हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » महाराष्ट्र » दोन्ही महापालिकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

दोन्ही महापालिकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

सांगलीत काँग्रेस-राकाँला, जळगावात सुरेशदादांना झटका,
वृत्तसंस्था
जळगाव/सांगली, ३ ऑगस्ट –

Bjp Flag

Bjp Flag

सांगली आणि जळगाव (खान्देश) या दोन महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले असून, सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे. जळगाव खान्देश महापालिकेत गेली ३४ वर्षे शिवसेनेचे आजी आमदार आणि खान्देश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांचे साम्राज्य खालसा झाले आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून असंतोष पसरवत भाजपाला पराभूत करण्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कारस्थानही सूज्ञ मतदारांनी उधळून लावले आहे. सांगली हा तसा काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड. पण, भाजपाने सुरुंग लावत हा गड उद्ध्वस्त केला आहे. पुढील वर्षी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीचा दोन्ही महापालिकांत दणदणीत पराभव करून भाजपाने सर्व पक्षांनाच योग्य ते संकेत दिले आहेत.
मराठा आरक्षण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी असे मुद्दे उपस्थित करून भाजपाविरुद्ध असंतोष पसरविण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही भाजपाला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. असे असतानाही जळगावता भाजपाने शिवसेनेला धूळ चारली, तर सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला. जळगावच्या महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीला तर भोपळाही फोडता आलेला नाही. यावरून या दोन पक्षांची पुढल्या वर्षीच्या निवडणुकीत काय अवस्था होणार, हेही स्पष्ट झाले आहे.
जळगाव महापालिकेत तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपाने सगळ्या विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. जळगावात भाजपाला ७५ पैकी ५७, तर शिवसेनेला १५ व एमआयएमला ३ जागा मिळाल्या आहेत.
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विश्‍वजित कदम आणि सतेज पाटलांसारखे दिग्गज नेते भाजपाविरुद्ध एकत्र आले होते. या सगळ्यांना पाणी पाजत स्वबळावर लढलेल्या भाजपाने ७८ पैकी ४१ जागा जिंकत सत्ता खेचून आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सांगली महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी यंदा राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. पण, भाजपाने एकट्याने लढत या आघाडीला पराभूत करत जनतेत भाजपाविरुद्ध कुठलाही असंतोष नाही, हे मतपेटीतून दाखवून दिले आहे.
विकास नावालाही नव्हता
गेल्या वेळी तुरुंगातून निवडणूक जिंकणारे सुरेश जैन यांना जळगावकरांनी हद्दपार करण्याची अनेक कारणे आहेत. जैन यांच्या काळात केवळ हुडकोचेच कर्ज ७०० कोटीच्या घरात पोहोचले होते, कचर्‍याच्या प्रश्‍नाने गंभीर स्वरूप धारण केले, अतिक्रमणांनी रस्ते अरुंद होत गेले. शहरात सर्वत्र खड्ड्यांचेच साम्राज्य होते. सत्तेत वाटेकरी राहिलेले मनसेचे नगरसेवक आणि महापौर ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यातच घरकुल घोटाळ्यामुळे भ्रष्टाचारी नेता म्हणून झालेली प्रतिमा जैन यांना पुसता आली नाही.
सांगलीत प्रस्थापितांना झटका
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून, भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ७८ सदस्यीय सांगली महापालिकेत भाजपाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने २० आणि काँग्रेसने १५ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत ४५१ उमेदवार रिंगणात होते. सांगलीचा गड राखण्याचा काँग्रेसने भरपूर प्रयत्न केला, पण काँगे्रसच्या पराभवाचा ठाम निर्धारच भाजपाने केला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. मात्र भाजपने आघाडीवर मात केली.
चुकांचा भाजपाला फायदा
रस्ते, पाणी आणि आरोग्य या येथील सर्वात मोठ्या समस्या होत्या, ज्या १५ वर्षांच्या सत्तेतही आघाडीने सोडवल्या नव्हत्या. गडर लाईन योजना पूर्ण करण्याच्या नावाखाली पालिकेने संपूर्ण सांगलीच खोदून ठेवली. गैरसोय झाल्याने नागरिकांचा असंतोष उफाळला होता. खड्ड्यांमधून रस्ता शोधणार्‍या सांगलीकरांना मुख्यमंत्र्यांनी ३३ कोटींचे रस्ते दिले, मिरजला २० कोटींचे रस्ते बांधले, याचा भाजपला फायदा झाला.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन
जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील ऐतिहासिक विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे उत्कृष्ट नेतृत्व, तसेच भाजपा कार्यकर्ते, मंत्री, खासदार, आमदार यांच्या अथक परिश्रमामुळेच साध्य झाला आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन!
आत्मचिंतन करू : सुरेश जैन
जळगाववासीयांचा कौल मला मान्य आहे. पराभवाची जबाबदारी मी स्वत:वर घेत आहे. आता आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दिली.
सांगली महापालिका पक्षनिहाय स्थिती
एकूण – ७८
भाजपा – ४१
काँग्रेस – १५
राष्ट्रवादी- २०
इतर – २

जळगाव महापालिका पक्षनिहाय स्थिती
एकूण – ७५
भाजपा – ५७
शिवसेना – १५
एमआयएम – ३

Posted by : | on : Aug 4 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (13 of 436 articles)

Devendra Fadanvis2
►हिंसाचार सोडण्याचे मान्यवरांचे आवाहन, मुंबई, २ ऑगस्ट - [caption id="attachment_59066" align="alignleft" width="300"] Devendra Fadanvis2[/caption] मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक ...

×