ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » राहुल गांधींवर आरोप निश्‍चित, खटला चालणार

राहुल गांधींवर आरोप निश्‍चित, खटला चालणार

►रा. स्व. संघाच्या बदनामीचे प्रकरण,
वृत्तसंस्था
ठाणे, १२ जून –
महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच हात होता, संघाच्याच लोकांनी महात्मा गांधी यांना मारले होते, असा जाहीर आरोप करून संघाची बदनामी केल्याप्रकरणी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल मानहानी खटल्यात स्थानिक दंडाधिकारी न्यायालयाने आज मंगळवारी आरोप निश्‍चित केले. यामुळे त्यांच्यावर आता खटला चालविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
राहुल गांधी आज सकाळी अकराच्या सुमारास भिवंडी येथील न्या. ए. आय. शेख यांच्या न्यायालयात हजर झाले. यावेळी न्यायालयीन परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. काँगे्रसचे शेकडो कार्यकर्ते बाहेर उभे होते. काही वेळातच सुनावणी सुरू करताना न्या. शेख यांनी त्यांच्यावरील आरोप आणि तक्रारकर्ता राजेश कुंटे यांचे निवेदन वाचून दाखविले. तुम्ही ६ मार्च २०१४ रोजी भिवंडी येथील निवडणूक सभेत रा. स्व. संघावर गंभीर आरोप ठेवून संघटनेची बदनामी केली. तुमचे भाषण वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे आणि वृत्तपत्रांमध्येही प्रकाशित करण्यात आले आहे. तुमचा हा गुन्हा संघाची बदनामी व मानहानी करणार असून, तो भादंविच्या कलम ४९९ आणि कलम ५०० अंतर्गत दंडनीय आहे. तुम्हाला हे आरोप मान्य आहेत काय, अशी विचारणा न्यायालयाने राहुल गांधी यांना केली.
यावर, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, मी निर्दोष आहे, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले. यानंतर न्यायालयाने राहुल गांधींविरोधात आरोप निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू केली. तुमच्याविरोधात कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी करण्याचे जाहीर केले. कलम ५०० अंतर्गत दोषी आढळून येणार्‍या आरोपीला किमान दोन वर्षांचा कारवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.
पुढील सुनावणीत राहुल गांधी यांनी व्यक्तिश: हजर राहण्याची गरज नाही. त्यांचे वकील त्यांची बाजू न्यायालयात सादर करू शकतात, अशी माहिती त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी पत्रकारांना दिली.
विचारधारेसाठी लढाई : राहुल गांधी
दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राहुल गांधी न्यायालयातून बाहेर आले. बाहेर येताच पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर आरोप केला. पंतप्रधान बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत काहीच बोलत नाही. माझी लढाई सरकारच्या धोरणांविरोधात आणि भाजपा व संघाच्या विचारधारेविरोधात आहे आणि ती सुरूच राहणार आहे. संघ व भाजपाने माझ्याविरोधात शक्य असेल तितके खटले दाखल करावे, त्यांचा सामना करण्याची माझी तयारी आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : Jun 13 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (17 of 92 articles)


मुंबई, ७ जून - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली ...

×