Home » प.महाराष्ट्र » सातारा फटाका असोसिएशचा ‘स्वदेशी’चा एल्गार

सातारा फटाका असोसिएशचा ‘स्वदेशी’चा एल्गार

ban-chinaतभा प्रतिनिधी
सातारा, [दि. २४ ऑक्टोबर] – ‘राष्ट्रभक्तांचा एकच नारा, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालाफ या तरुण भारत ने घेतलेल्या भूमिकेेचे समर्थन करत येथील सातारा फटाका असोसिएशनने चिनी फटाक्याची विक्री न करण्याचे धोरण अवलंबले असून त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर सुमारे ४०-४५ फटाका स्टॉल थाटण्यात आले असून यातील एकाही स्टॉलवर चिनी बनावटीचे फटाके विकले जात नाहीत.
पाकिस्तान आणि त्याचा मित्र असलेल्या चीनने भारताविरुद्ध जे छुपे युद्ध पुकारले आहे त्याचा सर्वच थरातून निषेध होत आहे. दीपावलीला काही दिवसांचाच अवधी राहिल्याने यंदाही भारतातील सर्वात मोठ्या सणाचे मार्केटिंग करण्याचे चीनचे धोरण या भूमिकेने हाणून पाडले आहे. काही वर्षापासून चिनी फटाक्यांनी भारताची मोठी बाजारपेठ काबीज केल्याचे चित्र होते.
येथील सातारा फटाका असोसिएशनने यावर्षीपासून चिनी बनावटीचे फटाके न विकण्याचा उपक्रम राबवला आहे. सातारा फटाका असोसिएनचे सुमारे ४० सदस्य आहेत. त्यांनी एकत्र येत उभारलेल्या एकाही स्टॉलवर चिनी बनावटीचे फटाके विकले जात नाहीत.
चिनी बनावटीच्या फटाक्यांबाबत अधिक माहिती घेतली असता, हे फटाके अत्यंत हलक्या प्रतीचे, प्रदूषण वाढवणारे, घातक रसायनांचा वापर केलेले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच हा माल थेट परदेशातून येत असल्याने माल खराब निघाल्यास जबाबदारी घेणारे कोणीही नसल्याने अनेकांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचेही सांगितले. या पार्श्‍वभूमिवर ‘तरुण भारत’ ने घेतलेले चीनी मालावरील बहिष्काराबाबत जनजागृती करण्यासाठी उचलेल्या पावलांचे आणि स्वदेशीच्या भूमिकेचे अनेकांनी यावेळी कौतुक केले. आणि याच भूमिकेचे समर्थन करत आम्हीही यंदापासून चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली असल्याचे सांगितले.
शिवकाशीची चिनी बनवाबनवी
तामिळनाडू राज्यातील शिवकाशी ही भारतातील फटाके तयार करण्याची फॅक्टरी आहे. याठिकाणी तयार होणारे बहुतांशी फटाके भारतात वितरीत होतात. येथीलच काही कंपन्यांनी चिनी बनावटीच्या फटाक्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून डुप्लीकेट उत्पादने करण्यास सुरुवात केली आहे. अगदी चिनी बनावटीच्या फटाक्यांच्या पॅकींगसारखेच पॅकींग तयार करायचे मात्र, आतील माल भारतीय बनावटीचा अशी बनवाबनवी करणार्‍याही काही कंपन्या शिवकाशी येथे आहेत.
‘गँगवेल’ नावाची मूळची शिवकाशी येथील कंपनी चिनी बनावटीचे डुप्लीकेट फटाके बनवण्यात माहिर असल्याचे एका फटाका विक्रेत्याने सांगितले.
‘तरुण भारत’च्या भूमिकेचे समर्थन : दीपक शिंदे
सातारा शहरात फटाका विक्री करणारांची सातारा फटाका असोसिएशन नावाची संघटना गेली सात वर्षे कार्यरत आहे. शहरातील सुमारे ४० फटाका विक्रेते त्यांचे सदस्य आहेत. काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात येणारे स्टॉल गत आता येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर उभारण्यात येतात. सुमारे ४० फटाका विक्रीचे स्टॉल एकत्र असल्याने दुर्घटना होवू नये यासाठी फटाका विक्रेत्यांनी एकत्र येवून संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही जागा मिळवली आहे. याठिकाणी अत्यंत सुरक्षित मोकळ्या जागेत स्टॉल उभारण्यात येतात. याठिकाणी चोवीस तास अग्निशामक दलाचा बंब उपस्थित असतो. विशेष म्हणजे विजेची व्यवस्थाही जनरेटरच्या माध्यमातून केली जाते. सकाळी ७ ते रात्री १०.३० पर्यंतच येथे फटाक्यांची विक्री केली जाते. अत्यंत काटेकोरपणे शासकीय नियम पाळूनच ही फटाका विक्री होत असल्याचे फटाका असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.
नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद: इंगवले
चिनी बनावटीच्या वस्तू खरेदीला आता नागरिकांकडून नकार येत असल्याचे दिसून येत असून फटाके खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडूनही चिनी बनावटीचे फटाके नको, भारतीय बनावटीचे फटाके द्या अशी मागणी होत असल्याचे इंगवले फटाका स्टॉलचे विशाल इंगवले यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 25 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in प.महाराष्ट्र (28 of 36 articles)

  phaltan_map
  विशेष प्रतिनिधी फलटण, [दि. २४ ऑक्टोबर] - विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एकहाती सत्तेला शह देण्याच्या जोरदार हालचाली ...