संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » पाणीसाठा पाहून तरळले आनंदाश्रू

पाणीसाठा पाहून तरळले आनंदाश्रू

bandharaतभा वार्ताहर
सातारारोड, दि. २२ ऑक्टोबर –
तळीये (ता. कोरेगाव) येथील शिवकालीन दगडी वळण बंधार्‍यात साठलेल्या जलाचे महापूजन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल तसेच परांजपे ऑटो कास्टचे प्रसन्न परांजपे यांच्याहस्ते करण्यात आले. या जलपूजन कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांचा आनंद गगनात मावत नव्हता.
तळिये (ता. कोरेगाव) येथे नागपूरचे भोसले यांनी दगडी बंधारा बांधून शिवकाळात पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला होता. कालांतराने या बंधार्‍यात गाळ साठून त्याचे अस्तित्व लुप्त होत चालले होते. त्यातच सतत तीन वर्षे पडलेला भीषण दुष्काळ पाणी टंचाईमुळे तळीये ग्रामस्थांनी यावर खास उपाय शोधला. कर्तबगार अशी चांगल्या विचाराची मंडळी एकत्रित आली. पाण्यासाठी चांगले काहीतरी करायचे म्हणून थेट सातारा येथे गेली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या जनकल्याण समितीची भेट घेतली. समितीचे विजयराव पंडीत यांच्याशी त्यांनी शिवकालीन बंधार्‍यातील गाळ काढणे व बंधारा मजबूत कसा करता येईल याविषयी सविस्तर चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली याच जोडीला त्यांना सातारा येथील मे. परांजपे ऑटोकॉस्ट प्रा. लि. कंपनीचे आर्थिक पाठबळ व मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.
महाराष्ट्र शासन, परांजपे ऑटोकास्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, सर्व ग्रामस्थ तळीये यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शिवकालीन दगडी वळण बंधार्‍यातील मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. गाळ काढल्यानंतर लगेचच बंधार्‍याचे सिमेंटमध्ये मजबुतीकरण करण्यात आले. अनेक दशकानंतर बंधारा मोकळा झाला व प्रथमच त्यात चांगला पाणीसाठा झाला.
या कार्यक्रमास उपस्थित कोरेगावचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार शितल वाणी, कार्यकारी अभियंता, डॉ. सुभाष दर्भे, सरपंच दीपाली चव्हाण, उपसरपंच राणी लोखंडे, दीपक पिसाळ, परांजपे ऑटोकास्ट अधिकारी, कृषी व महसूल विभागाचे सर्व अधिकारी यांनी जलपूजन केले. आज या बंधार्‍यात ५० हजार घनमीटर म्हणजेच ५० टीसीएम पाणी साठा झालेला आहे. यामध्ये सुधाकर गद्रे व हणमंतराव नवाथे यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल म्हणाले की या सर्व कामात सामाजिक संस्था व व्यक्तिंचा सहभाग गौरवण्यासारखा आहे. आज प्रत्येक व्यक्तिने पाण्याचा थेंब थेंब वापर जपून करावा असे आवाहन यावेळी त्यांनी बोलताना केले.
जलपूजन कार्यक्रमास डॉ. म. भा. फणसळकर, धनंजय तांबे, मनोज कलापट, जयवंत सामंत, विश्राम चव्हाण, गोरख चव्हाण, हेमंत साठे, प्रमोद चव्हाण, कृषी अधिकारी साळुंखे, भारत गायकवाड, भाडळे, पळशी, बिचुकले, नलवडेवाडी, पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, देऊर व परिसरातील युवक, महिला, नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (33 of 37 articles)


तभा विशेष प्रतिनिधी कराड, [२२ ऑक्टोबर] - नगरपालिका हद्दीत सध्या शहरातील अनेक रस्त्याची कामे वेगाने सुरु आहेत.अक्षरशः रात्रीचा दिवस व ...