ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » महाराष्ट्र » आम्हीच देऊ टिकाऊ मराठा आरक्षण

आम्हीच देऊ टिकाऊ मराठा आरक्षण

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही,
मुंबई, ३१ जुलै –

Devendra Fadanvis Chandrakant Patil

Devendra Fadanvis Chandrakant Patil

मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण फक्त भारतीय जनता पार्टीचेच सरकार देऊ शकेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.
पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
हे आरक्षण द्यावे म्हणून आमच्या सरकारनेच कायदा केला. पण, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मराठा समजाच्या मागासलेपणाचा अहवाल करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोग करत आहे. हा अहवाल लवकरात द्यावा अशी विनंती आयोगाला करण्यात आली आहे. हा अहवाल येताच विधिमंडळाचे अधिवेशन बोलावून त्याला संवैधानिक स्वरूप दिले जाईल. यासाठी अध्यादेश काढला तर तो टिकणार नाही. भावनेच्या भरात गेल्यास फक्त आक्रोश निर्माण होईल. अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. त्यामुळे विवेकी बुद्धीने शेवटच्या माणसापर्यंत शांतता कशी राहील हे पाहणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्मारकाची उंची आहे तेव्हढीच
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. महाराजांची उंचीच इतकी मोठी आहे की, त्यांचे स्मारक कितीही मोठे केले तरी ते स्मारक छत्रपतींची उंची गाठू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तयार करण्यात येत असून, या स्मारकाची उंची कमी करण्यात आलेली नाही. काही जण तसा गैरसमज पसरवत आहेत. हे स्मारक तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवाने राज्य शासनाने यापूर्वीच मिळविल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आरक्षणाबाबतची भूमिका छत्रपती शाहू महाराजांची
समाजामध्ये राहत असलेल्या सर्व घटकांपर्यंत सुविधा पोहोचणे आवश्यक आहे. समाजामध्ये मागे असलेल्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. सामाजिक दरी मिटविण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याची भूमिका प्रथमत: छत्रपती शाहू महाराजांनी मांडली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्यकारभार केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या या प्रेरणादायी कामाची महती आजच्या युगात आपणाला अनुभवायची असेल तर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतील अनेक महत्त्वांच्या घटनांचे साक्षीदार असणारी कागदपत्रे यांचाही समावेश आहे. महत्त्वाची कागदपत्रे, निवडक भाषणे हे सर्व ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या प्रकाशनातून प्रकाशित करण्यात येत असल्याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राम कदम, समरजितसिंह घाटगे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे आदी उपस्थित होते.

Posted by : | on : 1 Aug 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (194 of 442 articles)


आरपारची भूमिका, मुंबई, ३१ जुलै - एकवेळ शिवसेना स्वबळावर सत्तेत आली नाही तरी चालेल; पण कुठल्याही परिस्थितीत भाजपा सत्तेत नको, ...

×