ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » सेनेचे अराफत शेख भाजपात

सेनेचे अराफत शेख भाजपात

शिवसेनेने अन्याय केल्याचा आरोप,
तभा वृत्तसेवा
मुंबई, २ सप्टेंबर –

Arafat Shaikh

Arafat Shaikh

राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर २४ तासही उलटत नाही, तोच शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील काही महामंडळ, मंडळ तसेच आयोगाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उपनेते आणि शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर शनिवारी शेख यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार उपस्थित होते. तथापि, भाजपा प्रवेशाचा औपचारिक कार्यक्रम येत्या शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून ते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. शेख यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. अल्पसंख्यक आयोग सेनेला देत असाल तर तिथे आपण सांगू त्या व्यक्तीचीच नेमणूक करा अथवा दुसरे तुल्यबळ पद द्या, अशी भूमिका ते घेण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटातून वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेले अराफत शेख यांना पक्षाने उपनेतेपद तसेच वाहतूक सेनेचे अध्यक्षपद दिले असतानाही शेख यांनी एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका केली. परिवहनमंत्र्यांकडून आपल्याला धर्मावरून तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळेच ठाकरे यांनी अल्पसंख्यक आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांच्या नावाला असहमती दर्शवली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेख यांचे नाव त्यांच्या गळी उतरविले, असे बोलले जाते.
प्रेम मिळाले, पण न्याय नाही
उद्धव ठाकरे यांनी आपल्याला केवळ प्रेम दिले. अल्पसंख्यक समाजाला न्याय दिला नाही, अशी भावना शेख यांनी व्यक्त केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करताना मला उपनेतेपद दिले. मात्र, विधान परिषदेच्या सदस्यत्वाचे आश्‍वासन देऊनही प्रत्यक्षात तशी संधी दिली नाही. अल्पसंख्यक आयोगामध्येदेखील आपल्याला संधी डावलण्यात आली. वाहतूक सेनेची पूर्ण जबाबदारी देण्याचे जाहीर करूनही त्याची कार्यवाही केली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षपदाची संधी देऊन अल्पसंख्यक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.
पाठीत सुरा खुपसला
हाजी अराफत शेख यांच्या भाजपा प्रवेशाला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीला अध्यक्षपद दिल्यानंतर लगेचच ती दुसर्‍या पक्षात प्रवेश करते यावरून हे आधीच ठरले होते, हे स्पष्ट आहे. भाजपाकडून हा पाठीत सुरा खुपसण्याचा प्रकार आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही तर त्यांची अडचण
भाजपामध्ये येणार्‍या सर्वच नेत्यांचे आम्ही स्वागत करतो. हाजी अराफत यांचाही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. अन्य राजकीय पक्षांना त्यांची माणसे सांभाळता येत नसतील तर ती त्यांची अडचण आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केली आहे.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (18 of 65 articles)

Uddhav Thackeray
मुंबई, २८ ऑगस्ट - शिवसेनेने मंगळवारी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. शिवसेनाभवनावर झालेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

×