अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » महाराष्ट्र » मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

उच्च न्यायालयात याचिका दाखल,
तभा वृत्तसेवा
मुंबई, ९ ऑगस्ट –

Maratha Reservation Protest Got Violent

Maratha Reservation Protest Got Violent

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनात सुरुवातीला शांतता दिसून आल्यानंतर हिंसाचारही घडून आला. राज्यात अनेक ठिकाणी लाठीमार, सरकारविरोधी घोषणाबाजी, लोकप्रतिनिधींच्या वाहनांची तोडफ ोड, दगडफे क, टायर पेटवणे, वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार घडले. औरंगाबादेत पोलिसांना गोळीबार करावा लागला. तसेच, मुंबई, नवी मुंबई या महानगरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या हिंसाचाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, १३ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.
औरंगाबाद : आंदोलनकर्त्यांनी वाळूज एमआयडीसीमध्ये कंटेनर पेटवला. तसेच, तीन ते चार कंपन्यांमध्ये तोडफोड केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवल्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यात आले. त्यापूर्वी पोलिसांनी हवेत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच, आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याने पोलिसांवरही दगडफे क करण्यात आली. यावेळी एक खाजगी बस आणि पोलिस वाहनही जाळल्याचे सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आंदोलकांनी बदनापूर तालुक्यातील दाभाडी, फुलंब्री, राजूर, भोकरदन-जाफ्राबाद रस्त्यावर टायर पेटवल्याने वाहतूक खोळंबली.
पुणे : शहरात सकाळी दहा वाजता एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुचाकी रॅली काढण्यात आली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सुरुवातीला शांत असलेल्या आंदोलकांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच, बाहेरून चपला आणि प्लॅस्टिकच्या बाटल्याही फे कण्यात आल्या. कार्यालयातील सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये तोडफोड करण्यात आली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
ठाणे : मराठा समाज आंदोलकांकडून ठाण्यात बंद नसल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली होती, तरीही शहरात बंदचा परिणाम दिसून आला. ठाणे परिवहन सेवेच्या बसेस सकाळी १० वाजतापर्यंत बाहेर पडल्या नाहीत. मागील वेळी आंदोलन झालेल्या नितीन कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले. केवळ तुरळक खासगी वाहने रस्त्यांवर धावत होती. एकंदर आज ठाण्यात शांत वातावरण पाहावयास मिळाले.
सातारा : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलस्वामी दैवत श्रीखंडेरायाला साकडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाचा जागर आणि गोंधळ घातला. इतकी वर्षे आरक्षणाची मागणी करत असताना कुठल्याही राज्यकर्त्याला पाझर फुटत नसल्याने आंदोलकांनी थेट कुलदैवतांचाच धावा केला. हालअपेष्टा, गार्‍हाणी सरकारला ऐकू जात नसल्याने जागर, गोंधळ आणि भजन गायनातून मराठा समाजाने त्यांच्या व्यथा मांडल्या.
लातूर : लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी येथे टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. टायर पेटवून प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी करण्यात आली. दरम्यान, हिंसक आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. मराठा आंदोलनात आमदार अमित विलासराव देशमुख यांनीही सहभाग घेतला. याशिवाय मुंबई, नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले.
सर्व बंद…बंद…
आंदोलनादरम्यान अनेक शहरातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. लहान मोठ्या बाजारपेठा बंद होत्या. शासकीय रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता किराणामालाची दुकाने, खाजगी कार्यालये, बँका, पेट्रोल पंप, सोनेचांदीची दुकाने, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स, चहाटपर्‍या आदी लहान मोठी दुकाने बंद असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. दरम्यान, मराठा आंदोलनकर्त्यांचा मागील अनुभव लक्षात घेता अनेक शहरात राज्य राखीव पोलिस दल, अग्निशमन दल, बचाव पथके, गृहरक्षक दल आदी तैनात ठेवण्यात आले होते.

Posted by : | on : Aug 10 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (4 of 435 articles)

Maharashtra Government
►१४ महिन्यांची थकबाकी दिवाळीपर्यंत, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट - उरलेल्या सात महिन्यांच्या महागाई भत्त्याची भरपाई दिवाळीपर्यंत करण्याची, तसेच जानेवारीपर्यंत ...

×