ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » फिचर, विविधा » भाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन

भाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन

तभा वृत्तसेवा
नागपूर, २० फेब्रुवारी –
भाषा कोणतीही असो, ती संस्कृतीचे, संस्काराचे, वारशाचे, परंपरेचे, विकासाचे, सहिष्णुतेचे, संवादाचे प्रभावी वहन करीत असते. मागील कित्येक पिढ्यान्‌पिढ्या ही धारा वाहतच आहे आणि भाषांच्या माध्यमातून आजचा मानव अत्याधुनिक बनला आहे. कारण या भाषेने देशांदेशांतील विचार, संस्कृती, अभिव्यक्ती, सहिष्णुता जोडली आहे आणि त्यातूनच मानवाचा विकास झाला आहे. यामुळेच जागतिकता आणि स्थानिकता यांची सरमिसळ झाली आहे, म्हणता येईल.
मानवाच्या प्राथमिक विकासाला जसे यंत्र कारणीभूत ठरले, त्याच तुलनेत भाषा या प्रकारानेही त्याला विकासाच्या दृष्टीने एक उच्चस्थान मिळवून दिले आहे. आपले मत, आपले विचार दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे वा त्याला पूर्णपणे समजेल अशा आदानप्रदानीचे महत्त्वपूर्ण आणि सशक्त माध्यम म्हणजे भाषा. आज जगात हजारो भाषा बोलल्या जातात. प्रामुख्याने प्रमाण आणि बोली ही दोन त्यांची रूपे आहेत, असे म्हणता येईल. कारण प्रमाणभाषा ही प्रशासकीय मानली जाते, तर बोलीभाषा ही व्यवहारात वा परस्परांशी संवाद साधताना वापरली जाते. शिवाय प्रमाण आणि बोली या प्रकाराला विविध पैलू आहेत. ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये, असे म्हणतात. तसेच, काहीसे भाषेच्या निर्मितीबाबत बोलता येईल. जगातील भाषा कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाल्या, याविषयी सांगणे कठीण आहे. कोणतीही भाषा ही जशी दोन व्यक्तीला जोडण्याचे काम करते, तशीच ती त्यांना संस्कारितही करते. म्हणजेच भाषेचा दुसरा अर्थ संस्कार असे म्हणता येईल.
आपल्या देशातही  विविध बोलीभाषा बोलल्या जातात. त्यातील काही प्रमाणभाषा आहेत, तर काहींना सरकारदरबारी अभिजात दर्जा मिळाला आहे. आपली भाषा ही आपल्या मातेचेच दुसरे रूप असते. लहान शिशू हा मातेने शिकवलेल्या बोबड्या बोलातून बोलणे शिकतो. पुढे तो प्रमाण भाषेकडे वळतो. म्हणजेच संस्कारचे मूळ हे मातेच्या बोलीतून अर्थातच भाषेच्या माध्यमातून पुढे येते.
संयुक्त राष्ट्रेच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा उपक्रम सुरू केला. या महत्त्वपूर्ण उपक्रमातून युनेस्कोने जगातील समस्त भाषांना एका माळेत बांधून ठेवले आहे, ही बाब विसरता येत नाही. आजच्या घडीला जगात शिक्षणाच्या विकासाचा जो डोंगर निर्माण झाला आहे, त्याला जागोजागी भाषाने आधार दिला आहे.
भाषाभाषांत संवादाचा, सहिष्णुतेचा पूल तयार झाल्याने शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचे दिसून येते. भारतातील एखाद्या गावखेड्यातील तरुण शिक्षणासाठी दूरवरच्या ऑस्टे्रलियात जातो आणि दूर जगाच्या एका कोपर्‍यातील आदिवासी देशातील एखादी तरुणी  भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावयास येते. यातच भाषांचे मोठे यश आहे, असे म्हणता येईल.

http://tarunbharat.org/?p=16433
Posted by : | on : Feb 21 2017
Filed under : फिचर, विविधा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in फिचर, विविधा (19 of 20 articles)


निष्कर्ष, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ जानेवारी - झोपेतून उठल्या-उठल्या सर्वात आधी आपण आपला मोबाइल कुठे ते शोधतो आणि लागलीच मोबाइलमधील ...

×