ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » महाराष्ट्र » अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

तभा वृत्तसेवा
मुंबई, २४ ऑगस्ट –

Vijay Chavan

Vijay Chavan

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने आज शुक्रवारी सकाळी निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. श्‍वसनासंबंधीच्या तक्रारीनंतर बुधवारी २२ ऑगस्टला चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चव्हाण यांच्यावर मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा वरदने पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत महेश कोठारे, अंकुश चौधरी, अलका कुबल, सुशांत शेलार, भरत जाधव यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित राहून आपल्या सहकलाकाराला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबाग येथे झाला. दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, चव्हाण यांनी रुपारेल कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले.
शेवटची इच्छा अधुरी : विजय चव्हाण यांचा मुलगा वरद अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. वरदचा विवाह डिसेंबरला २०१८ ला होणार होता. आपल्या मुलाचे लग्न पाहण्याची विजय चव्हाण यांची शेवटची इच्छा होती; ती अधुरीच राहिली. वरदने अनेक मालिकांमधून काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कारकीर्द : विजय चव्हाण, विजय कदम यांनी मिळून रंगतरंग नावाची नाट्यसंस्था सुरू केली. यामाध्यमातून त्यांची ओळख लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी झाली आणि तिथून चव्हाण यांचा नाट्यप्रवास सुरू झाला. त्यांनी हयवदन या नाटकातून नाट्यक्षेत्रात पदार्पन केले. त्यांचा या नाटकातील अभिनय पाहून सुधीर भट यांनी मोरूची मावशी नाटकासाठी चव्हाण यांना घेतले. या नाटकाने इतिहास घडवला आणि तिथून चव्हाण यांच्या कारकीर्दीलाही दिशा मिळाली. त्यानंतर चव्हाण यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.
मोरूची मावशी, तू तू मी मी, श्रीमंत दामोदर पंत, टुरटुर यासारखी बरीच त्यांची नाटके प्रचंड गाजली. त्यानंतर चव्हाण यांनी १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून. नुकतेच त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत ३५०-४०० चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत.
रंगभूमी समृद्ध करणारा अभिनेता : मुख्यमंत्री
प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या अलिकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात चव्हाण यांनी बहुमूल्य योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
अशोक सराफ : विजय चव्हाण यांच्या जाण्याने माझे व्यक्तिगत नुकसान झाले आहे. एक हरहुन्नरी नट आज आपल्यातून निघून गेला. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची मावशीची भूमिका अजरामर आहे. अशा शब्दात ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विनोद तावडे : गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळ मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला आहे अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विजय चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.

Posted by : | on : 25 Aug 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (194 of 460 articles)


कोल्हापूर, २३ ऑगस्ट - कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न ...

×