ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » ठरले, शिवसेना स्वबळावरच!

ठरले, शिवसेना स्वबळावरच!

वृत्तसंस्था
मुंबई, २८ ऑगस्ट –

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

शिवसेनेने मंगळवारी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. शिवसेनाभवनावर झालेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. निवडणुका कधीही होवोत. आपण तयारीला लागा, असे आदेश त्यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सेनाभवनात शिवसेनेच्या दक्षिण तसेच दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला खासदार अरविंद सावंत तसेच सचिव अनिल देसाई यांनी मार्गदर्शन केले. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कधीही होवोत आपण त्या स्वबळावरच लढवायच्या असा आदेश त्यांनी दिला. या निवडणुका एकत्र घ्याव्यात असा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, असे सांगत या निवडणुका एकत्र होण्याचे संकेत देत आहेत. हा सर्व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अशा संभ्रमात तुम्ही राहू नका आणि मतदारांनाही जागृत करा, असे ते म्हणाले.
लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. असे असतानाही भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकतेच कशी? ही सर्व ईव्हीएमची किमया आहे. ईव्हीएम घोटाळ्यावर अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच बोलावलेल्या बैठकीत आपण ही बाब पुन्हा मांडली असून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या संघटनात्मक बाबींवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी सांगितले. बूथ स्तरावर पदाधिकारी नेमणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, याची माहितीही ठाकरे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. संघटनात्मक स्तरावर ज्या नियुक्त्या अजून झाल्या नाहीत त्या लवकरच करण्यात येणार सल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व, म्हणजेच ४८ जागा स्वबळावर लढवणार असल्याचेही सूत्राने सांगितले. शिवसेना गणेशोत्सवाच्या आधीच लोकसभेचे उमेदवार निश्‍चित करण्याची शक्यता आहे.
विद्यमान खासदारांना पुन्हा संधी ः शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या विद्यमान १८ खासदारांना पुन्हा संधी देणार असल्याचीही चर्चा आहे. सोबतच नीलम गोर्‍हे, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर आणि माजी महापौर शुभा राऊळ यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. शिवसेनेने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित करायचे ठरवले असून, मुंबईतील भाजपा खासदारांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आणि उत्तर पश्‍चिम मुंबईतून गजानन कीर्तीकर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर पूर्व मुंबईतून भाजपा खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर किंवा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मुंबईतून भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. ईशान्य मुंबईतून भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध मनसेतून आलेले शिशिर शिंदे आणि नीलम गोर्‍हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (18 of 64 articles)

Shrikant Pangarkar
स्फोटकांसाठी आर्थिक मदत, तभा वृत्तसेवा मुंबई, २० ऑगस्ट - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या आणि नालासोपारा येथे आढळलेल्या शस्त्रास्त्रप्रकरणी शनिवारी ...

×