केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

►१ जुलैपासून अंमलबजावणी ►एकूण ३४ सुधारणा मंजूर, नवी दिल्ली,…

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

►मागील आर्थिक वर्षात १४.०७ अब्ज रुपये, नवी दिल्ली, २९…

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

नवी दिल्ली, २८ जून – कर परतावा विवरण (आयटीआर)…

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

►पंतप्रधानांचा चारपैकी दोन रात्र विमानप्रवास, नवी दिल्ली, २८ जून…

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

►६०० नवीन शब्दांना मिळाले स्थान, लंडन, २८ जून –…

दहशतवादाला थारा देऊ नका

दहशतवादाला थारा देऊ नका

►अमेरिका, भारताने पाकला ठणकावले ►ट्रम्प-मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा, वॉशिग्टन,…

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

►मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ►पुणतांबाच्या शेतकर्‍यांकडून सत्कार, मुंबई,…

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

नागपूर, २७ जून – बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात विशेषत:…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:03
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » युवासेना उपजिल्हाप्रमुखाच्या गाडीची मोडतोड

युवासेना उपजिल्हाप्रमुखाच्या गाडीची मोडतोड

तभा प्रतिनिधी
Mahabaleshwar-Maharashtraमहाबळेश्‍वर [दि २५ आक्टोबर] – युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या गाडीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून गाडीची मोडतोड केल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेने तातडीची बैठक घेवून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत शिक्षक सोसायटी मध्ये सचिन वागदरे हे राहतात. रात्री उशिरा त्यांनी त्यांची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली. दरम्यान, मध्यरात्री ३ नंतर मोटार सायकलवरून दोन इसमांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला व त्यांनी हातातील मोठा दगड गाडीच्या मागील काचेवर टाकला व काच फोडली. तसेच हल्लेखोरांनी मोठया आकाराची एक चिठ्ठी गाडीवर चिटकवली त्यामध्ये काल टि. व्ही. वर झळकत होतास आज गाडीवर दगड टाकलायं उद्या डोक्यात पडेल, असा मजकुर लिहीला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता एका दूरचित्र वाहिनीने पालिका राजकारणा संदर्भात एक शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये बोलताना सचिन वागदरे यांनी येथील एका नगरसेवकांवर आरोप केले होते. त्यामुळे हा हल्ला संबंधित नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केला असावा असा दावा सचिन वागदरे यांनी केला असून तशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेच गंभीर दखल घेतली असून हल्ल्याचा पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात इसमां विरूध्द गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी काही संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली मात्र, अद्याप हल्लेखोर कोण आहे याचा तपास लागलेला नाही. दरम्यान, येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची तातडीची बैठक पार पडली निवडणुकीचे वातावरण असल्याने शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवसैनिकांनी संयम पाळावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले व त्यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. या घटनेने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (28 of 37 articles)


तभा प्रतिनिधी सातारा, [दि. २४ ऑक्टोबर] - ‘राष्ट्रभक्तांचा एकच नारा, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालाफ या तरुण भारत ने घेतलेल्या भूमिकेेचे ...