ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » महाराष्ट्र » नाणारवरील चर्चेसाठी सेना सदस्यांचा गदारोळ

नाणारवरील चर्चेसाठी सेना सदस्यांचा गदारोळ

►नीतेश राणेंसह तीन आमदारांनी पळविला राजदंड
►कामकाज चार वेळा तहकूब,
तभा वृत्तसेवा
नागपूर, ११ जुलै –
नाणार प्रकरणावरून शिवसेना-भाजपा सदस्यांमधील मतभेद तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मुस्कटदाबीला गोंधळाने उत्तर देऊन बदला काढण्याची भूमिका सकाळपासूनच व्यक्त होत होती. याप्रकरणी शिवसेनेला आपले मत मांडण्याची संधीच मुख्यमंत्री देत नव्हते. त्याचा वचपा आज शिवसेना आमदारांनी काढला आणि सत्ताधार्‍यांनी राजदंड पळविल्याची घटना विधानसभेत घडली व गोंधळामुळे चारवेळा तहकूब करावे लागलेले कामकाज या प्रकारामुळे अखेर गुरुवार सकाळपर्यंत तहकूब करावे लागले.
नाणार प्रकल्पावरील चर्चा अगोदर घ्या व नंतर कामकाज करू, या भूमिकेवर अढळ असलेल्या सेना आमदारांनी दुपारी विधानसभेत चर्चेच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अध्यक्ष आपल्या भूमिकेवर ठाम होते व ते निर्धारित वेळेत यासंदर्भात चर्चा घडवून आणणार होते. यात आपला संयम कायम न ठेवता सेना आमदारांना लगेच चर्चा हवी होती.
त्यात अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. अखेर सेना आमदारांनी आसनावरून उठून अध्यक्षांच्या आसनापर्यंत घोषणा देत मोर्चा काढला. त्यात आमदार नीतेश राणे यांनी वेलमध्ये धाव घेतली. त्यांच्यासोबत राजन साळवी, प्रताप सरनाईकदेखील आत गेले. त्यांच्या मेजावरील राजदंड उचलून तो पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांच्या दिमतीला असलेल्या पट्टेवाल्यांनी संपूर्ण ताकदीने हा प्रकार हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ झटापट झाल्यानंतर नीतेश राणे यांच्या हातातील राजदंड हस्तगत करण्यात आला आणि अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज गुरुवार सकळापर्यंत तहकूब केले. या प्रकारात वयस्कर पट्टेवाल्याला किरकोळ दुखापत झाल्याची चर्चा होती.
नाणार प्रकल्पाविषयी भूमिका मांडू द्या, या मागणीसाठी विधानसभेतील शिवसेना सदस्य आज सकाळपासूनच प्रयत्नशील होते. त्याचदरम्यान अध्यक्षांनी सकाळी विविध विषयांवरील चर्चा तसेच मंगळवारी झालेल्या नियम २९३ वरील प्रस्तावावर शासनाचे निवेदन तसेच प्रश्‍नोत्तरांचा तास असे कामकाज करून घेतले व त्यानंतर नाणारवरील चर्चेला प्रारंभ करू, असे सांगितले. पण, ही बाब सेना आमदारांना रुचली नाही.
विधानसभेचे कामकाज आज सकाळी ९.३० वा. प्रारंभ झाले. त्यात नियम २९३ वरील चर्चा प्रथम घेण्यात आली. ही चर्चा काल अर्धवट राहिली होती आणि यावरील उत्तर तसेच उर्वरित सदस्यांची चर्चा आज घ्यायची, असा निर्णय अध्यक्षांनी मंगळवारी दिला होता. त्यानुसार आज सकाळी चर्चेला प्रारंभ झाला. विरोधी पक्षनेते विखे पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. त्यानंतर प्रश्‍नोत्तरांचा तास सुरू झाला आणि त्यातही वारंवार या चर्चेवरून सदस्य आपल्या भावना मांडत होते आणि अध्यक्ष त्यांना थांबवित होते.
शिवसेनेतर्फे असंतोष व्यक्त
कोकणात नाणारमध्ये रिफायनरी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. यासंदर्भात जारी झालेली अधिसूचना रद्द करण्याची घोषणा सुभाष देसाईंनी केली. परंतु तत्काळ मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योगमंत्र्यांना नाही, असे सांगितले. बुधवारी विधान परिषदेतही नाणारवर लक्षवेधी सूचना असताना उद्योगमंत्री सुभाष देसाईंना उत्तर देऊ दिले नाही व मुख्यमंत्र्यांनी स्वतःच या लक्षवेधीला उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावरून शिवसेनेची नस वारंवार दाबली होती. यामुळे शिवसेना सदस्यांमध्ये असंतोष होता. विधानभवन परिसरात आज सकाळपासूनच शिवसेना सदस्य नाणारवरून गोंधळ घालण्याची भाषा करीत होते. प्रश्‍नोत्तरांचा तास संपल्यानंतर शिवसेना सदस्य उभे राहून बोलू लागले.

Posted by : | on : 12 Jul 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (111 of 397 articles)


दिवसात निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, वृत्तसंस्था नागपूर, ९ जुलै - महाराष्ट्राचे दूधविषयक धोरण अद्यापही निश्‍चित नाही. राज्यभरात या मुद्यावर शेतकरी ...

×