सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » महाराष्ट्र » मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देणार : मुख्यमंत्री

मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देणार : मुख्यमंत्री

हिंसाचार सोडण्याचे मान्यवरांचे आवाहन,
मुंबई, २ ऑगस्ट –

Devendra Fadanvis2

Devendra Fadanvis2

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. कायद्याच्या पातळीवर टिकेल असे कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहात मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आजच्या बैठकीत मान्यवरांनी अनेक सूचना केल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भातील एक निवेदन तयार करण्यात आले असून, त्यावर सर्वांनी सह्या केल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बैठकीत मराठा समाजासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, घेतलेले निर्णय व त्याची होत असलेली अंमलबजावणी याबाबत माहिती देण्यात आली. समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करता येईल, शिवाय राज्यात शांतता राखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत अनेकांनी सूचना मांडल्या. मागासवर्गीय आयोगाचे काम वेगाने सुरू असून आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यात येईल, तोपर्यंत मराठा समाजातील आंदोलकांनी शांतता ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मान्यवरांचे आवाहन
राज्याच्या जडणघडणीत मराठा समाजाचे फार मोठे योगदान राहिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य व वास्तव आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे व आंदोलन सुरू आहे. राज्य शासन मागण्याविषयी कायम सकारात्मक राहिले आहे. मराठा समाजातील युवकांनी व आंदोलकांनी राज्यात हिंसाचार होऊ देऊ नये व आत्ममहत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन लेखक, कलाकार, विचारवंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत केले.
मराठा आरक्षण आणि राज्यातील स्थिती याबाबत राज्यातील विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवर व विचारवंत यांची बैठक झाली. बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार रावसाहेब दानवे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह प्रा. आ. ह. साळुंखे, माजी कुलगुरू प्रा. डॉ. राम ताकवले, ज्येष्ठ विचारवंत आणि सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, अभिनेते सयाजी शिंदे व डॉ. अमोल कोल्हे, बीव्हीजीचे हणमंत गायकवाड, कला दिग्दर्शक नितीन देसाई, शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व उद्योगपती सुरेश हावरे, सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर, जिजाबा पवार, तानाजीराव शिंदे, रघुजीराजे आंग्रे, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. शैलेश म्हस्के, पांडुरंग बलकवडे, बी. बी. ठोंबरे आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला.
बैठकीत मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी शासनाने तत्काळ उचित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासन कटिबद्ध असून वैधानिक कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील तरुण शिक्षण आणि उद्योग उभारणीत मागे पडू नयेत यासाठी आर्थिक मागासाची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढविल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत असून त्याचा गेल्यावर्षी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांनी उद्योगासाठी घेतलेल्या दहा लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कृषी, उद्योग क्षेत्राच्या आमूलाग्र बदलाबाबतच्या तसेच आरक्षणासाठी तामिळनाडू पॅटर्नचा उपयोग करावा, अशा विविध सूचना मांडण्यात आल्या. याबरोबरच शासन राबवित असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्या. त्या योजनांमध्ये जास्तीत जास्त जनसहभाग नोंदविला पाहिजे, यासाठी प्रचार आणि प्रसार यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचनाही मांडण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी, तज्ज्ञांनी मांडलेल्या सर्व सूचनांचे स्वागत करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने बदल घडवून आणला जाईल, असे आश्‍वासित केले. याबरोबरच या बदलाच्या प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय साथ द्यावी, असे आवाहनही केले.

Posted by : | on : Aug 3 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (12 of 434 articles)

Devendra Fadanvis Chandrakant Patil
►मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मुंबई, ३१ जुलै - [caption id="attachment_58903" align="alignleft" width="300"] Devendra Fadanvis Chandrakant Patil[/caption] मराठा समाजाला टिकेल असे ...

×