रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » आयुर्वेद जगताची खर्‍या अर्थाने दिवाळी

आयुर्वेद जगताची खर्‍या अर्थाने दिवाळी

=आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस, आयुर्वेद प्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण=
national-ayurveda-dayवैद्य नचिकेत वाचासुंदर
कराड, [२६ ऑक्टोबर] – आयुर्वेद जगतासाठी आजचा दिवस हा महान आनंदाचा दिवस आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आजपासून प्रत्येक धन्वन्तरी जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या अनेक वर्षांची आयुर्वेद प्रेमींची मागणी आज पूर्ण होत आहे. स्वातंत्र्य मिळविल्यानंतर ६९ वर्षे उलटल्यावर आयुर्वेद या भारतीय शास्त्राची उपेक्षा थांबून त्याला नवनवीन आयाम मिळण्याचे दिवस आले आहेत. आयुर्वेद जगताची ही खर्‍या अर्थाने दिवाळीच साजरी होत आहे. इथून पुढे प्रत्येक वर्षी दिवाळीचा आदला दिवस म्हमजेच धनत्रयोदशी हा दिवस केवळ धनत्रयोदशी न राहता राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा होईल.
राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून आयुष मंत्रालयाने एक नवीन बोधचिन्ह तयार केले आहे. आज रोजी या बोधचिन्हाचे अनावरण केले जाणार आहे. या बोधचिन्हाच्या मध्यभागी अर्थातच आयुर्वेदाची देवता श्री धन्वन्तरी विराजमान झाली आहे. आयुर्वेद शास्त्र हे जगामध्ये सर्वात प्राचीन असे वैद्यकशास्त्र म्हणून ओळखले जाते. बोधचिन्हामध्ये सर्वात मध्यभागी केशरी रंगाची ज्योतीसारखी दिसणारी जी पाकळी आहे, त्या पाकळीच्याही मध्यभागी श्री धन्वन्तरी दिसतात. अशा विविध रंगांच्या एकूण पाच पाकळ्यांच्या मुळाशी तीन रंगांचे तीन गोलक आहेत. हे तीन गोलक वात, पित्त आणि कफ या तीन मूलभूत शरीरातील दोषांचे प्रतिनिधी आहेत.
यांचे तळाशी आयुर्वेदोडमृतानाम् असे वचन कोरले आहे. याचा अर्थ असा आहे की, मनुष्य जातीच्या कल्याणासाठी आणि जीवनासाठी सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर तो म्हणजे आयुर्वेद होय. या सर्वांना एक अंडाकृती पान या बोधचिन्हामध्ये व्यापून राहीले आहे. हे पान म्हणजे मनुष्य जातील नैसर्गिकपणे आरोग्य दान करणार्‍या आयुर्वेद शास्त्राच्या तत्वाचे प्रतीक आहे. बोधचिन्हामध्ये मराष्ट्रीय आयुर्वेद दिवसफ ही अक्षरे ठळकपणे आलेली दिसतात. अशा रीतीने या विशेष दिवसाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाने एक समर्पक बोधचिन्हाची निर्मिती करुन राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाची एक चांगली सुरुवात करुन दिली आहे. यामुळे आयुर्वेदाला भारतामध्ये पारंपारिक विज्ञान म्हणून मानाचे स्थान मिळणार आहे यात मुळीच शंका नाही.
आज धनत्रयोदशी आहे. सर्वत्र आज धनाचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे आज धन्वन्तरी जयंती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक शास्त्राची एक देवता निश्चीत केली आहे. आयुर्वेदाची अर्थात भारतीय वैद्यक शास्त्राची देवता म्हणून भगवान श्री धन्वन्तरींना अनन्य साधारण महत्व आहे. कोणी भगवान धन्वंतरींना साक्षात विष्णूचा अवतार मानतात. पौराणीक कालामध्ये देवदानवांचे जे घनघोर युद्ध झाले होते त्या युद्धामध्ये समुद्रमंथन केले गेले. या समुद्रमंथनातून जी अमूल्य रत्ने निघाली त्यामध्ये श्री धन्वन्तरी चा समोवेश होता. असे मानतात.
