हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » छाननी झाली, आता बांधणीला सुरुवात

छाननी झाली, आता बांधणीला सुरुवात

satara-nagar-parishadओमकार तपासे
सातारा, [२ नोव्हेंबर] – नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय छाननी मंगळवारी पूर्ण करण्यात आली. पालिकेच्या शिवाजी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी आलेले ११ उमेदवारांचे १३ अर्ज वैध तर २० प्रभागांमधून ४० जागांसाठी आलेल्या २४० उमेदवारांचे अर्जांची छाननी करत २ अर्ज अवैध ठरवून २३८ अर्ज वैध घोषित केले. खासदारांची साविआ, आमदारांची नविआ, भाजपा, मनसे, महाराष्ट्र नागरी विकास आघाडी, शिवसेना, रिपाइं, रासप या पक्षांसह अपक्षांची संख्या प्रभाग निहाय मोठी आहे. त्यामुळे आता छाननीचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे उमेदवार बांधणीच्या कामाला लागणार आहेत. ज्यांना माघार घ्यायची आहे, त्यांना ११ नोव्हेंबर पर्यंत मुदत असून त्यानंतरच ‘लढवय्ये आणि पळपुटे’ कोण, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष पदाच्या १३ अर्जांसह २० प्रभागातून २३८ असे २५१ चेहरे निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराचा धुरळा हा माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर १२ नोव्हेंबर पासून बैठका, कोपरा सभा या माध्यमातून धूम धडाक्यात उठणार आहे. पण जे उमेदवारीवर ठाम आहेत, त्यांनी आत्तापासूनच लोकांच्या भेटीगाठी प्रभागात सुरु केल्या आहेत. चहासाठी घरी येणारे आता दिवाळीच्या फराळावर ताव मारत असल्याने शिष्टाईचा भाव घरोघरी वधारला आहे. पाच वर्ष सत्तेच्या माध्यमातून भूलथापा मारत लोकांना ‘पाणी पाजणारे’ आता उसने आवसान आणून पुन्हा विकासाच्या आणाभाका घेत असल्याचे सूज्ञ नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. मतदानासाठी अजून तसा २४ दिवसांचा अवधी बाकी असला तरी बहुसंख्य उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते हीच मतदारांची डोकेदुखी झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पाण्याची शहरात प्रचंड ओरड असताना नागरिकांची त्या प्रश्नापासून अदयाप सुटका झालेली नाही. रस्त्यांची अवस्था तर संपूर्ण शहरात बिकट असून नव्याने केलेल्या रस्त्यांवर राजकीय वरदहस्ताने खडडे पाडल्यामुळे ‘रस्त्यात खडडा की खड्ड्यात रस्ता’ हे कळत नाही. शहराच्या विकासाचे कोणतेच काम पूर्ण झाले नसताना अनेक योजना अर्धवट ठेवून त्याच कामांवर आता नागरिकांना मत मागण्याची केविलवाणी वेळ सत्ताधार्‍यांवर आली आहे. पण याही परिस्थितीत सक्षम आश्वासक, आपली भूमिका स्पष्ट करणारा चेहरा लोकांसमोर पर्याय म्हणून उपलब्ध असल्याचे दिसत नाही. विकासाच्या आड स्वतःच्या राजकीय महत्वकांक्षा नागरिकांना आता स्पष्ट दिसू लागल्यात. त्यामुळेच शहरात जाहिररित्या लोक पालिकेच्या गेल्या पाच वर्षाच्या कामांवर बोलू लागलेत. छाननीनंतरच्या बांधणीत लोकसहभाग प्रत्येक उमेदवाराला अत्यल्प मिळत असल्याने माघारीची मुदत संपल्यावर ‘लढवय्ये आणि पळपुटे’ लोकांसमोर येतील, त्यावेळी लोकसहभाग या पालिका निवडणूक प्रक्रियेत गतिमान होवू शकतो, अशी अपेक्षा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (23 of 38 articles)


=पुणे पोलिसांची चाळीसगावात कारवाई, नगर कनेक्शन उघड= तभा वृत्तसेवा सातारा, [२ नोव्हेंबर] - खटाव तालुक्यातील चितळी येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती ...