ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » सदाफुली » मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

Vijay Chavan

Vijay Chavan

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले, त्यापैकीच एक म्हणजे विजय चव्हाण. ज्यांना मराठी चित्रसृष्टी मामा या नावाने ओळखत असे. हौशी रंगभूमीवरून त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश मिळणे अवघड नव्हते; परंतु संधी येणे महत्त्वाचे होते. कारण, मुळात विनोदी नट. त्यात तो काळ राजा गोसावी, अशोक सराफ यांनी धुमाकूळ घातलेला. लक्ष्मीकांत बेर्डे यांची १९८० च्या दशकात एन्ट्री झाली होती. अशावेळी आगमन होऊन स्वत:ची वेगळी ओळख जपणारा कलाकार म्हणजे विजय चव्हाण. मोरूच्या मावशीने वेगळी ओळख मिळालेल्या आणि जगभर हिंडलेल्या विजय चव्हाण यांनी आपले साधेपण जपले होते. यशाच्या शिखरावर पोहोचलेला कलाकार असूनही डोक्यात हवा गेलेली नव्हती. त्यामुळेच त्यांचे निधन चटका लावून गेले.
विजय चव्हाण यांना अभिनयाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले होते. त्यांच्या वडिलांनाही अभिनयाची खूप आवड होती. तेव्हा ते परेल- लालबागच्या गिरणगावात राहत. चित्रपती व्ही. शांताराम यांचा राजकमल कलामंदिर स्टुडिओ याच परिसरात. त्यांच्या वडिलांनी या स्टुडिओत जाऊन ‘स्क्रीन टेस्ट’ दिली. पण, गाऊ शकत नसल्याने त्यांना संधी मिळू शकली नाही. ही खंत वा सल विजयमामांच्या मनात कायम होती. पण, चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावे असणारा मानाचा पुरस्कार जाहीर होताच विलक्षण हळवे होत त्यांनी ही आठवण सांगितली.
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीमध्ये लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांचे महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये सहभागी असलेला स्पर्धक ऐन वेळी काही कारणास्तव येऊ शकला नाही. त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील, असा विजय कदम यांना विश्‍वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले.
‘मोरूची मावशी’ हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी ‘मोरूची मावशी’ अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण, हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यामुळे व्यावसायिक नाटकातील भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी निर्मात्यांना सांगितले.
विजयमामांवर दिग्दर्शका विजया मेहता यांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या ‘हयवदन’ या नाटकात त्यांनी भूमिका साकारली. विजया मेहता यांच्या नाटकाच्या तालमीसाठी वेळेवर हजर राहण्याची शिस्त कायमच त्यांच्या अंगवळणी पडलीच, पण ती अतिशय गरजेची व उपयुक्त आहे, असेच मानत त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमांतून यशस्वी वाटचाल केली. बराच काळ विजयमामांनी गिरणी कामगार म्हणून नोकरी केली. गिरणीतील दिवस व रात्रपाळी सांभाळून नाटकाचे दौरे, असंख्य प्रयोग केले. एक ध्यास म्हणून त्यांनी अभिनय कारकिर्दीकडे पाहिले. म्हणूनच तर दिवसभर चित्रपटाचे चित्रीकरण केल्यावर न थकता, न कंटाळता रात्री त्याच उत्साहाने नाटकाचे प्रयोगही रंगवले. ‘मोरूची मावशी’ हे विजयमामांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण नाटक होय. या नाटकाच्या यशाने त्यांचाही आत्मविश्‍वास वाढलाच, पण ते ‘स्टार’ म्हणून ओळखले गेले. पूर्वीच्या काळात नाटकासाठी वेगळा नृत्य दिग्दर्शक नसे. व्यक्तिरेखेनुसार कलाकाराने सर्व गोष्टी समरसून करायला हव्यात. हीदेखील विजया