Home » प.महाराष्ट्र » ४०-० नाही केले तर खासदारकीचा राजीनामा देईन

४०-० नाही केले तर खासदारकीचा राजीनामा देईन

=दिवाळीच्या मुहुर्तावर मनोमिलनाचे फटाके=
udayanraje-bhosale3तभा वृत्तसेवा
सातारा, [दि. २९ ऑक्टोबर] – निवडणुका आल्या की, त्याच लोकांना संधी द्यायची. सर्वसामान्य लोकांनी मोठं व्हायचं नाही का? का मीच पाहिजे खासदार, आमदार, अध्यक्ष असं कुठ होतं का? लोकांनी आम्हाला निवडून दिल आहे. त्यांच्यासाठी काही मागीतल हे आमच चुकल का? एकचं सांगतो कोणी काहीही म्हणो या सातारा निवडणुकीत ४० शुन्य करून पुन्हा इतिहास घडविणार आहे. असे जर झाले नाहीतर खासदारकीचा राजीनामा देईन, असा विश्वास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सातारा विकास आघाडीच्या ४० उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी खा. उदयनराजे भोसले मिरवणुकीने पालिकेत आले होते. अर्ज दाखल करून झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी आडमुठेपणा केला असता तर २२ महिने जेलमध्ये बसावे लागले नसते. हे कोणामुळे घडलं हे जनतेला सर्वश्रुत आहे. मी आमच्या काकांवर नितांत प्रेम करतो. ते सुध्दा वेदांतिकाराजे यांचे नाव न घेता त्यांचा अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरायला आहेत. त्यांना डावलून मी निर्णय घेतला आहे. तत्व तत्व असतं, वाटेल त्या परिस्थितीत मोडीन पण तत्वाशी तडजोड करणार नाही. कोणाला उमेदवारी अर्ज भरायचे ते भरून द्या. असे लुंगेसुंग्यांना विचारत नाही. एवढी जर टोकाची भूमिका घ्यायची असेल तर विचार करा मी १७ लाख मतदारांमध्ये खेळतो. आमदार फक्त अडीच लाख मताचे आहेत, याचे गणित करा.
दोघांमधील संघर्षाचे नेमके कारण काय यावर छेडले असता खा. उदयनराजे म्हणाले संघर्ष हा बरोबरींच्या लोकांच्याबरोबर केला जातो. राजघराणं हे राजघराणं आहे. पाच वर्षात आपण कामांचे कसे मूल्यमापन करणार असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर वेळ पुरणार नाही. आमचे लाडके बंधूराज आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक कुठली योजना आणली त्यांनी सांगावे असे सांगूण खा. उदयनराजे म्हणाले, माझा दृष्टीकोन व्यापक असतो, मी संकुचित बुध्दीचा नाही. पालिकेत भ्रष्टाचार कोणी केला मला माहीत नाही. याचं उत्तर जनता मतपेटीतून देईल यावर अधिक बोलून मला माझी उंची कमी करायची नाही. देवा शपथ सांगतो, ‘विष यू ऑल दी बेस्ट’ सातारकरांना एकच सांगतो, जे केलं त्याची पोचपावती नाही मिळाली तसेच नगराध्यक्षांना मतदान झाले नाही तर अनर्थ होईल.
मनोमिलनात खडा पडला काय असा विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, खडा कुठे पडला, मनोमिलन आहे.
पण तत्वाशी अजिबात नाही. मी स्वत: उमेदवार असलो तरी तडजोड करीत नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजघराणं दुभांगलं या प्रश्नाला उत्तर देताना खा. उदयनराजे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चा ही संस्कृती आहे. सातार्यात पुन्हा एकदा ग्लोबेल नितीचे वारे वाहू लागलं आहे. ग्लोबेल वैगेरे असं काही नाही परिस्थिती सर्व काही सांगेल. शत्रुचा शत्रु म्हणजे माझा मित्र असा माणनार्यांपैकी मी नाही. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. ङ्गकाय बाय सांगू कसंगं सांगू, मलाच माझी वाटे लाजफ अशी अवस्था झाली आहे. ङ्गएक बार मैने कमेंटमेंट करदी तो मै खुदकी भी नही सुनताफ अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रया व्यक्त केली.पालिका निवडणुकीत पुन्हा ४० शून्य झाले नाहीतर खासदारकीचा राजीनामा देईन: खा. उदयनराजे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in प.महाराष्ट्र (19 of 36 articles)

  vedantika-raje-bhosle
  तभा वृत्तसेवा सातारा, [दि. २९ ऑक्टोबर] - निवडणुकीत कुठलाही एक नागरीक त्याच्या एका मतावर ठरवू शकत नाही. कोण जिंकणार आणि ...