ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

पुणे, ९ नोव्हेंबर –

Lalan Sarang

Lalan Sarang

आपल्या बहारदार अभिनयाने सुमारे पाच दशक प्रेक्षकांवर राज्य करणार्‍या आणि आपल्या अभिनयाचा आगळावेगळा ठसा उमटविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. लालन सारंग यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
आज सकाळी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. याच रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. लालन सारंग या १९६८ पासून नाट्यक्षेत्रात काम करत होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी केलेल्या ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील चंपा, ‘सहज जिंकी मना’ नाटकातील मुक्ता, ‘आक्रोश’ नाटकाली वनिता, ‘आरोप’ नाटकातील मोहिनी इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या.
लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात झाला. लालन सारंग यांना रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया, मोरूची मावशी, उद्याचा संसार आदी नाटकांचा यात समावेश होता. विजय तेंडूलकर यांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली. रथचक्र, कमला, गिधाडे, जंगली कबुतर, खोल खोल पाणी, घरटे आपुले छान, बेबी, सूर्यास्त, कालचक्र आदी नाटकातल्या भूमिका गाजल्या. सामना, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटांत तसेच रथचक्र या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भूमिकांमधून त्यांनी केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता. लालन सारंग यांनी २००२ मध्ये तब्बल एका तपानंतर जयवंत दळवी लिखित ‘कालचक्र’ या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केले होते.
नाटकांमागील नाट्य, मी आणि माझ्या भूमिका, जगले जशी, बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती आदी पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. लालन सारंग यांचा ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या ‘गृहिणी सखी सचिव’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. याशिवाय पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.
कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्त्व गमावले : मुख्यमंत्री
मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनाने कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्व गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, लालन सारंग यांचा रंगभूमीवरचा समर्थ वावर कायम प्रयोगशीलता जपणारा होता. प्रवाहाच्या विरुद्ध असलेल्या भूमिका साकारण्याचे आव्हान पेलण्याचे धाडस दाखवताना त्यांनी आपली अभिनयक्षमताही सिद्ध केली. यामुळे त्यांची कारकीर्द एक अमीट ठसा उमटवणारी ठरली. सखाराम बाईंडर मधील त्यांची भूमिका रसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. जवळपास पाच दशकांचा त्यांचा कलाप्रवास हा मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारा ठरला असून, त्यांच्या निधनाने आपण एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (135 of 461 articles)

Devendra Fadnavis
६ नोव्हेंबर - यावर्षी मान्सूनच्या लहरीपणामुळे राज्यातील अनेक भागात कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात ...

×