हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » फलटण नगरपालिकेत विरोधकांचा ठिय्या

फलटण नगरपालिकेत विरोधकांचा ठिय्या

25sata17तभा तालुका प्रतिनिधी
फलटण, [दि. २५ ऑक्टोबर] – फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही हरकत नसताना प्रभाग क्र. ३ मधील तीनशेच्यावर नावे प्रभाग क्र.५ मध्ये समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांनी नगरपालिकेतच ठिय्या मांडून अधिकार्‍यांना धारेवर धरले तर एका नगरसेवकाने झोपूनच निषेध व्यक्त केला. संतप्त विरोधकांच्या आक्रमकतेपुढे प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात पळ काढला. नगरपालिकेत आज दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबतची माहिती अशी की, नगरपालिकेसाठी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही अचानक तीनशेपेक्षा जास्त नावे प्रभाग क्र. ५ मध्ये टाकल्याचा आरोप करीत राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याविरोधात ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे केली. जोपर्यंत नावे बदलली जात नाहीत व मुख्याधिकार्‍यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत नगरपालिकेतच बसण्याचा इशारा विरोधकांनी देऊन तेथेच सर्वजण बसले. अंतिम यादीत मुख्याधिकारी यांनी सत्ताधार्‍यांच्या दबावामुळे बदल केल्याने त्यांना तातडीने बडतर्फ करा अशी मागणी कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऍड. नरसिंह निकम, राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विराज खराडे, तालुकाप्रमुख विकास राऊत, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मितेश खराडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिष काकडे, महेंद्र बेडके, अनिल तावरे, अमिरभाई शेख, अनिकेत कदम यांना कारवाई झाल्याशिवाय येथून उठणार नाही व कोणाला बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रणजितसिंह निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऍड. नरसिंह निकम यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दाखले देत मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करा, यादीत बदल करा अशी सातत्याने आक्रमकरित्या मागणी लावून धरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आल्याने नगरपालिकेला छावणीचे स्वरुप आले होते.
मुख्याधिकार्‍यांवर कारवाई संदर्भात प्रांताधिकारी काहीच निर्णय घेत नसल्याने आम्हाला तुम्ही मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करु शकत नाही, मी निर्णय घेऊ शकत नाही असे लेखी पत्र द्या व तुमच्या पदाचाही राजीनामा द्या अशी मागणी संतप्त आंदोलकांनी केल्यावर मी लेखी स्वरुपात देतो असे सांगत प्रांताधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकार्‍यांच्या केबिनकडे धाव घेतली. मात्र आंदोलकांनी तुम्ही येथून जाऊ नका असे सांगत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांनी तुम्ही प्रांताधिकारी साहेबांना अडवू शकत नाही. त्यांना त्यांचे काम करु द्या असे सांगत त्यांना बाहेर नेले. यावेळी आंदोलक व पोलिसांची जोरदार तू-तू-मै-मै झाली.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (32 of 38 articles)


तभा प्रतिनिधी महाबळेश्‍वर [दि २५ आक्टोबर] - युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या गाडीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून ...