ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » महाराष्ट्र » राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त
►पुणे, सोलापूर, सातारा आणि नालासोपार्यात घातपात घडवण्याचा कट : एटीएस
►तिघांनाही १८ ऑगस्टपर्यंत कोर्टाने दिली पोलीस कोठडी,
वृत्तसंस्था,
मुंबई, दि. १० ऑगस्ट-

Vaibhav Raut

Vaibhav Raut

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वैभव राऊत नावाच्या हिंदू गोवंश रक्षा समितीच्या सदस्याला अटक केली असून, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे, सोलापूर, सातारा आणि नालासोपार्यात घातपात घडवण्याचा या तिघांचा डाव असल्याचा दावा एटीएसने केला आहे.
दरम्यान, वैभव राऊत याला अटक केल्यानंतर महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने आणखी दोघांवर अटकेची कारवाई केली. शरद काळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशी त्यांची नावे असून, त्यांना वसईतून अटक करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह अन्य दोन आरोपींना हजर करण्यात आले आहे. तिघांनाही १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली आहे.
शरद काळसकर आणि सुधन्वा गोंधळकर हे दोघेही राऊतच्या संपर्कात होते. गावठी बॉम्ब बनविण्यासाठी या दोघांनी राऊतला मदत केल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. या दोघांना अटक केल्यानंतर राऊत राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासण्यात येणार आहेत. दोन ते तीन महिन्यापूर्वीपासूनचे हे फुटेज तपासण्यात येणार आहेत. त्यातून राऊतच्या घरी कोणाचे येणे-जाणे होते. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, याची माहिती उजेडात येणार असल्याचे एटीएसने म्हणणे आहे. एटीएसने त्याच्या घरी व दुकानात छापा टाकून स्फोटके जप्त केली. यामध्ये क्रू ड बॉम्ब व आक्षेपार्ह साहित्याचा समावेश आहे. ही स्फोटके वैभवने घरात का ठेवली होती?, ती कुठून आणली होती? त्याचा कसा वापर केला जाणार होता?, या सगळ्याची चौकशी आता एटीएसने सुरू केली आहे. दरम्यान, सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याचे सनातन प्रभात वृत्तपत्रातील एका वृत्तावरुन समोर आले आहे. शिवप्रतिष्ठान संघटना ही संभाजी भिडे यांची आहे तर शरद कळसकर आणि वैभव राऊत हे दोघे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त आहेत, असे एका मराठी वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
वैभवची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट टू’
हिंदू जनजागृती समितीने वैभव राऊतची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट टू’ची शंका व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मुस्लिमबहुल मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जण ठार झाले होते आणि या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वैभव राऊत धडाडीचा गोरक्षक आहे. तो हिंदू गोवंश रक्षा समितीच्या माध्यमातून काम करतो, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. तो सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्या उपक्रमांमध्ये तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असे. मात्र, तो गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी झाला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यासारख्या घटना आता नवीन नाहीत. वैभव राऊतच्या अटकेबाबत संशय निर्माण झाला असून, त्याची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट टू’ असल्याची शंका सुनील घनवट यांनी व्यक्त केली.
वैभव राऊत ‘सनातन’चा नाही!
नालासोपारामध्ये पोलिसांनी पकडलेला संशयित आरोपी वैभव राऊत सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा पुरावा अजूनही मिळाला नसल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
एटीएसला तपासाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते योग्य तपास करत आहेत. जसाजसा तपास पुढे जाईल तशी अधिकची माहिती समोर येईल. याप्रकरणी तीन लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. आता त्यांची पोलिस कस्टडी घेऊन तपास करण्यात येईल. त्यानंतर अधिकची माहिती समोर येईल, असे ते म्हणाले. राऊत हा ‘सनातन’शी संबंधित असल्याचे प्राथमिकदृष्ट्या काही आढळून आलेले नाही.
आरोपींकडे सापडलेला मुद्देमालाची रासायनिक तपासणी चालू असून त्याचा अहवाल आल्यानंतर आपण पुढचा निष्कर्ष काढू शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये गावठी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते जप्त केलेले आहे. काही गावठी बॉम्ब जप्त केलेले आहेत. या संदर्भातला अधिक तपास एटीएस करत आहे. जेव्हा संशयास्पद लोक सापडतात तेव्हा त्यांचे कुठेकुठे संबंध आहेत हे तपासले जाते. त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का, हे पाहिले जाते. या प्रकरणातही हे पाहिले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कुणाशीही संबधित असू दे. गुन्हेगाराला शासन करणे हे शासनाचे कर्तव्य असते.
वैभवला कायदेशीर मदत करू : पुनाळेकर
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातनचा साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. यासोबतच वैभव राऊत याने असे काही केले असावे असे मला वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटके सापडणे शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व कायदेशीर मदत करू, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (183 of 442 articles)

Maratha Reservation Protest Got Violent
न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनात ...

×