ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » परफ्यूमने केला ‘अवनी’चा घात

परफ्यूमने केला ‘अवनी’चा घात

►बोराटीच्या जंगलात नरभक्षी वाघिणीला टिपले,
यवतमाळ, ३ नोव्हेंबर –

Tigress Avani

Tigress Avani

एक दोन नव्हे तर चौदा जणांचा बळी घेणारी नरभक्षी वाघीण ‘अवनी’ला अखेर बोराटीच्या जंगलात ठार मारण्यात वनविभागाला यश आले. महाराजबागेतील वाघिणीचे मूत्र आणि ‘केल्विन क्लेन’ या परफ्यूमच्या साह्याने तिला सापळ्याकडे आकृष्ट करणे शक्य झाले.
राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी जंगलातील कंपार्टमेंट १४९ मध्ये वाघीण आणि वन विभागाचा आमनासामना झाला. तिला जिवंत पकडण्याचे वनविभागाने कसोशीने प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारवाईत ती अधिकच आक्रमक होत अंगावर चालून आल्याने वाडघोटा नाल्याच्या पुलाजवळ शार्पशूटर नवाब शपथअली खान यांच्या अजगरअली खान नामक मुलाने तिच्या डोक्यात गोळ्या घालून शुक्रवार, २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तिला ठार केले.
विशेष म्हणजे ज्या जंगल परिसरात या वाघिणीने पहिली मानवी शिकार केली त्याच जंगलात तिला ठार करण्यात आले.
या वाघिणीने वनविभागाला चांगलेच जेरीस आणले होते. गेल्या दोन महिन्यांपासून २०० हून अधिक वनकर्मचारी व अधिकारी या वाघिणीच्या मागावर होते. याशिवाय हैदराबाद येथून शार्पशूटर नवाब शपथअली खान, इटालियन शिकारी श्‍वान, पॅराग्लायडर यासह वनविभागाचे हत्ती एवढा मोठा लवाजमा वाघिणीच्या शोधमोहिमेत सहभागी झाला होता.
मात्र, प्रत्येक वेळेस जंगलात वाढलेल्या झुडपांचा आणि गवताचा आधार घेत या वाघिणीने सर्वांना चकमा दिला. अखेर बोराटीच्या जंगलात तिचा वावर असल्याचे पाहून वनविभागाने महाराजबागेतील वाघिणीचे मूत्र या परिसरात शिंपडले. सोबत नामवंत ‘केल्विन क्लेन’ या परफ्यूमचाही उपयोग करण्यात आला. या वासाचा मागोवा घेत ही वाघीण वनविभागाच्या टप्प्यात आली आणि शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास तिला टिपण्यात यश आले.
‘अवनी’ या नावाने ओळखली जाणारी ही नरभक्षी वाघीण ठार करण्यात आल्याची माहिती वनविभागाने गुप्त ठेवली होती. वन अधिकार्‍यांव्यतिरिक्त कोणालाही या परिसरात जाता येत नव्हते. पहाटेपर्यंत पंचनामा करून शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ४.३० वाजता मृत वाघिणीला नागपूर येथे पाठविण्यात आले.
वादग्रस्त शूटरमुळे उलटसुलट चर्चा
हैदराबादच्या नवाब घराण्यातील शार्पशूटर नवाब शपथअली खान यांच्या अजगरअली खान या मुलाने या वाघिणीला संपवले. हा शपथअली त्याच्या पूर्व इतिहासामुळे वादग्रस्त आहे. तो या वाघिणीला मारण्यासाठी या परिसरात आला तेव्हाच वन्यजीवप्रेमींनी त्याला हाकलण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने ‘या वाघिणीला पकडण्याचाच प्रयत्न करा, ते शक्य झाले नाही तरच ठार मारा,’ असे स्पष्ट आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर ‘शिकार’ करण्यातच ‘माहीर’ असलेला नवाब येथे नको, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. वनखात्यानेही या नवाबाला काही दिवस परत पाठवून दिले होते. पण या विषयाचा ‘निकाल’ लागत नसल्याने त्याला पुन्हा बोलावण्यात आले होते. आता वाघीण मारली गेल्यानंतरही वन्यजीवप्रेमी ‘या नवाबाला वाघिणीला वाचवायचे नव्हतेच, तो तिचा जीवच घेणार होता,’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (24 of 411 articles)

Vinod Tawde1
हजार ७३८ जागा भरणार प तासिका अध्यापकांच्या मानधनात वाढ, मुंबई, २ नोव्हेंबर - राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयीन ४ हजार ७३८ ...

×