ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » महाराष्ट्र, सोलापूर » जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

►मुख्यमंत्र्यांनी घरीच केली विठ्ठलाची पूजा,
विलास दि. कुळकर्णी
मुंबई/पंढरपूर, २३ जुलै –

Ashadhi Puja

Ashadhi Puja

आज सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली. महापूजा सुमारे एक तास चालली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत यंदा शासकीय महापूजेचा मान दर्शनबारीतील अनिल जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा जाधव यांना मिळाला. पंढरपूरच्या इतिहासात एखाद्या वारकरी दाम्पत्याच्या हातून विठ्ठलाची महापूजा होण्याची ही पहिलीच घटना होय. या दाम्पत्याच्या हातून माता रुक्मिणीचीही महापूजा करण्यात आली.
पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरू असताना, तिकडे मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाची सपत्नी पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. याच अनुषंगाने पंढरपुरातील यात्रे कोणतेही विघ्न येऊ नये आणि वारकरी अडचणीत येऊ नये, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर पंढरपूरला माझ्याऐवजी महापूजेचा मान दर्शनबारीतील प्रथम मानकरी दाम्पत्याला देण्यात यावा, असा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे महापूजेचा मान जाधव दाम्पत्याला मिळाला. या महापूजेच्या वेळी शासनातर्फे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते. जाधव दाम्पत्य हिंगोली जिल्ह्याच्या शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत. अनिल जाधव यांचे वारी करण्याचे चौथे वर्ष आहे, तर त्यांच्या पत्नी वर्षा यांचे पहिलेच वर्ष आहे. शेतकर्‍याच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा, असे साकडे आपण विठ्ठलाकडे घातल्याच जाधव दाम्पत्याने सांगितले.
अवघा झाला आनंद
पंढरपुरात सर्वत्र वारकरी आणि वारकरीच दिसून येत आहेत. हे वृत्त लिहिस्तो कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही. पावसाची हुलकावणी आहेच. या लाखो वारकर्‍यांमध्ये एक प्रकारचा कौटुंबिक जिव्हाळा (पान ७ वर)४
निर्माण झालेला असतो. ते एकमेकांना सांभाळून घेत असतात. यंदा पंढरपुरात विक्रमी म्हणजे १२ लाख वारकरी आल्याची माहिती आहे. वारकर्‍यांचे विराट रुपय येथे बघायला मिळाले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर विठ्ठल भेटीचा आनंद दिसत होता.
पांडुरंगाचे दर्शन घेण्यास २२ ते २४ तास लागत आहेत. विठ्ठलाच्या मंदिरापासून सुरू होणार्‍या दर्शन रांगेची लांबी जवळपास १० किमी आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी तीन प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. पददर्शन, मुखदर्शन आणि ऑनलाईन दर्शन.
चंद्रभागेत पवित्र स्नान
वारकरी आज पहाटेपासूनच चंद्रभागेत पवित्र स्थान करून विठुरायाचे व रुखमाईचे दर्शन करून नंतर नगरप्रदक्षिणा घालत होते. विठ्ठलाच्या दर्शनाआधी नामदेवाच्या पायरीवर डोके टेकवत होते. काही वारकरी तर विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन घराकडे परतू लागले होते. पालख्यांसोबत आलेले वारकरी २४, २५ व २६ असा तीन दिवसांचा पंढरपुरी मुक्काम करून शुक्रवार, २७ जुलैला ज्ञानेश्‍वर माऊलीच्या पादुकांना चंद्रभागा नदीत स्नान, त्याानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपालकाला व नंतर परतीचा प्रवास करणार आहेत. परतताना वारकरी म्हणणार…
हेचि व्हावी माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास॥
पंढरीचा वारकरी।
वारी चुको नेदी हरि॥
रोषणाईने उजाळले मंदिर
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुखमाईच्या मंदिराला विशेष रोषणाई करण्यात आली होती. यामुळे परिसर अक्षरश: उजळून निघाला होता. अगदी दूरवरून ही रोषणाई दिसत होती.

Posted by : | on : 24 Jul 2018
Filed under : महाराष्ट्र, सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र, सोलापूर (227 of 460 articles)


समाजाचा विरोध ►•१० लाख वारकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न, सोलापूर, २२ जुलै - आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन करीत असलेल्या मराठा समाजाने, या ...

×