ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » महाराष्ट्र » एमपीएससीच्या ८३३ उमेदवारांचे भंगले स्वप्न

एमपीएससीच्या ८३३ उमेदवारांचे भंगले स्वप्न

►उच्च न्यायालयाने निवडप्रक्रियाच केली रद्द
►दोन वर्षांचे परिश्रम पाण्यात,
पंढरपूर, ३ ऑक्टोबर –

Mpsc

Mpsc

राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे एमपीएससी परीक्षेमध्ये पास झालेल्या ८०० हून अधिक उमेदवारांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला आहे. राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्या वर्षी घेतलेल्या परिवहन निरीक्षक पदाच्या निवडी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ८३३ यशस्वी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.
राज्यातील परिवहन विभागात उच्चशिक्षित तरुणांनी यावे, यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये परिपत्रक काढून परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल केल्या होत्या. त्याबाबतची माहिती राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना देण्यात आली होती. त्यानुसार २९ जानेवारी २०१७ रोजी या परीक्षेची जाहिरात देखील आली. तब्बल चार वर्षांनी आरटीओ परीक्षेची जाहिरात आल्याने राज्यातील ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत यातील १० हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. यानंतर हे तरुण नोकर्‍या सोडून या अंतिम परीक्षेच्या अभ्यासाला लागले.
मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात आली आणि याचा निकाल ३१ मार्च २०१८ रोजी लागला. परीक्षा दिलेल्या १० हजार विद्यार्थ्यांतून ८३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांना निवडीचे पत्रही देण्यात आले. निवडीची पत्र मिळाल्याने गावोगावी यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे रंगले. तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांतून निवड होत, आरटीओची सरकारी नोकरी पक्की झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
याच काळात १४ जून २०१८ रोजी या मुलांना कागदपत्रे तपासणीसाठी येण्याबाबत कळविण्यात आले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी कागदपत्रे घेऊन जाणार, तेवढ्यात त्यांना या निवडीवर न्यायालयाकडून स्थगिती आल्याने, निवड प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे पत्र आले.
यानंतर आता थेट नागपूर खंडपीठाने ही निवड प्रक्रियाच रद्द ठरवल्याने, या तरुणांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दोन वर्षे नोकर्‍या सोडून आणि रात्रंदिवस अभ्यास करून घडविलेले भविष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना तरुणांची आहे. यामागे राज्य सरकारचा गलथानपणा असल्यानेच न्यायालयाने विरोधात निकाल दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
याची सुरुवात परीक्षेच्या अटी शिथिल करून राज्य सरकारानेच केली होती. परीक्षेसाठी उमेदवाराला जड वाहनाचे लायसन्स आणि गॅरेजचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक होता. मात्र, राज्य सरकारने ती अट शिथिल केली. इतकेच नव्हे तर, निवड झाल्यानंतर परिविक्षाधीन काळात या अटी पूर्ण करून घेण्याच्या सवलती दिल्या होत्या.
त्यानुसार या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, मात्र, केंद्राचे नियम राज्याला शिथिल करता येत नाहीत, यासह अन्य मुद्यांवरून राजेश फाटे या तरुणाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
यावर सरकारी पक्षाकडून योग्य बाजू न मांडली गेल्यानेच हा निकाल न्यायालयात विरोधात गेल्याचा आरोप आता हे विद्यार्थी करीत आहेत. निदान आता तरी सर्वोच्च न्यायालयात सरकारने चांगल्या रीतीने बाजू मांडून, आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रियांका माने या विद्यार्थिनीने केली आहे.
सरकारी खर्चाने परिविक्षाधीन काळात अवजड वाहनाचे परवाने आणि गॅरेजचा अनुभव घेऊ, न्यायालयाची हरकत असल्यास आम्ही या अटींची पूर्तता करेपर्यंत विनावेतन काम करण्यास तयार आहोत, असे अमोल नागणे यांनी म्हटले आहे.
दोन वर्षे जीवापाड अभ्यास करून मिळविलेले यश असे रद्द करणे योग्य नसून, आता सरकारनेच आपली चूक सर्वोच्च न्यायालयात सुधारून या ८३३ विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी हे विद्यार्थी करीत आहेत.
सध्या हातात निवडीची पत्रे आहेत; पण नोकरी नाही, जुन्या नोकर्‍या सोडल्याने उपासमारीची वेळ आली आहे, अशातच जाहीर सत्कार घेऊन आता पुन्हा बेकार झाल्याची भावना मनात येऊ लागल्याने, समाजात मिसळण्याची भीती आता या तरुणांना वाटू लागली आहे.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (9 of 372 articles)

Sim Card
कंपन्यांकडून रिटेलर्सला सूचनाच नाहीत, मुंबई, १ ऑक्टोबर - ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी खाजगी कंपन्यांनी बारा आकडी आधार क्रमांकाचा वापर करू नये, ...

×