ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » प्लॅस्टिक बंदीला मुदतवाढ नाही

प्लॅस्टिक बंदीला मुदतवाढ नाही

►उलट कडक कारवाई होणार,
मुंबई, २६ सप्टेंबर –

Plastic Bags1

Plastic Bags1

राज्यात प्लॅस्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापार्‍यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लॅस्टिक उत्पादन करणार्‍या कंपन्या आणि व्यापार्‍यांवर कडक कारवाई करून राज्यातील प्लॅस्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. मंत्रालयात राज्यातील प्लॅस्टिक बंदीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
प्लॅस्टिक बंदीला ३ महिने पूर्ण
प्लॅस्टिक बंदी मोहीम सुरू असून व्यापार्‍यांना आणि उत्पादन करणार्‍या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ती संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तिक कारवाईची मोहीम सुरू करावी, असेही रामदास कदम यांनी यावेळी आदेश दिले आहेत. २३ जूनला राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली होती. पण त्यानंतर ही किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता. प्लॅस्टिक बंदीला तीन महिने पूर्ण झाले आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापरण्याचे आवाहन विविध यंत्रणांमार्फत करण्यात येत आहे. पण लोकअजूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. फेरीवाले, भाजीवाले, दुकानदार प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. प्लॅस्टिक बंदीनंतर महापालिकेने सुरुवातीला मोठी मोहीम राबवली पण नंतर ही मोहीम काहीशी मंदावली. बाजारात आताही प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे.
३० सप्टेंबरनंतर मुदतवाढ नाही
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर प्लॅस्टिकचा साठा संपवण्यासाठी व्यापार्‍यांना आणि कंपन्यांना तसेच पुनर्चक्रिकरणाची व्यवस्था उभारण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. पण आणखी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी उत्पादक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत आता मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (52 of 411 articles)

Electric Car
२६ सप्टेंबर - महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी एक धोरण बनवले आहे. या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनांसाठी ...

×