भगवान श्री धन्वन्तरी ची जी मूर्ती असते तीला चार बाहू असतात. एका बाहूमध्ये शंख असतो. हा शंख त्याच्यामधून निघणार्‍या पवित्र ध्वनीमुळे जनपदोध्ंवसक व्याधी म्णजेच प्रदूषणजन्य व्याधींचा नाश करणारा आहे. आज सर्व जगभर प्रदुषणाची समस्या भेडसावत आहे. ग्रीनहाऊस इफेक्ट मुळे सारे विश्वच अनारोग्याच्या खाईत लोटले जाण्याची शक्यात निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भगवान श्री धन्वन्तरींच्या डाव्या वरील बाजूच्या भूजेमधील शंखास विशेष महत्व आहे.
दुसर्‍या बाहूमध्ये चक्र असते. हा बाहू वरील बाजूचा उजवा बाहू आहे. भगवान धन्वन्तरी हे श्री विष्णूंचे रुप आहे याचा हा पुरावाच. मात्र वैद्य लोक हे चक्र रोगरुपी आरीष्टाचा नाश करण्याचे प्रतीक मानतात. धन्वन्तरींच्या उजव्या, खालील बाजूच्या भूजेमध्ये जळू हा प्राणी दिसतो. आयुर्वेदामध्ये याला मजलौकाफ असे म्हणतात. फार प्राचीन काळी आयुर्वेद शास्त्रात शल्यतंत्र अर्थात सर्जरी या शास्त्राची फार मोठी प्रगती झालेली होती. मूतखडे बाहेर काढणे, सीझेरीयन, अवयवांचे रोपण अशा अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांबरोबरच प्लास्टीक सर्जरी देखील केली जात असे. या सर्व शास्त्राचे प्रतिक म्हणून मजळूफ ला महत्व आहे.
वास्तविक पाहता आयुर्वेदामध्ये पंचकर्म पद्धती ही वैशिष्ठयपूर्ण चिकित्सा पद्धती आहे. रोग शरीरातच न दडपता शरीरातील विविध दोष हे शरीराबाहेर काढून बरे केले जातात. वमन या क्रियेमध्ये पोटात साचलेले विकृत दोष शास्त्रीय पद्धतीने उलटी गडवून आणून शरीरातून बाहेर टाकले जातात.
विरेचन या प्रकारात शास्त्रीय पद्धतीने जुलाब दिले जातात. आतड्यांमधील साचलेला विकृत पित्तदोष बाहेर टाकला जातो. बस्ती या पंचकर्माच्या प्रकारात गुदद्वारावाटे विविद प्रकारची औषधे आतड्यामध्ये दिली जातात. तस्य क्रियेमध्ये नाकावाटे औषधे दिली जातात व डोके, मान याठिकाणचे दोष नाकावाटे बाहेर टाकले जातात. रक्तमोक्ष्ता या क्रियेमध्ये शरीरावर साचलेले दूषित रक्त बाहेर काढून टाकले जाते.
भगवान धन्वन्तरींच्या चौथ्या भुजेमध्ये अमृतकुंभ आहे. अमृत म्हणजेच मानवाला अमरत्व देणारे दिव्य औषध. आयुर्वेदातील अनेक गुणकारी वनस्पतींचा खजिना म्हमजे अमृताचा कुंभच. भगवान धन्वन्तरी ही आयुर्वेदाची माता मानली जात असली तरीही शल्यशास्त्राचा उगम या व्यक्ती वा प्रदामापासून झाला असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. म्हणूनच प्राचीन आयुर्वेद ग्रंथामधून शस्त्रक्रिया करणार्‍या वैद्यांचा उल्लेख मधन्वन्तरी सांप्रदायफ असा केलेला आढळतो.
