अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा सत्तेत नको

सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजपा सत्तेत नको

शिवसेनेची आरपारची भूमिका,
मुंबई, ३१ जुलै –
एकवेळ शिवसेना स्वबळावर सत्तेत आली नाही तरी चालेल; पण कुठल्याही परिस्थितीत भाजपा सत्तेत नको, अशी शिवसेनेची आरपारची भूमिका आहे.
राज्यातल्या एकू ण २८८ मतदारसंघांपैकी मोजक्या १२० जागांवर शिवसेना आपली सर्व शक्ती पणाला लावणार असून, त्यातल्या ७० ते ७५ जागा हमखास निवडून आणण्याचे लक्ष्य शिवसेनेने ठेवले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाचे संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत भाजपाशी हातमिळवणी करायची नाही आणि भाजपाला सत्ताही मिळू द्यायची नाही, अशी व्यूहरचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वीच भाजपाने शतप्रतिशतचा, तर शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे दोनही पक्ष आपल्या विस्ताराचा जोमाने प्रयत्न करीत आहेत. उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या सर्व आमदारांशी चर्चा करीत आहेत. या सर्व आमदारांना स्वबळावर तयारी करण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे, अशीही माहिती आहे.
भाजपा आणि शिवसेनेची गेल्या तीन दशकांपासून युती आहे. २०१४ पर्यंत राज्यात शिवसेनेला मोठा भाऊ म्हणून मान होता. मात्र, २०१४ नंतर परिस्थिती बदलली आणि भाजपा हा मोठा भाऊ झाला. याची सल शिवसेनेला आहे. त्यातच शिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या मुंबई आणि ठाण्यातही भाजपाने आघाडी घेतली. या विभागातल्या ३६ पैकी १५ विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपाने बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेला घाम फुटला आहे. मुंबई महापालिकेतही भाजपाने मुसंडी मारली. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४, तर भाजपाचे ८२ नगरसेवक जिंकू न आले. त्यामुळे भविष्यातला धोका ओळखून शिवसेनेने भाजपा नकोच, अशी भूमिका घेतली आहे.
२०१४ सारखी परिस्थिती आता राहिली नाही, याची भाजपाला जाणीव आहे. त्यामुळे आगामी निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याची इच्छा भाजपाने अनेकदा व्यक्त केली आहे. मात्र, आता स्वबळावरच लढणार ही शिवसेनेची भूमिका आहे.
उद्धव ठाकरे आता शिवसेनेच्या व्यूहरचनेत आदित्य यांनाही सहभागी करून घेत आहेत. डिसेंबरपर्यंत शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढण्याचीही शक्यता व्यक्तकेली जात आहे. राज्यात आणि कें द्रात सत्तेत आल्यानंतर जो मान उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे, तो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून दिला गेला नाही. यामुळेही उद्धव ठाकरे कमालीचे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. २००९ पर्यंत राज्यात शिवसेना २८८ पैकी १७१, तर भाजपा ११७ जागांवर लढायचे. मोदी लाट आल्यानंतर भाजपाने राज्यात १२२ जागा पटकवल्या होत्या. अशीच परिस्थिती राहिली, तर जनधार कमी होण्याची शक्यता शिवसेनेला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरही शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यापासून दूर हटण्याचा प्रश्‍नच नाही, असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
गरज पडली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही व्यक्तकरण्यात येत आहे. भाजपा विरोधात राष्ट्रीय पातळीवर तयार होत असलेल्या महाआघाडीत शिवेसेनेलाही घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप शिवसेना त्यात थेट सहभागी झालेली नाही. त्यामुळे येणार्‍या काही महिन्यांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घटना घडण्याची शक्यता आहे.

http://tarunbharat.org/?p=58894
Posted by : | on : Aug 1 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (3 of 87 articles)

Uddhav Thackeray
►उद्धव ठाकरेंचा खुलासा, वृत्तसंस्था मुंबई, २४ जुलै - [caption id="attachment_58389" align="alignleft" width="300"] Uddhav Thackeray[/caption] भाजपाने महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी फोडून सरकार ...

×