर्भातून अधिक पाण्याचा उपसा, मानवाने निसर्गाचा साधलेला असमतोलपणा, पाण्याचा नको तितका वापर, या सर्व बाबींतून जगभर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे (रीसायकलिंग) ही आजची गरज बनली आहे. अख्ख्या मानवजातीने निर्माण केलेली ही कृत्रिम पाणीटंचाई पाहता भविष्यात टाकावू पाणी वापरले तरच माणूस टिकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) यंदाच्या जलदिनाची  ‘थीम’ टाकावू पाण्याचा वापर अशी घोषित केली आहे.
सन १९९२ मध्ये रिओ दी जानिरिओ येथे संयुक्त राष्ट्र संघाने एका परिषदेत पाणी संरक्षणसंदर्भात एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तर दुसर्‍या वर्षी म्हणजे २२ मार्च १९९३ हा  आंतरराष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर युनोच्या वतीने आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक उपक्रम राबविले. संपूर्ण जगात या मोहिमेत सुसूत्रता यावी, यासाठी सन १९९४ पासून पुढील प्रत्येक वर्षी विशिष्ट विषयावर उपक्रम (थीम) राबविण्यात येऊ लागले.
टाकावू पाण्याची निर्मिती  स्थळे
घरगुती वापर, लहानमोठी उपहारगृहे, हॉटेल्स, मॉटेल्स, विविध उद्योग-कारखाने, शैक्षणिक संस्था, प्रार्थनास्थळे, खेळांचे स्टेडिअम, गॅरेज (व्हिईकल वॉशिंग सेंटर्स), पोहण्याचे तलाव, सर्व प्रकारची दवाखाने आदी ठिकाणांतून सर्वाधिक टाकावू पाणी निर्माण होते. आजच्या घडीला पाण्याचा वापर हा पिण्यापेक्षा अवांतर वापरावर अधिक होतो, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. पिण्याचे पाणी आणि शेतपिकांना उपयोगी ठरणारे पाणी वगळता अन्य सर्व बाबींसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्यावर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाणी देणे, सार्वजनिक बगिचे, कोळसा खाणी, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, वीजनिर्मिती केंद्र, झाडांना पाणी देणे, टॉयलेट फ्लशिंग, वातावरणातील धूळ खाली बसविण्यासाठी वापर (डस्ट कन्ट्रोल), इमारत बांधकामातील वापर, कृत्रिम तळे आदी अनेक ठिकाणी टाकावू पाणी (वेस्ट वॉटर) वापरता येणे शक्य आहे. साधारणपणे अन्न, वस्त्र, निवारा या मानवजातीच्या प्राथमिक गरजा मानन्यात येतात, परंतु काळानुसार त्यात बदल होत या गरजांच्या संख्येत वाढ होत गेली. पाणी ही सुद्धा त्यापैकी एक असून, ती हक्काची बनली असली तरी त्या गरजेचेच जतन करणे आवश्यक झाले आहे.
पाऊस जमिनीत मुरावा
पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत असला तरी भूगर्भालाही दुसरे निर्मितिस्थान मानता येईल. कारण पाण्याचा नैसर्गिक साठा याच ठिकाणी असतो. मात्र, दरवर्षी पाऊस येतो आणि त्याचे दिवस संपले की तो निघून जातो. केवळ शेतातील पिकांसाठीच पाऊस जमिनीवर येतो आणि अन्य कामांसाठी पाणी आपल्याला जमिनीतून मिळते, असा समज निर्माण झालेला आहे. दुसरीकडे मानवाने निसर्गावर घातलेल्या घावांमुळे ‘ग्लोबल वार्मिंग’ सारखे नवे संकट उभे आहे. परिणामी कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आपल्यालाच सहन करावा लागतो. पुराचे पाणी नुसते वाहून जाते. त्याला नियंत्रित करून साठवून ठेवण्याचे कसब या आधुनिक मानवाला आजतरी साधलेले नाही. पावसाचे प्रमाण कमी असो वा जास्त, पाऊस जमिनीत मुरतच नाही. ज्याचे मोजमाप करता येत नाही, असे मोठ्या प्रमाणातील पावसाचे पाणी वाहून जाते. दुर्दैवाने अगदी आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या पायाला मातीचा स्पर्श होत नाही. घरातील अंगणात टाईल्स, बाहेर फू टपाथवरही टाईल्स, रस्तेही डांबर किंवा सिमेंटचे…तर ते पाणी मुरणार कुठे आणि कसे? अशा अनेक प्रश्‍नांत अख्खे जग गुरफ टून गेले आहे.
युनोने जाहीर केल्याप्रमाणे, पाण्याची कमतरता वा पाणीटंचाई निर्माण होणे ही एक प्रकारची पाण्याबाबतचे दारिद्र्यच आहे. जगातील १ अब्जपेक्षा अधिक  व्यक्तींना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तर जगात दररोज ४९०० पेक्षा अधिक मुलांना पिण्याच्या पाण्यातून आजार होतात आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाने २२ मार्च २००७ पासून  ‘एन्ड वॉटर पॉव्हर्टी’ नावाचे अभियान सुरू केले आहे. यासंदर्भात जागृती होण्यासाठी जगातील अनेक खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे.

https://tarunbharat.org/?p=19127
Posted by : | on : 22 Mar 2017
Filed under : फिचर, विविधा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in फिचर, विविधा (16 of 17 articles)


वृत्तसेवा नागपूर, २० फेब्रुवारी - भाषा कोणतीही असो, ती संस्कृतीचे, संस्काराचे, वारशाचे, परंपरेचे, विकासाचे, सहिष्णुतेचे, संवादाचे प्रभावी वहन करीत असते. ...

×