मेहता यांची शिकवण असे. मोरूची ‘मावशी’ साकारताना विजयमामांना ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे व त्यासह नृत्य साकारायचे होते. ते त्यांनी स्वयंस्फूर्तीतून आणले आणि त्याच्यातही कमालीचे एकरूप झाले. इतके एकरूप झाले की, अनेक प्रयोगांमध्ये त्यासाठी ‘वन्समोअर’ मिळू लागला. इतरही नाटकातून त्यांनी आपला प्रवास खुलवला, विनोदाचे टायमिंग साधणे, ही एक कला असून त्यासाठी स्वभावात थोडासा हजरजबाबीपणा लागतो. तो विजयमांमामध्ये होताच, पण आपल्या विनोदाने कोणीही कळत नकळत दुखावले जाऊ नये, याचेही त्यांचे भान असायचे. विनोद हा सहकुटुंब आनंद घेता येण्याजोगा निखळ आणि नितळ असावा, हे त्यांचे मत. प्रेक्षकांना तशाच स्वच्छ विनोदातून आनंद देण्याचा वसा त्यांनी जपला.
मराठी चित्रपटातूनही विजयमामांनी आपली घौडदौड सुरू ठेवली. ‘घोळात घोळ’, ‘पटली रे पटली’, ‘फटफजिती’, ‘बंडलबाज’, ‘शेम टू शेम’, ‘माहेरची साडी’, ‘खुळयांचा बाजार’, ‘झपाटलेला’ अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली. विजूमामा मांसाहाराचे बरेच शौकीन होते. चित्रपट किंवा नाटकात काम करण्यासाठीची ऊर्जा भरपूर मासे खाऊन मिळते, अशीच त्यांची भावना होती.
विजय चव्हाण यांना यावर्षीच राज्य सरकारकडून व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘‘आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळत नसते. अगदी मलाही कोणतीच गोष्ट सहज मिळाली नव्हती. सुरुवातीला मीही खूप खस्ता खाल्ल्या. मगच माझ्या वाटयाला हे यश आले…’’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. उमेदीच्या काळात अभिनयाचे धडे गिरवतानाचा अंधुकसा लक्षात राहिलेला छबिलदास येथील वडयाबाबतचा किस्सा ते अनेकदा सांगतात. ‘‘सुरुवातीच्या काळात छबिलदासमध्ये आम्ही एकांकिका करायचो. त्यावेळी छबिलदासच्या गल्लीत मिळणारे बटाटेवडे खूपच प्रसिद्ध होते. भूक लागली की, ते खाण्याचा मोह अनेकदा व्हायचा. पण, खिशात तेव्हा पैसे नसायचे. मग नाटकाच्या सरावासाठी येणार्‍या इतर मंडळींच्या खिशात जितके पैसे असतील, ते एकत्र करून वडे घ्यायचो. दहा पैसे, चार आणे गोळा करून वडापाव खात पोट भरायचो. पण, पोटाला चिमटा काढून जीव ओतून साकारलेल्या त्या कामातही वेगळीच मज्जा होती,’’ असे विजय चव्हाण यांनी सांगितले होते.
अभिनयाची आवड नसताना, बदली कलाकार म्हणून महाविद्यालयात एका नाटकात काम केले. तिथे पहिला हशा, टाळया घेतल्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारही मिळविला. तिथून माझा अभिनय प्रवास सुरू झाला आणि आजही तो संपलेला नाही, असे विजय चव्हाण म्हणाले होते.
विजय चव्हाण यांची आजारावर मात करून पुन्हा रंगभूमीवर काम करण्याची, तसेच लाडका मुलगा वरद याचे लग्न पाहायची इच्छा होती. बोहल्यावर चढलेल्या वरदला सुखी संसारासाठी भरभरून आशीर्वाद त्यांना द्यायचे होते. मात्र, त्यांच्या दोन्ही इच्छा अपूर्ण राहिल्या. राज्य सरकारतर्फे दिला गेलेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतामध्ये त्यांनी रंगभूमीवर परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. रंगभूमीवर काम करण्यासह ‘जीवनगौरव मिळाला असला तरी माझा प्रवास संपला नाही. प्रवास सुरूच राहणार,’ अशी भावना विजय चव्हाण यांनी व्यक्त केली होती.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : सदाफुली.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in सदाफुली (6 of 28 articles)


कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कंगना राणावत अर्थात सिमरनला नव्या पिढीला सतावणारे प्रश्‍न सतावत आहेत. ...

×