रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » सुरक्षिततेसाठी भाजपाला संधी द्या: चंद्रकांतदादा पाटील

सुरक्षिततेसाठी भाजपाला संधी द्या: चंद्रकांतदादा पाटील

=पाटणला प्रचाराची सांगता=
तभा वार्ताहर
पाटण, २६ नोव्हेंबर –
dada-patil-sabha-sataraभारतीय जनता पार्टीचे केंद्रात तसेच राज्यात सरकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. परंतु, त्यांना शहरांचा विकास साधता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. राज्य सुरक्षित आहे. यामुळे गावं, शहरं सुरक्षित ठेवण्यासाठी ‘भाजप’ला संधी र्द्यों असे आवाहन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाटण येथे केले. प्रचार सांगता सभेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
पाटील म्हणाले, ६२ वर्षे जनतेने तुम्हाला संधी दिली. परंतू, देशातील जनता सुखी झाली नाही. स्वातंत्र्य मिळाले. परंतू, सामान्य माणूस सामान्य राहिला. केंद्रातील सरकारने २०२२ पर्यंत पाच कोटी घरे बांधून देण्याचा संकल्प केला आहे. त्याचा शुभारंभही वाराणसीत झाला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही महाराष्ट्रात २५ लाख बेघर लोकांना २०२२ पर्यंत घरे देण्याचा संकल्प केला आहे. केंद्र तसेच राज्यातील भाजपाच्या सरकारने सामान्य लोकांसाठी विविध योजना आणल्या आहेत, तर पेन्शनसारख्या योजनेने तिसर्‍या पिढीपर्यंत लाभ मिळत आहेत. दोन- अडीच वर्षात देशात बदल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये देश बदलण्याची ताकद आहे.
राज्यात युतीचे सरकार आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी केवळ घोषणा झाल्या. दोन वर्षात शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करुन संपूर्ण जगातील पुतळ्यांपेक्षा मोठ्या उंचीचे स्मारक बांधणार आहोत. पंतप्रधान मोदींच्या डोक्यात नव-नव्या कल्पना असतात. लंडनमध्ये असणारे डॉ. बाबासाहेबांचे घर स्मारक म्हणून जतन करण्यात यश आले आहे. परंतू, अगोदरच्या सरकारने इंदू मिलच्या जागी स्मारक बांधण्याचे केवळ आश्‍वासन दिले. राज्यात सहा लाख पेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या मुलांना मोफत शिक्षणाची सोय भाजपा सरकारने केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात बदल पहावयास मिळत आहे.
माजी मंत्र्यांकडून विकास नाही
सर्व गल्ली-बोळांचे अंतर १० किलोमीटर असणार्‍या पाटणच्या रस्त्यांची, गटारांची अवस्था दयनीय आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी शहराचा विकास केला नाही. त्यांना आता घराच्या बाहेरचा रस्ता करावा लागला तर आता आम्हाला पत्र द्यावे लागेल. ते करु शकणार नाहीत.
आमदार शंभूराज देसाई सत्तेत आमच्यासोबत आहेत. कामे घेऊन येतात. परंतू, प्राधान्य आम्ही भाजपाच्याच लोकांना देतो. इथून पुढेही प्राधान्य भाजपाच्याच लोकांना देणार आहे.
स्वच्छ सुंदर शहर बनविण्यासाठी सरकार सेंट्रल प्लॅन तयार करत आहे. गावांची वैशिष्ट्ये शोधून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. पाटण नगरपंचायतीमध्ये भाजपच्या उमेदवारांना साथ द्या. केंद्रात तसेच राज्यात व गावातही सत्ता असली तरच विकासाचे सूर जुळतात, असे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी तालुक्यातील गटातटाच्या राजकारणाला फाटा देऊन भाजपाला साथ करा, असे आवाहन केले. पाटण तालुक्यात पूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी अन्याय केला. विस्थापितांचा, माथाडी कामगारांचा तालुका म्हणून ओळखू लागला. गटातटाच्या राजकारणाला विचार नसतो, कोणतीही संस्कृती नसते. निवडणुका आल्या की केवळ आश्‍वासनांची खैरात करायची व स्वत:चा स्वार्थ साधायचा. पाटण तालुक्यात निसर्ग सौंदर्याला मोठा वाव आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास झाल्यास रोजगारीचा प्रश्‍न मिटणार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला बाधा येत आहे. व्याघ्र प्रकल्पातील १४ गावे वगळावी, यासाठी दादांनी प्रयत्न करावा.
पाटण तालुक्यात गटातटाचे विष कालविण्याचा धंदा काही लोक करत आहेत. परंतू, आता तिकडे लक्ष देऊ नका. भाजपा हा तिसरा पर्याय तुमच्यासमोर आहे. पाटण नगरपंचायतीच्या कारभारावर टीका करताना त्यांनी पाटणची अवस्था दयनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविणारी कोयना नदी पाटणच्या १०० मीटर दुरुन जाते. परंतू, हे सत्ताधारी २५ वर्षात येथील जनतेला २४ तास पाणी देऊ शकले नाहीत. जनतेने विश्‍वासाने पाटणची सत्ता भाजपच्या हातात द्यावी, शहराचा कायापालट करु, असे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी कविता कचरे, सागर माने यांचीही भाषणे झाली. सभेस मनोज घोरपडे, दीपक महाडिक, कमलाकर पाटील, नानासो सावंत, रामभाऊ डुबल, रामकृष्ण वेताळ आदी उपस्थित होते.
भरत पाटलांना लॉटरी?
पाटण नगरपंचायतीच्या प्रचारासाठी आलेल्या मंत्री चंद्रकांतदादांनी भरत पाटलांना येत्या काही दिवसांत त्यांचे मोठे मोठे सत्कार तुम्हाला घ्यावे लागतील, असे म्हणून महामंडळावरील भरत पाटलांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. यावेळी टाळ्या वाजवून दादांच्या वक्तव्याचे स्वागत कार्यकर्त्यांनी केले.

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (9 of 38 articles)


⇒३ लाख ३५ हजार उमेदवार मतदानास पात्र ⇒जिल्ह्यात अडीच हजार पोलिसांकडून चोख बंदोबस्त, तभा प्रतिनिधी सातारा, २६ नोव्हेंबर - जिल्ह्यात ...