ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » मराठवाडा » नांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता

नांदेड महानगरपालिकामध्ये कॉंग्रेसची सत्ता

►कॉंग्रेसला ७१ तर भाजपाला ५ जागा
►राकॉं-एमआयएम शून्यावर;
नांदेड, १२ ऑक्टोबर –

Ashok Chavan1

Ashok Chavan1

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत नांदेडकरांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. कॉंग्रेसने ७१ जागा मिळवून एकहाती सत्ता काबीज केली असून, भाजपाला केवळ ५ जागांवर तर सेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. मागील काही निवडणुकीत भाजपाची घोडदौड पाहता चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या निकालातून त्यांनी भाजपाच्या या घोडदौडीला लगाम घातल्याचे दिसून येते.
नांदेड महानगरपालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते. विशेष असे की, महानगरपालिकेच्या स्थापनेपासून नांदेडमध्ये कॉंग्रेसचीच सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमवत होते आणि आज जाहीर झालेल्या निकालात कॉंग्रेसला पुन्हा एकहाती सत्ता मिळाली. देशातील आणि राज्यात मागील काही निवडणुकांत भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश पाहता निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच सत्ता मिळवणार, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते ते स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. मात्र, आजच्या निकालावरून भाजपाच्या राज्यातील घोडदौडीला लगाम घालण्यात कॉंगे्रसला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता.
भाजपाचा परतीचा प्रवास
नांदेड शहरातील विकासात्मक कामे कॉंग्रेसच पूर्ण करू शकते, हा लोकांना विश्वास वाटला. त्यामुळेच त्यांनी आम्हाला स्वीकारले. विश्वासापोटी जनेतेने आम्हाला सत्ता दिली आहे. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली, अशी प्रतिक्रिया कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईतील राजीव गांधी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाने कौल स्वीकारला
नांदेड-वाघाळा महापालिकेत जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतो. निकालाचे आत्मपरीक्षण करू, मात्र निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. निवडणुकीत हार किंवा जीत होत असते, मात्र ईव्हीएम मशिनमुळे आमचा पराभव झाला, असे हास्यास्पद दावे आम्ही करणार नाही. कारण निवडणुकीतील विजय हा जर तुमचा विजय असेल, तर निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणे आपले कर्तव्य ठरते, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
नांदेडमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला तरी २०१२ च्या महापालिका निवडणुका आणि २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीच्या तुलनेत आमची टक्केवारी वाढली आहे. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आम्हाला नांदेड शहरात तीन टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. प्रचारात आमच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली म्हणूनच या निवडणूकीत आम्हाला २१ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत, असे ते म्हणाले.
आत्मपरीक्षणाचा सल्ला
नांदेड मनपातल्या कॉंग्रेसच्या विजयाबद्दल माजी कॉंग्रेस नेते नारायण राणेंनी अशोक चव्हाणांचे जाहीर अभिनंदन केले, तर मुख्यमंत्र्यांनी दोन जाहीर सभा घेऊनही नांदेडात पराभव स्वीकारावा लागत असेल तर प्रदेश भाजपा नेत्यांनी आतातरी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे राणेंनी म्हटले आहे.
यात विशेष असे की, एनडीएच्या उंबरठ्यावर असूनही राणेंनी मुख्यमंत्र्यांना हा असा आत्मपरीक्षणाचा जाहीर सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशोक चव्हाणांवर टीका करत नारायण राणेंनी कॉंग्रेस सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. या जाहीर अभिनंदनाबद्दल अशोक चव्हाणांनीही नारायण राणेंचे जाहीर आभार मानले आहे.(वृत्तसंस्था)

Posted by : | on : Oct 13 2017
Filed under : मराठवाडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मराठवाडा (6 of 7 articles)

Pankaja Munde Dasara Melava Beed
३० सप्टेंबर - वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर यावर्षी बघावी अशी गर्दी झाली नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर हजारोंचा समुह भगवान गडावर ...

×