ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » महाराष्ट्र » पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे : मुख्यमंत्री

पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे : मुख्यमंत्री

मुंबई, २८ सप्टेंबर –

Devendra Fadanvis2

Devendra Fadanvis2

भीमा कोरेगाव हिंसा आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पोलिसांनी पाच बुद्धिजीवींवर केलेली कारवाई योग्यच होती हे सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट झाले आहे. या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता हेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशाविरोधी कारवाई करणार्‍या या पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत. हे पुरावे कोर्टात सादर करण्यात येणार असल्याचे सांगतानाच पंतप्रधानांच्या हत्येचे षडयंत्र रचणारे गजाआड जातील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला.
या पाचही मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. पोलिसांनी या पाचही जणांविरोधात केलेली कारवाई योग्यच होती. हे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पुरावे गोळा केल्यानंतरच आरोपींना अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाविरोधात कट रचला जात आहे. हे सर्व पुरावे आम्ही न्यायालयात मांडले. त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, असे त्यांनी सांगितले. या पाचही जणांनी माओवाद्यांना शहरी चेहरा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देशाविरोधात षडयंत्र रचले. पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला. जाती-जातीत संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशात गृहकलह सुरू होईल अशा पद्धतीचे षडयंत्र रचल्याचे उघड होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्याकडे या पाचही जणांविरोधात आणखी पुरावे असून, ते कोर्टात सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे पितळ उघडे : भाजपा
नवी दिल्ली – कोरेगाव भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे काँग्रेसचे पितळ उघडे पडल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राहुल गांधी तुम्ही वारंवार देशद्रोह्यांसोबत का उभे राहता, अशी विचारणाही भाजपाने केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. न्यायालयाचा निर्णय म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताचा विजय झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात काम करणार्‍या लोकांना आपली चौकशी कोणत्या यंत्रणांनी करावी, याची निवड करण्याचा तसेच कायद्याने केव्हा आणि कसे काम करावे हे ठरवण्याचा अधिकार असू शकत नाही, असे पात्रा म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेसचे पितळ उघडे पडले तसेच काँग्रेसला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले असा आरोप करत पात्रा म्हणाले की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष तसेच राहुल गांधी देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (74 of 435 articles)

Farmer Farm
२६ सप्टेंबर - अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा आणि घसरलेल्या रुपयाच्या मूल्याचा थेट फायदा देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. ...

×