ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » महाराष्ट्र » प्रख्यात संगीतकार यशवंत देव यांचे निधन

प्रख्यात संगीतकार यशवंत देव यांचे निधन

मुंबई, ३० ऑक्टोबर –

Yashwant Dev

Yashwant Dev

प्रख्यात गीतकार व संगीतकार यशवंत देव यांचे सोमवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. शब्दप्रधान गायकीचे पुरस्कर्ते अशी त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख होती. त्यांच्या निधनामुळे संगीतातील देव हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या तपासणीत त्यांना चिकनगुनिया झाल्याचे निदान निघाले होते. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यातच त्यांना न्यूमोनियानेही ग्रासल्याने त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती.
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, दिवस तुझे हे फुलायचे, तिन्ही लोक आनंदाने, जीवनात ही घडी, स्वर आले दुरुनी, असेन मी नसेन मी, अखेरचे येतील माझ्या… आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्‍व समृद्ध केले होते. चित्रपटासोबतच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते. मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत या संगीताच्या अनेक क्षेत्रात यशवंत देव यांनी आपली छाप उमटवली होता. आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम गाजले होते. भावसरगम, असे गीत जन्मा येते, शब्दप्रधान गायकी, रियाजाचा मंत्र असे कार्यक्रम यशवंत देव यांनी सादर केले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना त्यांनी सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, झाले-गेले विसरून जा या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
अल्पपरिचय
यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला होता. यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार अशीच ओळख राहिली आहे. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा त्यांनी पुढे चालविला. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव संगीताकडे वळले. सुरुवातीच्या काळात लग्नानंतर यशवंत देव यांनी रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. नोकरी सांभाळत त्यांनी शहजादा चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एचएमव्हीमध्ये नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खर्‍या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्‍वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले.
मान्यवरांची श्रद्धांजली
‘शब्दप्रधान गायकीचे महत्त्व जपणारे आणि मराठी भावसंगीतावर शतदा प्रेम करायला लावणारे ज्येष्ठ संगीतकार, गायक, कवी, गीतकार पं. यशवंत देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ – विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
‘यशवंत देव यांच्या निधनाने मराठी संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील ज्येष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली’ – राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (143 of 461 articles)

Bombay High Court
उच्च न्यायालयाचा निर्वाळा, मुंबई, २९ ऑक्टोबर - सरकारी घरकुल योजनेत अधिकारी, कर्मचारी व इतर लाभार्थ्यांना फक्त एकच घर प्राप्त करण्याचा ...

×