ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » भाजपा-शिवसेना २०१९ मध्ये सोबतच : देवेंद्र फडणवीस

भाजपा-शिवसेना २०१९ मध्ये सोबतच : देवेंद्र फडणवीस

मुंबई, ३० ऑक्टोबर –

Devendra Fadnavis1

Devendra Fadnavis1

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर शिवसेना सातत्याने टीका करीत असली, तरी २०१९ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक आणि राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
युती सरकारला उद्या, बुधवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होत आहे त्यांची व्होट बँक मजबूत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना व भाजपाने वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवल्यास त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे, ही राजकीय वस्तुस्थिती शिवसेनेला आहे, असे त्यांनी काही निवडक पत्रकारांसोबत सोमवारी रात्री उशिरा चर्चा करताना सांगितले. सार्वत्रिक आणि राज्य विधानसभेची निवडणूक सोबत होणार नाही, अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
योग्य कामगिरी न केल्याने भाजपाचे सहा खासदार आणि जवळपास ५० आमदारांचा येत्या निवडणुकीत पराभव होईल, असा दावा दिल्लीतील एका संस्थेने सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला आहे. हा दावा फेटाळत त्यांनी, भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात उत्साहवर्धक निष्कर्ष समोर आले असून, भाजपा यंदा जास्त जागा जिंकेल, असे सांगितले.
२०१४ मध्ये झालेल्या २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा १२२ जागा पटकावून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत छुपा समझोता झाल्याची माहिती त्यांनी यावेळी फेटाळली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि काही इतर राजकीय पक्ष यंदा होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत. त्यांची व्होट बँक मजबूत आहे, ही वस्तुस्थिती आहे, असे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले.
वैचारिकदृष्ट्या शिवसेना आणि भाजपा जवळचे आहेत आणि त्यांना एकत्रित निवडणूक लढवल्यास या दोन्ही पक्षांच्या व्होट बँकेचा फायदा युतीला होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्ष परस्परांविरोधात लढल्यास मतविभाजनाचा फटका बसेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जलयुक्त शिवार १०० टक्के यशस्वी
राज्यातील काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अपयशी ठरल्याचा विरोधक करीत असलेला आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळत, हा आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट केले. ही योजना १०० टक्के यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पावसाची तूट असतानाही जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भूजलपातळीत २७ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिवस्मारकाचे स्थळ बदलणार नाही
शिवस्मारकाचे स्थळ बदलण्याच्या शक्यतेला पूर्णविराम देताना त्यांनी हे स्मारक मुंबई किनार्‍यावर अरबी समुद्रातच उभारले जाईल, असे स्पष्ट केले. २४ ऑक्टोबर रोजी बोटीला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्थळ बदलण्यात यावे, या मागणीने जोर धरला होता. शिवस्मारकाचे स्थळ बदलण्याचे कोणतेही कारण नाही. ते ठरवलेल्या ठिकाणीच उभारले जाईल. शिवस्मारकाच्या उभारणीची सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्रिमंडळात फेरबदल शक्य
माझ्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांची कामगिरी उत्तम आहे. थोडफार कमी-जास्त असू शकते. पण सर्वच मंत्र्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे, असे फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार का, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळातील सहकारी चांगले काम करीत आहेत. त्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करून दाखवता येऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पण, हा विस्तार नेमका कधी होणार, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (28 of 411 articles)

Yashwant Dev
३० ऑक्टोबर - प्रख्यात गीतकार व संगीतकार यशवंत देव यांचे सोमवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ ...

×