धन्वन्तरी पूजन – वैद्य लोक या दिवशी आपल्या व्यवसायाचे ठिकाणी धन्वन्तरी प्रतिमेचे पूजन करतात. यावेळी साळीच्या लाह्या व धणे धन्वन्तरी प्रतिमेला वाहिले जातात. नेहमीच्या प्रथेप्रमाणे षोडषोपचारे पूजा केली जाते. साधारणतः ही पूजा सायंकाळी केली जाते.
धन्वन्तरी पूजन -काळाची गरज – वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस आलेल्या अपप्रवृत्तींची अनेक उदाहरणे आपण वाचतो व ऐकतो. किडनी असेल वा औषधामध्ये भेसळ असेल, दुर्लक्षित बालके असतील वा यंत्रणेतील आरोग्य विषयक तरतुदींमधील त्रुटी असतील, या सर्वच ठिकाणी केवळ व्यावसायीकता व वैयक्तिक नफेरदोरी यांचा विचार समाज गटक अधिक करीत आहेत. आरोग्य विषयक समस्या सोडवताना यांच्या पुढे जाऊन समाजावर श्रद्धा असणे महत्वाचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रात केवळ विकृत मनोवृत्तीमुळे व धनलालसेमुळे भ्रष्टाचार शिरणे समाजाच्या हिताचे नाही. या सर्व घटना नाहीशा होतील त्या केवळ मनाच्या पवित्रतेमुळेच. आपला व्यवसाय पवित्र मानून साधन शुचिता, ाचार विचार उच्चार शुचिता पाळली गेल्यास ह्या ्‌पप्रवृत्ती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी धन्वन्तरी पूजन हे या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. आयुर्वेदाचे आजच्या युगातील महत्व – भारतामध्ये आयुर्वेद परंपरेने समाजात सर्वदूर हात पाय पसरले आहेत. परदेशातही आयुर्वेदाचा प्रसार होतो आहे. आयुर्वेदामध्ये तूलनेने शरीराला कमी अपाय करणारी औषधे व उपाय दिले आहेत. निसर्गाशी व नैसर्गिक प्रक्रियेशी जवळीक साधणारी दिनचर्या व ऋतुचर्या सांगितली आहे. आयुर्वेदात वर्णितुला दिनचर्ये प्रमाणे आपला दैनंदिन आहार व वर्तणूक ठेवल्यास रोग होण्याचे प्रमाण कमी होईल यात शंकाच नाही. विशेषतः मधुमेह, रक्तदाब, अल्सर, मूळव्याध, स्थूलत्व हे रोग आपल्या राहणीमानामुळे आपणच ओढवून घेतो. निर्दोष, संतुलित आहाराला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्व आहे. मकाहीही खा कोठेही व केंव्हाही खाफ हा आधुनिक चंगळवादी जीवनपद्धतीचा मंत्र बनला आहे. समाजात झपाट्याने वाढणार्‍या अनेक रोगांच्या मूळाशी आहाराबद्दलच्या चुकीच्या कल्पना हे कारम आहे. आयुर्वेदाने आहाराचा अत्यंत मूलगामी विचार केला आहे. रोगी व निरोगी अवस्थांमध्ये आहाराविषयीच्या आयुर्वेदाच्या कल्पना व सिद्धांत काळाचे पुढे शंभर वर्षे आजही ाहेत. त्यामुळे रेवळ जुनाट रोगामध्ये केले जाणारे झाडपाल्याचे उपचार असे मर्यादीत स्वरुप न राहता आयुर्वेद हे मविश्ववैद्यकफ म्हणवण्यास व खर्‍या अर्थाने आयुष्याविषयीचे सर्व ज्ञान जाणणारे परिपूर्ण शास्त्र म्हणून मानजातीला उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
वैद्य नचिकेत प्रभाकार वाचासुंदर,
एम.डी.(आयुर्वेद),
कराड ९४२२०३९३५३

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (24 of 38 articles)


=राष्ट्रवादीला शह= धनंजय घोडके वाई, [२६ ऑक्टोबर] - नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला असून  निवडणुकीची समीकरणे बदलत आहेत. ...